AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ANC सपोर्ट आणि 54 तासांपर्यंतच्या बॅटरी लाईफ असलेला वनप्लसचा ‘हा’ नवीन इअरबड्स भारतात लाँच

वनप्लसने त्यांचा नवीन बड्स ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला आहे. हे इअरबड्स विशेष लाँच किमतीत विकले जातील. हे बड्स एएनसी (ANC) सपोर्ट आणि उत्कृष्ट बॅटरी लाईफसह येतात. चला तर मग या इअरबड्सची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

ANC सपोर्ट आणि 54 तासांपर्यंतच्या बॅटरी लाईफ असलेला वनप्लसचा 'हा' नवीन इअरबड्स भारतात लाँच
anc support OnePlus Earbuds
| Edited By: | Updated on: Jun 26, 2026 | 11:03 AM
Share

वनप्लसने ग्राहकांसाठी त्यांचे नवीन वनप्लस नॉर्ड बड्स 4 इअरबड्स सादर केले आहेत. यातील प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये 52dB पर्यंत ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) सपोर्ट, मोठे टायटॅनियम-कोटेड डायनॅमिक ड्रायव्हर्स, एआय-आधारित भाषांतर फिचर्स आणि ब्लूटूथ 6.1 यांचा समावेश आहे. बॅटरी लाईफबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीचा दावा आहे की हे नवीन इअरबड्स एकदा चार्ज केल्यावर 54 तासांपर्यंत बॅटरी लाईफ देतात. चला तर मग वनप्लसच्या या नवीन इअरबड्सची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

भारतात वनप्लस नॉर्ड बड्स 4 ची किंमत

या नवीन वनप्लस इअरबड्सची किंमत 3 हजार 299 रूपये आहे, पण एका विशेष लाँच ऑफर अंतर्गत ते तुम्हाला 3 हजा 99 रूपयांमध्ये खरेदी करता येणार आहेत. हे इअरबड्स स्टेलर ब्लॅक आणि ॲस्ट्रल टील या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असतील. रिलीजच्या तारखेबद्दल बोलायचे झाल्यास, हे इअरबड्स 29 जून 2026 पासून कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर, तसेच वनप्लस स्टोअर ॲप, वनप्लस एक्सपीरियन्स स्टोअर, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, मिंत्रा, ब्लिंकइट आणि देशभरातील निवडक पार्टनर स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतील.

हे नवीन इअरबड्स realme Buds Air8 (फ्लिपकार्ट, किंमत रु. 3599), Huawei Freebuds SE 2 (फ्लिपकार्ट, किंमत रु. 3199) आणि JBL Wave Beam 2 (किंमत रु. 2999, फ्लिपकार्ट) यांसारख्या या श्रेणीतील मॉडेल्सशी स्पर्धा करेल.

वनप्लस नॉर्ड बड्स 4 ची फिचर्स

12 मिमी टायटॅनियम-कोटेड डायनॅमिक ड्रायव्हर्स असलेले वनप्लस इअरबड्स 52dB पर्यंत ANC सपोर्ट देतात. कंपनीचा दावा आहे की, हे बड्स मागील पिढीच्या तुलनेत 200 टक्क्यांपर्यंत अधिक चांगले नॉईज रिडक्शन देतात.

यामध्ये सहा-मायक्रोफोन सेटअप आणि AI-आधारित क्लियर कॉल टेक्नॉलॉजी देखील आहे, जी व्हॉईस कॉल दरम्यान 25 किमी प्रति तास वेगापर्यंत वाऱ्याचा आवाज कमी करते असा दावा केला जातो.

हे TWS इअरफोन्स गेम स्पेशल ऑडिओ, 3D स्पेशल ऑडिओ, मास्टर ट्युनिंग मोड आणि कस्टमाइझ करण्यायोग्य EQ प्रीसेट्सना सपोर्ट करतात.

कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये गूगल फास्ट पेअर, ब्लूटूथ व्हर्जन 6.1 आणि ड्युअल-डिव्हाइस कनेक्टिव्हिटीचा समावेश आहे. कंपनीचा दावा आहे की यामध्ये 47ms लो-लॅटेन्सी असलेला गेमिंग मोड देखील आहे.

कंपनीचा दावा आहे की, ANC सपोर्ट बंद असताना इअरबड्स 13 तासांपर्यंत आणि चार्जिंग केससह 54 तासांपर्यंत बॅटरी लाईफ देतात.

दुसरीकडे तुम्ही जर ANC फीचर चालू ठेवले, तर इअरबड्स 6.5 तास आणि एकूण 27 तास टिकू शकतात. हे नवीन वनप्लस इअरबड्स फास्ट चार्जिंगलाही सपोर्ट करतात. 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये चार्जिंग केससह 11 तासांपर्यंत, किंवा इअरबड्ससह चार तासांपर्यंत बॅटरी लाईफ मिळते.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे