
चीनी स्मार्टफोन कंपनी हुआवेईने त्यांची नवीन स्मार्टफोन Mate 80 Series लाँच केली आहे. ज्यामध्ये Mate 80, Mate 80 Pro, Mate 80 Pro Max आणि Mate 80 RS Master Edition असे चार प्रमुख मॉडेल्स आहेत. तर या नवीन सिरीजमध्ये ग्राहकांना किरिन चिपसेट, 20 जीबी रॅम, 1 टीबी स्टोरेज आणि हार्मोनीओएस 6.0 सारख्या उच्च दर्जाच्या फिचर्स स्मार्टफोन मध्ये पाहायला मिळणार आहे. Mate 80 Pro Max मध्ये किरिन 9030 प्रो आणि 6000 एमएएच बॅटरी आहे, तर Mate 80 RS Master Edition हे सर्वात वेगळ्या डिझाइन आणि प्रीमियम फिचर्ससह लाँच केले आहे. 8000 निट्स ओएलईडी स्क्रीन आणि अधुनिक कॅमेरा सेटअपसह असलेली ही सिरीज हुआवेईची आतापर्यंतची सर्वात पॉवरफुल असल्याचे सांगितलं जातयं.
Huawei Mate 80 च्या 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत CNY 4699 म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे 59 हजार रूपयांपासून सुरू होते. तर या मॉडमध्ये 12GB + 512GB व्हेरिएंट असलेल्या फोनची किंमत CNY 5,199 म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे 65 हजार रूपये इतके असू शकते आणि 16GB + 512GB मॉडेलची किंमत CNY 5,499 म्हणजेच 69 हजार रूपये असु शकते.
Mate 80 Pro च्या 12GB + 256GB असलेल्या फोनची किंमत CNY 5,999 म्हणजेच भारतीय चलनानुसार 75,000 इतकी असू शकते तर 12GB + 512GB मॉडेलची किंमत CNY 6,499 म्हणजेच 81,000 च्या आसपास इतकी आणि 16GB + 512GB व्हेरिएंटची किंमत CNY 6,999 इतकी 87,000आहे, तर त्याचे 16GB + 1TB मॉडेलची किंमत CNY 7,999 म्हणजेच आपल्या भारतीय चलनानुसार 1 लाखाच्या आसपास असु शकते.
प्रीमियम Mate 80 Pro Max ची किंमत CNY 7,999 पासून सुरू होते आणि 1TB व्हेरिएंटची किंमत CNY 8,999 पर्यंत जाते. टॉप-एंड मेट 80 आरएस मास्टर एडिशनची किंमत 11,999 चिनी युआन आहे आणि ती 12,999 पर्यंत जाते. सर्व मॉडेल्स विविध आकर्षक रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.
Huawei Mate 80 Series मध्ये Wi-Fi, Bluetooth 6, BeiDou, Galileo, NavIC, GPS, NFC आणि USB Type-C सपोर्ट आहे. सेन्सर्समध्ये अॅम्बियंट लाइट, जायरोस्कोप, इन्फ्रारेड, लेसर ऑटोफोकस, कलर टेम्परेचर आणि ग्रॅव्हिटी सेन्सर्सचा समावेश आहे. Mate 80 Pro Max आणि Pro मॉडेल्समध्ये साइड-माउंटेड डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि 3D फेस रेकग्निशन आहे. सर्व फोन HarmonyOS 6.0 वर चालतात, जे सुधारित अॅनिमेशन, कामगिरी आणि बॅटरी व्यवस्थापन देते.