AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50MP सेल्फी कॅमेरा आणि 7000mAh बॅटरीसह Oppo F33 Pro हा फोन या दिवशी भारतात होणार लाँच

Oppo F33 Pro लवकरच भारतात लाँच होणार आहे. एका लीकमुळे त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये समोर आली आहेत. असा दावा केला जात आहे की हा फोन 50 मेगापिक्सेलच्या सेल्फी कॅमेऱ्यासह लाँच होईल. चला तर मग या फोनची लाँच तारीख जाणून घेऊयात.

50MP सेल्फी कॅमेरा आणि 7000mAh बॅटरीसह Oppo F33 Pro हा फोन या दिवशी भारतात होणार लाँच
oppo
| Edited By: | Updated on: Apr 08, 2026 | 8:06 AM
Share

ओप्पोच्या नवीन स्मार्टफोन Oppo F33 Pro हा लाँच होण्यापूर्वीच बाजारपेठेत मोठी चर्चा सुरु झाली आहे. लीक झालेल्या अहवालांमधून त्याची लाँचची तारीख, किंमत आणि वैशिष्ट्ये समोर आली आहेत. विशेष म्हणजे यामध्ये 50-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असणार असल्याचे म्हटले जात आहे. पॉवरफूल बॅटरी आणि प्रीमियम डिझाइनमुळे हा फोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये मोठी स्पर्धा निर्माण करू शकतो. चला तर मग आजच्या लेखात या फोनची लाँच तारीख आणि किंमत जाणून घेऊयात.

टिपस्टर यांच्या Oppo F33 Pro बद्दलच्या रिपोर्टनुसार हा फोन 14 एप्रिल रोजी भारतात लाँच होऊ शकतो. याची किंमत 35 हजार रूपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तो मिड-रेंज सेगमेंटमध्ये एक उत्तम पर्याय ठरेल. यापूर्वी ओप्पो एफ३१ प्रो सुमारे 26 हजार 999 रूपयांमध्ये लाँच झाला होता. नवीन मॉडेलमध्ये सुधारित फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे ते मागील व्हर्जनपेक्षा एक अपग्रेड ठरेल.

डिस्प्ले, प्रोसेसर आणि बॅटरी पॉवर

ओप्पो F33 प्रो मध्ये 6.57-इंचाचा AMOLED डिस्प्ले असण्याची शक्यता आहे, जो उत्तम कलर रिप्रोडक्शन आणि अधिक स्मूथ अनुभव देईल.

यामध्ये मीडियाटेकचा नवीन डायमेन्सिटी चिपसेट असण्याची शक्यता आहे, जो दमदार परफॉर्मन्स देईल अशी अपेक्षा आहे.

याव्यतिरिक्त फोनमध्ये मोठी 7000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट असण्याची शक्यता आहे. हे कॉम्बिनेशन बॅटरीचा वापर आणि फास्ट चार्जिंग या दोन्हीसाठी फायदेशीर ठरेल ज्यामुळे आजच्या वापरकर्त्यांच्या गरजा पूर्ण होतील.

कॅमेरा आणि डिझाइनमध्ये मोठे बदल

कॅमेऱ्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ओप्पो F33 प्रो मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर असेल. सेल्फीसाठी यात 100-डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू असलेला 50-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो.

डिझाइनच्या बाबतीत यात स्क्वेअर-शेप्ड कॅमेरा मॉड्यूल असण्याची शक्यता आहे, जो मागील मॉडेलपेक्षा वेगळा असेल. हा फोन निळ्या आणि लाल रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तो आणखी आकर्षक बनेल.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक