AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमच ठरलं… गुगल पाठोपाठ आता Truecaller बंद करणार ‘ही’ सुविधा… काय आहे नेमकं कारण?

वापरकर्त्यांची प्रायव्हसी अबाधित रहावी तसेच जागतिक नियमांच्या अधिन राहून गुगल पाठोपाठ ट्रू कॉलरनेही आपल्या पॉलिसीमध्ये बदल केला आहे. कॉल रेकॉर्डिंगमध्ये नेमके काय बदल झाले आहेत, ते या लेखातून जाणून घेणार आहोत.

आमच ठरलं... गुगल पाठोपाठ आता Truecaller बंद करणार ‘ही’ सुविधा... काय आहे नेमकं कारण?
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 24, 2022 | 11:56 AM
Share

गुगल प्ले स्टोअरने (google play store) कालच (23 एप्रिल) आपल्या काही पॉलिसींमध्ये बदल करण्याचा निर्णय जाहिर केला होता. यांतर्गत ते 11 मेनंतर आपल्या स्टोअरवरुन कॉल रेकॉर्डिंग करणार्या सर्व थर्ड पार्टी अॅप्सना डिलिट करणार आहेत. वापरकर्त्यांची प्रायव्हसी व कॉल रेकॉर्डिंगबाबत विविध देशात असलेल्या विविध नियमांच्या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात येत असल्याचा अंदाज आहे. त्याच्या दुसर्याच दिवशी ट्रू कॉलरनेही (truecaller) कॉल रेकॉर्डिंग थर्ड पार्टी ॲप्सवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ज्या मोबाईलमध्ये इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंगची (call recording) सुविधा आहे, त्याना पूर्वी प्रमाणे कॉल रेकॉर्डिंग करता येणार असून त्याच्यावर या निर्णयाचा काहीही परिणाम होणार नाही.

दरम्यान, ट्रू कॉलरने सांगितले, की अपडेट करण्यात आलेल्या गुगल डेव्हलपर प्रोग्राम पॉलिसीनुसार, आम्हीदेखील आता रेकॉर्डिंगची सुविधा देण्यात असमर्थ आहोत. ज्या मोबाईलमध्ये पहिल्यापासून रेकॉर्डिंगची सुविधा इनबिल्ट आहेत, त्यावर या निर्णयाचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. युजर्सच्या तीव्र मागणीच्या आधारावर आम्ही सर्व अँड्रोइड फोनवर रेकॉर्डिंगची सुविधा देण्याला सुरवात केली होती, असे कंपनीकडून सांगण्यात आले.

काय आहे नवीन रेकार्डिंग पॉलिसी?

गुगलने आपल्या डेव्हलपर पॉलिसीमध्ये अनेक बदल केले आहेत. ज्याच्यामुळे इतर सर्व थर्ड पार्टी ॲप्स डिलिट होणार आहेत. दरम्यान, असे असले तरी सध्याच्या कॉल रिकॉर्डिंगच्या सुविधांवर याचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. ज्या कॉल रेकॉर्डिंग सुविधा मोबाईलमध्ये इनबिल्ट आहेत, त्याच्यावर या निर्णयाचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. गुगलकडून सांगण्यात आल्यानुसार, नवीन पॉलिसीमुळे एक्सेसिबिलिटी एपीआय डिझाईन केली गेलेली नाही व त्यामुळे रिमोट कॉल ऑडिओ रेकॉर्डिंग केली जाउ शकत नाही.

आपल्या नवीन पॉलिसी अंतर्गत विविध अँड्रॉइड व्हर्जनमध्ये कॉल रेकाँर्डिंग करणार्या एपीआयला गुगलकडून हटविण्यात येणार आहे. विविध देशांमध्ये कॉल रेकॉर्डिंगबाबत वेगवेगळे नियम लावण्यात आले असल्याने गुगलकडून हा निर्णय गुप्ततेच्या धोरणाला अनुसरुन घेण्यात आला आहे.

गुगल कॉल रेकॉर्डिंगच्या विरोधात

दरम्यान, बहुतेक वापरकर्ते कॉल रेकॉर्डींग सुविधांसाठी गुगलच्या प्ले स्टोअरवर जाउन त्या ठिकाणाहून एखादी ॲप डाउनलोड करतात. परंतु यामुळे प्रायव्हसी धोक्यात येउन हॅकिंगचे प्रकार वाढले आहेत. गुगल अनेक वर्षांपासून रेकॉर्डिंगच्या विरोधात असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. यामुळे वापरकर्त्यांची प्रायव्हसी धोक्यात येत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. दरम्यान, यामुळेच कंपनीने आपल्या डायलर ॲपवर काल रेकॉर्डिंगचे एक फिचर दिले आहे. ज्या माध्यमातून काल रेकार्ड झाल्यास, ‘हा कॉल आता रेकॉर्ड केला जात आहे’ अशी सूचना दोन्ही बाजूने बोलत असलेल्यांना समजते व ते सावध होतात.

संबंधित बातम्या : 

Electric Scooter: मोबाईलने लॉक करा तुमची इलेक्ट्रिक स्कूटर… ओला इलेक्ट्रिकच्या ग्राहकांसाठी अपडेट फिचर

DSLR कॅमेरा: उन्हाळी सुटीत ‘फोटोग्राफी’चा प्लॅन करताय? त्यासाठीचे उत्तम पर्याय स्वस्तातले DSLR कॅमेरे..!

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल