AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थंडीत उबदार हवा देतात ‘हे’ Air Conditione, जाणून घ्या कसं?

थंडीचा हंगाम सुरु झाला आहे. अशा तऱ्हेने बाजारात असे अनेक एअर कंडिशनर आहेत, जे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात दोन्ही ऋतूत काम करतात. त्यांची खरेदी करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हे एसी कसे काम करतात ते जाणून घ्या.

थंडीत उबदार हवा देतात 'हे' Air Conditione, जाणून घ्या कसं?
हिवाळ्यासाठी खास Air ConditionerImage Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 23, 2024 | 3:10 PM
Share

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकांच्या घरात रूम हिटर असते. जेणे करून हिवाळयात घरातील वातावरण हे उबदार राहते. तर अनेक ठिकाणी थंडीचा कडाका देखील खूप वाढला आहे. यासाठी तुम्ही सुद्धा तुमच्या घरासाठी रूम हीटर किंवा हॉट एअर कंडिशनर खरेदी करण्याच्या विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला अशा एअर कंडिशनरबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला थंडीत उबदारपणा तर देतीलच. त्याऐवजी उन्हाळ्यात थंडावा देखील देतील. त्यामुळे तुमच्यासाठी हिवाळ्यात आणि उन्हाळयात या दोन्ही ऋतूत काम करणारा एअर कंडिशनर खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते. हे एसी कसे काम करतात ते जाणून घेऊयात.

बाजारात अनेक प्रकारचे एअर कंडिशनर आहेत, जे हिवाळा आणि उन्हाळा या दोन्ही ऋतूंमध्ये काम करतात. अशावेळी जर तुम्ही एसी घेण्याचे ठरवत असाल तर असा एअर कंडिशनर निवड जो हिवाळ्यात उबदार हवा देईल आणि उन्हाळ्यात थंडावा देईल. एकाच एअर कंडिशनर मध्ये असे दोन फिचर असतात त्यांना हॉट अँड कोल्ड एसी किंवा इन्व्हर्टर एसी म्हणतात.

एअर कंडिशनर कसे कार्य करते?

दोन्ही ऋतूत काम करणारा एसी थंड हवामानात कॉम्प्रेसरच्या माध्यमातून बाहेरची हवा खेचून खोलीत उबदारपणा निर्माण करते. त्याचबरोबर इन्व्हर्टर तंत्रज्ञान असलेल्या एसीमध्ये स्मार्ट कॉम्प्रेसर असते, जे बाहेरच्या तापमानानुसार एसीचा वेग स्वतः कंट्रोल करून खोलीत उबदार हवा देते. याशिवाय हे हॉट आणि कोल्ड एसी सामान्य हीटरपेक्षा कमी वीज घेतात आणि खोली लवकर उबदार करतात.

हे सामान्य एसीपेक्षा कसे वेगळे आहे?

नॉर्मल एसीचा वापर आपण फक्त उन्हाळ्यातच करू शकतो. तसेच हॉट अँड कोल्ड एसी किंवा इन्व्हर्टर एसी हे उन्हाळ्याव्यतिरिक्त हिवाळ्यात गरम आणि उन्हळ्यात थंड वातावरण तयार करतात. याशिवाय या एसीमध्ये एनर्जी एफिशिएंट हाय असल्याने विजेचा कमी वापर होतो. त्यामुळे तुम्हाला खास करून थंडीच्या दिवसात हीटर, रूम हीटर बसवताना त्यावर वेगळे पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?