AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8 हजार रुपयांच्या रेंजमध्ये Tecno चा नवीन स्मार्टफोन बाजारात, मोबाईलमध्ये 6000mAh क्षमतेची मोठी बॅटरी

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Tecno ने आज भारतात नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. ज्याचे नाव Tecno Pop 5 Pro आहे. अनेक आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर आज हा स्मार्टफोन देशात सादर करण्यात आला आहे.

8 हजार रुपयांच्या रेंजमध्ये Tecno चा नवीन स्मार्टफोन बाजारात, मोबाईलमध्ये 6000mAh क्षमतेची मोठी बॅटरी
Tecno Pop 5 Pro
| Edited By: | Updated on: Jan 20, 2022 | 1:45 PM
Share

मुंबई : चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Tecno ने आज भारतात नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. ज्याचे नाव Tecno Pop 5 Pro आहे. अनेक आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर आज हा स्मार्टफोन देशात सादर करण्यात आला आहे. Tecno Pop 5 Pro तीन रंगांमध्ये येतो, ज्यात Deepsea Luster, Ice Blue आणि Sky Cyan यांचा समावेश आहे. इच्छुक खरेदीदार कंपनीच्या वेबसाइट, Amazon आणि Flipkart वरुन हा खरेदी करू शकतील. दरम्यान, कंपनी अद्याप कोणतीही उपलब्धता किंवा विक्रीची (Sale) तारीख उघड केलेली नाही.

स्मार्टफोनला पॉवर देणारा प्रोसेसर अद्याप समोर आलेला नाही, परंतु मिळालेल्या माहितीनुसार हा फोन 3GB RAM आणि 32GB इंटर्नल स्टोरेजसह येईल. Tecno Pop 5 Pro मधील स्टोरेज स्पेस मायक्रोएसडी कार्डद्वारे 256GB पर्यंत वाढवता येईल. यात ड्युअल सिम सपोर्टचाही समावेश आहे.

टेक्नो पॉप 5 प्रो ची किंमत

Tecno Pop 5 Pro ची सर्वात आकर्षग बाब म्हणजे त्याची किंमत. स्मार्टफोन निर्माता कंपनीने फोनचं एक व्हेरिएंट लॉन्च केलं आहे. त्याची किंमत 8,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हे व्हेरिएंट 3GB रॅम आणि 32GB इंटर्नल स्टोरेजसह येते. स्मार्टफोनच्या काही प्रमुख फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.52 इंचाचा HD+ डिस्प्ले, वॉटरड्रॉप-स्टाईल नॉच, 6,000mAh क्षमतेची बॅटरी, 8 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप, 14 प्रादेशिक भाषा, IPX2 रेटिंग, Android 11 Go सपोर्ट यांचा समावेश आहे.

टेक्नो पॉप 5 प्रो चे स्पेसिफिकेशन्स

Tecno Pop 5 Pro मध्ये 6.52 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले आहे ज्याचा टच सॅम्पलिंग रेट 120Hz आणि स्क्रीन-टू-बॉडी रेशो 90 टक्के आहे. हा फोन Android 11 Go ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित HiOS 7.6 वर काम करते.

कॅमेरा स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, Tecno Pop 5 Pro मध्ये 8 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि AI पोर्ट्रेट मोड, HDR मोड आणि सेकेंडरी AI लेन्स समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये 5 मेगापिक्सेलचा सेन्सर असलेल्या फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हा फोन 6,000mAh बॅटरीसह सुसज्ज आहे. Tecno ने दावा केला आहे की, हा फोन 54 तासांचा टॉक टाइम किंवा 120 तासांचा म्युझिक प्लेबॅक प्रदान करतो.

इतर बातम्या

7000 रुपयांहून कमी किंमतीत एकापेक्षा एक उत्तम स्मार्टफोन, Nokia सह 4 कंपन्यांचे पर्याय

ट्रिपल रिअर कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 680 SoC प्रोसेसरसह Realme 9i भारतात लाँच, किंमत…

Motorola चा नवीन Tablet बाजारात, Realme Pad, Samsung Tablet ला टक्कर

(Tecno Pop 5 Pro launched in India, know price and features)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.