BSNLचा ‘हा’ आहे ऑल इन वन प्लॅन, दररोज 3 जीबी हाय स्पीड डेटा आणि अमर्यादित कॉलिंग

बीएसएनएलच्या या एक उत्तम प्लॅनमध्ये 70 दिवसांची वैधतेसह दररोज 3 जीबी हाय-स्पीड डेटा मिळत आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या प्लॅनची किंमत जाणून घेऊयात.

BSNLचा हा आहे ऑल इन वन प्लॅन, दररोज 3 जीबी हाय स्पीड डेटा आणि अमर्यादित कॉलिंग
BSNL
Image Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Jun 25, 2026 | 6:00 AM

सरकारी मालकीची असलेली भारतातील टेलिकॉम कंपनी बीएसएनएल आज त्यांच्या लाखो वापरकर्त्यांसाठी परवडणारे प्रीपेड प्लॅन्स सादर करत असते. तसेच नवनवीन ऑफर लाँच करत कंपनी चर्चेत आहे. यापैकी एक 599 चा ऑल-इन-वन प्लॅन आहे, जो केवळ जास्त वैधताच नाही तर अधिक डेटादेखील देतो. जास्त डेटा वापरणाऱ्यांसाठी हा प्लॅन एक चांगला पर्याय ठरू शकतो. कंपनी या नवीन प्लॅनला कंपनीने ‘स्मार्ट वापरकर्त्यांसाठी स्मार्ट निवड’ म्हणून सादर करत आहे. जर तुम्हाला लॅाग्नटर्मसाठी एखादा रिचार्ज प्लॅन हवा असल्यास ही ऑफर तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरु शकते. चला या विशेष प्लॅनबद्दल अधिक जाणून घेऊयात.

बीएसएनएलच्या 599 प्लॅनचे फायदे

बीएसएनएलच्या 599 च्या प्रीपेड प्लॅनमध्ये अनेक आकर्षक फायदे आहेत. या प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो, ज्यामुळे संपूर्ण वैधतेच्या कालावधीत एकूण 210 जीबी डेटा मिळतो. मात्र, दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट पूर्णपणे खंडित होणार नाही; त्याऐवजी वेग 40 केबीपीएसपर्यंत कमी केला जाईल, ज्यामुळे मूलभूत कनेक्टिव्हिटी सुनिश्चित होईल.

अमर्यादीत कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे देखील उपलब्ध आहेत

या आकर्षक प्लॅनमध्ये केवळ डेटाच नाही, तर सर्व नेटवर्क्सवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधाही मिळत आहे. त्यासोबतच ग्राहकांना दररोज 100 एसएमएस देखील मिळतात. ज्या वापरकर्त्यांना कॉलिंग आणि मेसेजिंग सोबत अधिक डेटाची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन आदर्श ठरू शकतो.

वारंवार रिचार्ज करण्याची गरज नाही

मात्र या प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची 70 दिवसांची दीर्घ वैधता देण्यात आली आहे. या दीर्घ वैधतेमुळे वारंवार रिचार्ज करण्याची गरज भासत नाही. यामुळे हा प्लॅन विद्यार्थी, ऑनलाइन व्हिडिओ स्ट्रीमिंग, सोशल मीडिया, व्हिडिओ कॉलिंग आणि वर्क फ्रॉम होम सारख्या काम करणाऱ्या वापरकर्त्यांना यांच्यासाठी हे उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना वारंवार रिचार्ज करण्याचा त्रासही कमी होतो आणि जास्त इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरतो.

Follow Us