AC on your bed | बजेटमध्ये बसेल असा बेड एअर कंडिशनर, खिडकीत नव्हे पलंगावर बसवा नि थंड व्हा!

तुम्हाला सामान्य एसी खरेदी करून पैसे खर्च करायचे नसतील तर आज आम्ही तुमच्यासाठी बेड एअर कंडिशनर घेऊन आलो आहोत. बेड एसी मजबूत कूलिंग देते, काही मिनिटांतच थंड होण्यास सुरुवात करते. शिवाय तुमच्या बजेटमध्ये अगदी फीट बसेल.

AC on your bed | बजेटमध्ये बसेल असा बेड एअर कंडिशनर, खिडकीत नव्हे पलंगावर बसवा नि थंड व्हा!
बेड एअर कंडिशनर
Image Credit source: tv 9
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Apr 23, 2022 | 2:25 PM

आजवर, तुम्ही स्प्लिट एअर कंडिशनर (Split air conditioner) आणि विंडो एअर कंडिशनर पाहिले असेलच. एक घराच्या खिडकीवर, तर दुसरा घराच्या आतल्या भिंतीवर (On the inner wall) बसवता येतो. जरी हे दोन्ही एअर कंडिशनर तुम्हाला थंडावा देण्यासाठी काही मिनिटे घेतात. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुमच्यासाठी एक असे एअर कंडिशनर घेऊन आलो आहोत, जो तुमच्या पलंगाच्या गादीवरच बसविता येते आणि त्यावर झोपल्याबरोबरच ते मजबूत थंडावा देऊ लागते. या संपूर्ण प्रक्रियेला अजिबात वेळ लागत नाही. तुम्ही घरात कुठेही असलात तरी हे एअर कंडिशनर तुमच्या पलंगाची गादी थंडगार करते. तुमच्यापैकी बहुतेकांना याबद्दल माहिती नसेल, म्हणून आज आम्ही तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये येणाऱ्या बेड एसीबाबत (About bed AC) सविस्तर माहिती सांगणार आहोत.

वाढत्या तापमानात एसीचे सुख

उन्हाळा सुरू झाला असून, राज्यभरात तापमान दिवसागणिक वाढत आहे. अशा परिस्थितीत उन्हापासून वाचण्यासाठी लोक एसीचा सहारा घेतात. परंतु असे करणे खूप महाग आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला एसीचा असा एक पर्याय सांगणार आहोत जो खूप स्वस्त आहे आणि तुम्हाला तो अर्ध्या दरात मिळेल. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने आता असा एसी बनविण्यात आला आहे की, तो तुम्हाला भिंतीवर किंवा खिडकीत नव्हे तर, चक्क तुमच्या पलंगावरच लावता येणार आहे. होय ऑनलाइन मार्केटमध्ये या बेड एअर कंडिशनरची सध्या जोरात चर्चा आहे. हा एसी, तुमच्या खोलीत ठेवलेल्या पलंगाच्या गादीवर लावले जातो आणि काही वेळातच तुमची गादी थंड होते. म्हणजेच कामावरून परतल्यावर गादीवर पडल्या पडल्या तुम्हाला एसीच्या थंड हवेचे सुख घेता येऊ शकते.

जाणून घ्या, काय आहे किंमत

नवीन तंत्रज्ञानाने बनवलेल्या बेड एअर कंडिशनरची किंमत साध्या AC पेक्षा खूपच कमी आहे. जिथे तुम्हाला स्प्लिट एअर कंडिशनर आणि विंडो एअर कंडिशनर ₹35000 ते ₹60000 मध्ये मिळतात, तिथे तुम्हाला हा बेड एअर कंडिशनर फक्त ₹15000 ते ₹16000 मध्ये मिळेल. हे कंडिशनर alibaba.com वरून सहज खरेदी करता येते.

हा एसी कसे कार्य करते

हा एअर कंडिशनर एक नसून दोन युनिटने बनलेला आहे. एकदा ही दोन युनिट्स पूर्ण झाली की हे एअर कंडिशनर पूर्ण होते. बेड एसी प्रत्यक्षात एका गादीसह येतो ज्याला ते कनेक्ट केले जाऊ शकते. पाईपच्या मदतीने, ते बेडवर वापरल्या जाणार्‍या एअर कंडिशनरच्या गादीला जोडले जाते. यानंतर एअर कंडिशनर थंड होऊ लागते. वास्तविक, ही थंड हवा थेट गादीच्या आत जाऊन गादीला थंड करते., त्यानंतर जर एखादी व्यक्ती त्या गादीवर झोपली तर, त्याला थंडी जाणवू लागते.

Amravati Shiv Sena | अमरावतीतील राणांच्या घरासमोर शिवसेनेचे कार्यकर्ते धडकले, राणांचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने

Navneet Rana : नवनीत राणा यांनी खासदार विकास निधीतला किती निधी खर्च केला? संपूर्ण आकडेवारी

9 वाजून गेले, राणा दाम्पत्याची घरातच प्रार्थना! घराबाहेर शिवसैनिकांचा घेराव, रवी राणांची पहिली प्रतिक्रिया

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें