OnePlus : वनप्लस ब्रँडचे ‘हे’ स्मार्टफोन्स तुमच्यासाठी आहेत बेस्ट!, फिचर्स पाहा आणि आजच खरेदी करा…

| Updated on: Jul 31, 2022 | 1:48 PM

वनप्लसचे स्मार्टफोन अतिशय स्लिम आणि आकर्षक डिझाईनसाठी ओळखले जातात. तसेच वनप्लस नेहमी आपल्या ग्राहकांना प्रीमिअम सेगमेंटकडे ओढत असतो. परंतु आता कंपनीने काही बजेट स्मार्टफोन्सही ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत.

OnePlus : वनप्लस ब्रँडचे ‘हे’ स्मार्टफोन्स तुमच्यासाठी आहेत बेस्ट!, फिचर्स पाहा आणि आजच खरेदी करा...
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : तुम्हाला जर नवीन स्मार्टफोन (Smartphones) घ्यायचा असेल आणि तुम्ही त्यासाठी वनप्लस (OnePlus) ब्रँडची निवड केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण यात आम्ही तुम्हाला वनप्लसचे एकाहून एक भारी स्मार्टफोन्सची माहिती देणार आहोत. वनप्लसचे स्मार्टफोन अतिशय स्लिम आणि आकर्षक डिझाईनसाठी ओळखले जातात. तसेच वनप्लस नेहमी आपल्या ग्राहकांना प्रीमिअम सेगमेंटकडे ओढत असतो. परंतु आता कंपनीने काही बजेट स्मार्टफोन्सही ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. त्यामध्ये अनेक नवीन आणि उत्कृष्ट फीचर्स (Features) देखील उपलब्ध आहेत. नवीन स्मार्टफोन्समध्ये कॅमेराचा दर्जा देखील खूप चांगला देण्यात आला आहे. यामध्ये तुम्ही गेमिंगसह अनेक मल्टीटास्किंग टास्क सहज करू शकता.

OnePlus Nord 2T 5G

हा वनप्लसचा एक चांगला स्मार्टफोन आहे. यात 8GB रॅमसह 128GB स्टोरेज स्पेस देखील आहे. या स्मार्टफोनला 4 स्टारचे युजर रेटिंगही मिळाले आहे. हा फोन ग्राहकांना 2 रंगांच्या पर्यायांमध्ये मिळत आहे. यात उत्तम फोटो गुणवत्तेसह 50MP कॅमेरा देखील आहे. यामध्ये अनेक AI कॅमेरा मोड देखील देण्यात आले आहेत.

OnePlus Nord CE 2 Lite 5G

हा सर्वात चांगला रेटिंग मिळालेला स्मार्टफोन आहे. यामध्ये 5G इंटरनेट कनेक्टिव्हिटीही दिली जात आहे. हा स्मार्टफोन 6.59 इंचाच्या हाय क्वालिटी डिस्प्लेसह येतो. यामध्ये 120Hz चा रिफ्रेश रेट आणि हाय रिझोल्यूशन देखील दिले जात आहे. हा डार्क मोड फीचर्ससह उपलब्ध आहे. त्यामुळे तुमचे डोळेही खराब होत नाहीत आणि बॅटरीही वाचते.

हे सुद्धा वाचा

OnePlus Nord 2 5G

या स्मार्टफोनचा लुक आणि डिझाइन खूपच आकर्षक आहे. हा फोन अगदी स्लिम आणि स्लीक असून त्यामुळे युजर्सना प्रिमियम फील येतो. यामध्ये Oxygen OS 11.3 ची ऑपरेटिंग सिस्टम दिली जात आहे. स्मार्टफोन फास्ट चालावा यासाठी यात, नवीन प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 4500mAh चा मजबूत बॅटरी बॅकअप देखील मिळत आहे.

OnePlus Nord CE 2 5G

हा स्मार्टफोन 128GB हेवी स्टोरेज स्पेससह उपलब्ध आहे. यात 8GB रॅम मिळते. हा फोन निळ्या आणि काळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 4500mAh बॅटरीसह 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील आहे. हा स्मार्टफोन अवघ्या 15 मिनिटांच्या चार्जमध्ये दमदार परफॉर्मन्स देतो. यामध्ये अनेक स्मार्ट फीचर्सही देण्यात आले आहेत.

OnePlus 10R 5G

या स्मार्टफोनमध्ये अनेक नवीन फीचर्सचा वापर करण्यात आला आहे. या प्रीमियम स्मार्टफोनमध्ये अनेक टॉप रेटेड फंक्शन्स उपलब्ध आहेत. हा स्मार्टफोन ड्युअल फ्लॅश आणि 50MP दमदार कॅमेरासह येतो. यात 6.7 इंचाचा हाय क्वालिटी डिसप्ले आणि 120Hz चा स्क्रीन रिफ्रेश रेट देखील मिळत आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देखील उपलब्ध आहे.