AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

20 जीबी रॅमसह लाँच झाला हुआवेईचा ‘हा’ अद्भुत फ्लॅगशिप फोन, जाणून घ्‍या किंमत आणि स्पेसिफिकेशन

हुआवेई कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Mate 80 Series स्थानिक बाजारात लाँच केला आहे, ज्यामध्ये चार नवीन फ्लॅगशिप मॉडेल्सचा समावेश आहे. चला तर मग या नवीन स्मार्टफोन सिरीजची किंमत आणि फिचर्स याबद्दल जाणून घेऊयात.

20 जीबी रॅमसह लाँच झाला हुआवेईचा 'हा' अद्भुत फ्लॅगशिप फोन, जाणून घ्‍या किंमत आणि स्पेसिफिकेशन
20 जीबी रॅमसह लाँच झाला हुआवेईचा 'हा' अद्भुत फ्लॅगशिप फोन, जाणून घ्‍या किंमत आणि स्पेसिफिकेशन Image Credit source: Huawei
| Edited By: | Updated on: Nov 25, 2025 | 8:25 PM
Share

चीनी स्मार्टफोन कंपनी हुआवेईने त्यांची नवीन स्मार्टफोन Mate 80 Series लाँच केली आहे. ज्यामध्ये Mate 80, Mate 80 Pro, Mate 80 Pro Max आणि Mate 80 RS Master Edition असे चार प्रमुख मॉडेल्स आहेत. तर या नवीन सिरीजमध्ये ग्राहकांना किरिन चिपसेट, 20 जीबी रॅम, 1 टीबी स्टोरेज आणि हार्मोनीओएस 6.0 सारख्या उच्च दर्जाच्या फिचर्स स्मार्टफोन मध्ये पाहायला मिळणार आहे. Mate 80 Pro Max मध्ये किरिन 9030 प्रो आणि 6000 एमएएच बॅटरी आहे, तर Mate 80 RS Master Edition हे सर्वात वेगळ्या डिझाइन आणि प्रीमियम फिचर्ससह लाँच केले आहे. 8000 निट्स ओएलईडी स्क्रीन आणि अधुनिक कॅमेरा सेटअपसह असलेली ही सिरीज हुआवेईची आतापर्यंतची सर्वात पॉवरफुल असल्याचे सांगितलं जातयं.

Huawei Mate 80 Series:किंमत आणि उपलब्धता

Huawei Mate 80 च्या 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत CNY 4699 म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे 59 हजार रूपयांपासून सुरू होते. तर या मॉडमध्ये 12GB + 512GB व्हेरिएंट असलेल्या फोनची किंमत CNY 5,199 म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे 65 हजार रूपये इतके असू शकते आणि 16GB + 512GB मॉडेलची किंमत CNY 5,499 म्हणजेच 69 हजार रूपये असु शकते.

Mate 80 Pro च्या 12GB + 256GB असलेल्या फोनची किंमत CNY 5,999 म्हणजेच भारतीय चलनानुसार 75,000 इतकी असू शकते तर 12GB + 512GB मॉडेलची किंमत CNY 6,499 म्हणजेच 81,000 च्या आसपास इतकी आणि 16GB + 512GB व्हेरिएंटची किंमत CNY 6,999 इतकी 87,000आहे, तर त्याचे 16GB + 1TB मॉडेलची किंमत CNY 7,999 म्हणजेच आपल्या भारतीय चलनानुसार 1 लाखाच्या आसपास असु शकते.

प्रीमियम Mate 80 Pro Max ची किंमत CNY 7,999 पासून सुरू होते आणि 1TB व्हेरिएंटची किंमत CNY 8,999 पर्यंत जाते. टॉप-एंड मेट 80 आरएस मास्टर एडिशनची किंमत 11,999 चिनी युआन आहे आणि ती 12,999 पर्यंत जाते. सर्व मॉडेल्स विविध आकर्षक रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.

Mate 80 Pro Max: यामध्ये किरिन 9030 प्रो चिप आणि 6000 एमएएच बॅटरी

  • Huawei Mate 80 Pro Max हा HarmonyOS 6.0 वर चालतो आणि त्यात 120Hz रिफ्रेश रेट आणि 1440Hz PWM डिमिंगसह 6.9-इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्ले Kunlun Glass 2 द्वारे संरक्षित आहे. तो Kirin 9030 Pro चिपसेटद्वारे समर्थित आहे, जो कंपनीचा सर्वात प्रगत प्रोसेसर मानला जातो.
  • कॅमेरा सेटअपमध्ये 50MP RYYB सेन्सर, 40MP अल्ट्रा-वाइड, 50MP मॅक्रो टेलिफोटो आणि दुसऱ्या पिढीचा रेड मेपल कलर कॅमेरा समाविष्ट आहे. सेल्फीसाठी 13MP फ्रंट कॅमेरा आणि 3D डेप्थ सेन्सर प्रदान केला आहे.
  • फोनमध्ये IP68+IP69 रेटिंग आणि 6000mAh बॅटरी आहे जी 100W वायर्ड आणि 80W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
  • Mate 80 आणि Mate 80 Pro: पॉवरफुल किरिन चिपसेट
  • Mate 80 Pro आणि Mate 80 दोन्हीमध्ये हार्मोनीओएस 6.0 , 6.75-इंचाचा एमोलेड डिस्प्ले आणि कुनलुन ग्लास 2 प्रोटेक्शन आहे.
  • Mate 80 Pro किरिन 9030 प्रो चिपने चालवला जातो, तर स्टँडर्ड Mate 80 किरिन 9020 प्रोवर चालतो. Mate 80 Pro मध्ये 50 एमपी आरवायवायबी मेन सेन्सर, 40 एमपी अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 48 एमपी मॅक्रो टेलिफोटो कॅमेरा आहे.
  • Mate 80 मध्ये 50 एमपी अल्ट्रा-वाइड सेन्सर, 40 एमपी अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 12 एमपी पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा आहे.
  • दोन्ही फोनमध्ये आयपी68+आयपी69 रेटिंगसह 5500 एमएएच बॅटरी आहे. चार्जिंग स्पीड वेगवेगळे आहेत. मेट 80 प्रो 100 वॅट वायर्ड आणि 80 वॅट वायर्ड चार्जिंग देते, तर मेट 80 मध्ये 66 वॅट वायर्ड आणि ५० वॅट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.

कनेक्टिव्हिटी, सेन्सर्स आणि ओएस

Huawei Mate 80 Series मध्ये Wi-Fi, Bluetooth 6, BeiDou, Galileo, NavIC, GPS, NFC आणि USB Type-C सपोर्ट आहे. सेन्सर्समध्ये अॅम्बियंट लाइट, जायरोस्कोप, इन्फ्रारेड, लेसर ऑटोफोकस, कलर टेम्परेचर आणि ग्रॅव्हिटी सेन्सर्सचा समावेश आहे. Mate 80 Pro Max आणि Pro मॉडेल्समध्ये साइड-माउंटेड डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि 3D फेस रेकग्निशन आहे. सर्व फोन HarmonyOS 6.0 वर चालतात, जे सुधारित अॅनिमेशन, कामगिरी आणि बॅटरी व्यवस्थापन देते.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.