AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईलमध्ये इंटरनेटचा स्पीड झाला कमी, ही युक्ती येईल कामी, सुसाट धावेल Internet

Tech tips to boost internet : तुमच्या मोबाईलमधील इंटरनेट थांबत थांबत चालत असेल तर मग चिडचिड कशाला करता, उपाय शोधा. तर काय आहे उपाय. ये आहेत पर्याय... त्याआधारे तुम्ही तुमच्या मोबाईलची इंटरनेट गती वाढवू शकता.

मोबाईलमध्ये इंटरनेटचा स्पीड झाला कमी, ही युक्ती येईल कामी, सुसाट धावेल Internet
| Updated on: Dec 22, 2024 | 5:29 PM
Share

जर तुमचा स्मार्टफोन थांबत थांबत चालत असेल तर घाबरू नका. ही अडचण अनेक कारणामुळे येऊ शकते. नेटवर्क सिग्नल कमकुवत असेल, ॲप्समध्ये गडबड असेल, फोनमधील सेटिंगमध्ये बदल करायचा असेल अथवा इतर काही कारण असेल तर तुमच्या मोबाईलची गती कमी होऊ शकते. ही समस्या तुम्ही सोडवू शकता. अशा स्थितीत तुम्हाला ही खबरदारी घ्यावी लागेल…

1. तुमचा फोन रीस्टार्ट करा

अनेकदा मोबाईल रीस्टार्ट केल्यावर छोट्या-छोट्या अडचणी दूर होतात. फोन बंद करून काही सेकंद सुरू ठेवल्यास आणि तो पुन्हा सुरू केल्यास इंटरनेट पुन्हा योग्य रीतीने काम करते.

2. एअरप्लेन मोडचा वापर करा

जवळपास सर्वच फोनमध्ये एअरप्लेन मोड असतो. फोन या मोडवर करा. काही सेकंदानंतर पुन्हा एअरप्लेन मोड बंद करा. त्यामुळे नेटवर्क सिग्नल रिफ्रेश होईल.

3. सिम कार्ड काढून पुन्हा टाका

सिम कार्डचा स्लॉट व्यवस्थित बसला नसेल. हलला असेल तर इंटरनेटची समस्या येते. तेव्हा सिम कार्ड काढा आणि पुन्हा टाका. इंटरनेटची समस्या दूर होईल.

4. ॲप्स अपडेट करा

जुने ॲप्स कधीकधी इंटरनेट कनेक्शनमध्ये अडचणी आणू शकतात. प्ले स्टोरवरून तुमचे ॲप्स अपडेट करा.

5. बिनकामाचे ॲप्स हटवा

काही ॲप्स तुम्ही इन्स्टॉल करता. पण त्याचा वापर करत नाही. अशी ॲप्स इंटरनेटचा डेटा संपवतात. तेव्हा अशी ॲप्स अगोदर हटवा. त्यामुळे इंटरनेटची गती सुधारेल.

6. मेमरी कमी करा

मेमरी जास्त असेल तर इंटरनेटची गती मंदावू शकते. फोनमधील बिनकामाच्या फाईल्स, ॲप्स आणि इतर गोष्टी कमी करून मेमरी रिफ्रेश करा.

7. फोनचे सॉफ्टवेअर अपडेट करा

फोनचा सॉफ्टवेअर नेहमी अपडेट ठेवा. जुने सॉफ्टवेअर नेटवर्क जोडणीसाठी अडचणीचे ठरते. फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन नियमितपणे अपडेट करा.

8. ठिकाण बदलवून पाहा

इंटरनेट ट्रॅफिक असेल, एखाद्या ठिकाणी अधिक वापरकर्ते असतील तर नेटवर्क जाम होते. इंटरनेट स्लो होते आणि कॉल पण मध्येच ड्रॉप होतो. अशावेळी वायफाय असेल तर त्याचा वापर करा. कमी डेटा वापरणाऱ्या Apps चा वापर करा.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.