बजेटमध्ये फिट, फीचर्समध्ये सुपरहिट, लवकरच येणार सर्वात स्वस्त 5G फोन; कधी होणार लाँच?
लावाचा बजेट-फ्रेंडली 5जी नवीन स्मार्टफोन भारतात या दिवशी लाँच होणार आहे. यात ड्युअल रियर कॅमेरे आणि फ्लॅट डिझाइन आहे. तर हा नवीन 5जी मॉडेल ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय ठरेल, हा फोन कोणत्या किंमतीत आणि कोणत्या दिवशी लाँच केला जाईल त्याबद्दल जाणून घेऊयात.

लावा कंपनी त्यांचा नवीन 5जी स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहेत. क लावाच्या या फोनच्या 4जी व्हेरिएंटनंतर, लावा आता 5जी मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा फोन पुढील महिन्यात ग्राहकांसाठी भारतीय बाजारपेठेत सादर केला जाईल. कंपनीचा हा बजेट-फ्रेंडली 5जी स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर ॲमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल. ॲमेझॉनवर या फोनसाठी एक मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे, ज्यावर फोनच्या ड्युअल रियर कॅमेरा सेटअपबद्दल माहिती दिली आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण लावाच्या या फोनची लाँच तारीख आणि किंमत जाणून घेऊयात.
लावा बोल्ड एन2 5जी भारतात लाँच होण्याची तारीख
लावाने कंपनीने घोषणा केली आहे की, लावा बोल्ड एन2 5जी हा फोन भारतात 3 जून रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाईल. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवर या फोनसाठी एक विशेष मायक्रोसाइटदेखील सुरू करण्यात आली आहे. या मायक्रोसाइटवरून हे निश्चित झाले आहे की, लाँच झाल्यानंतर हा हँडसेट ॲमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. अँड्रॉइड 16 ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारा हा फोन निळ्या रंगात उपलब्ध असेल.
डिझाइनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास या आगामी लावा स्मार्टफोनमध्ये स्क्वेअर कॅमेरा मॉड्यूलसह एक फ्लॅट रिअर पॅनल असेल. कॅमेरा मॉड्यूल रिअर पॅनलच्या वरच्या-डाव्या कोपऱ्यात असेल. ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असलेल्या या फोनमध्ये 13-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असेल. पॉवर बटण आणि व्हॉल्यूम बटणे फोनच्या उजव्या बाजूला असतील.
4G व्हेरिएंट कधी आला आणि त्याची किंमत काय होती?
लावाच्या या 4जी फोन बद्दल बोलायचे झाल्यास लावा बोल्ड एन2 4जी हा फोन 17 फेब्रुवारी रोजी भारतात लॉन्च करण्यात आला होता. हा फोन 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटसाठी 7 हजार 499 रूपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. या फोनमध्ये 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट असलेला 6.75-इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे. यात युनिसॉक एससी9863ए प्रोसेसर आणि एक शक्तिशाली 5000mAh बॅटरी आहे. या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असून, त्यात 13-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
तर लावा बोल्ड एन2 5जी हा स्मार्टफोन भारतात लाँच झाल्यानंतरच या फोनची किंमत तसेच यातील फिचर्सबद्दल माहिती समोर येईल.