AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचे आधार कार्ड खरे आहे की खोटे? ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करून घरबसल्या एका क्लिकवर जाणून घ्या

आजच्या आधुनिक युगात फसवणूक आणि बनावटी गोष्टी या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. अशातच तुमच्या आधार कार्डची पडताळणी करणे खूप महत्वाचे झाले आहे. विशेषतः जेव्हा तुम्ही भाडेकरू, कर्मचारी किंवा कोणत्याही कामासाठी एखाद्यावर विश्वास ठेवता. चला तर मग आजच्या या लेखात आपण या सोप्या स्टेप्स फॉलो करून जाणून घेऊयात.

तुमचे आधार कार्ड खरे आहे की खोटे? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून घरबसल्या एका क्लिकवर जाणून घ्या
aadhar card
| Edited By: | Updated on: Sep 09, 2025 | 8:15 PM
Share

आजकाल प्रत्येक कामासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. कारण हे सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. बँकेपासून सिम कार्ड आणि नोकरीपर्यंत सर्वत्र आधार कार्ड दाखवावे लागते. अशातच आजच्या या आधुनिक युगात सहजपणे बनावट आणि खोटी कागदपत्र तयार केली जात आहे. अशातच जेव्हा कोणी बनावट आधार कार्ड वापरतो तेव्हा मोठ्या समस्या निर्माण होतात.

अनेकदा लोकं आधार कार्ड पाहूनच खरे असल्याचे गृहीत धरतात, तर ते तपासणे खूप महत्वाचे आहे. यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही घरी बसून आधार कार्ड खरे आहे की खोटे हे सहज पडताळणी करू शकता, ते देखील अगदी मोफत. चला तर मग आजच्या लेखात आपण याची प्रक्रिया सविस्तरपणे जाणून घेऊयात…

UIDAI वेबसाइटवरून व्हेरिफिकेशन करा

आधार कार्ड पडताळणीसाठी, तुम्हाला प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in ला भेट द्यावी लागेल.

यानंतर, तुम्हाला My Aadhaar विभागात जावे लागेल आणि Verify Aadhaar Number चा पर्याय निवडावा लागेल.

यानंतर, तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक आणि स्क्रीनवर दाखवलेला कॅप्चा कोड टाकावा लागेल.

तुम्ही व्हेरिफाय बटणावर क्लिक करताच, तुम्हाला आधार क्रमांक सक्रिय आहे की निष्क्रिय आहे हे लगेच कळेल.

जर आधार कार्ड सक्रिय दिसत असेल तर याचा अर्थ असा की ते कार्ड खरे आणि वैध आहे.

mAadhaar ॲप वापरून पडताळणी कशी करावी

UIDAI ने mAadhaar नावाचे एक मोबाईल ॲप देखील उपलब्ध करून दिले आहे. त्यात पडताळणीच्या दोन पद्धती आहेत:

आधार क्रमांक पडताळणी करा- यामध्ये, तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल आणि वेबसाइटप्रमाणे पडताळणी करावी लागेल.

क्यूआर कोड स्कॅन- प्रत्येक आधार कार्डवर एक क्यूआर कोड छापलेला असतो. आधारची सत्यता एमआधार ॲपद्वारे स्कॅन करून देखील कळू शकते.

मोफत आणि सोपी सुविधा

आधार कार्ड पडताळणीची ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे. तुम्ही वेबसाइट वापरा किंवा mAadhaar ॲप दोन्ही पद्धतींद्वारे आधारची सत्यता तुम्हाला काही मिनिटांतच कळेल. UIDAI ची ही सुविधा तुम्हाला केवळ सुरक्षित ठेवत नाही तर कोणत्याही संभाव्य फसवणुकीपासून संरक्षण देखील करते. आता फक्त एका क्लिकवर किंवा स्कॅन करून, तुम्ही तुमचा आधार खरा आहे की बनावट हे जाणून घेऊ शकता.

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.