‘टिकटॉक’च्या पॅरेंट कंपनीने भारतातून गाशा गुंडाळला; वाचा कारण!

| Updated on: Jan 27, 2021 | 2:26 PM

टिकटॉक अॅपवर भारताने बंदी घातल्यानंतर टिकटॉकचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. (TikTok parent company ByteDance shutdown business in india)

टिकटॉकच्या पॅरेंट कंपनीने भारतातून गाशा गुंडाळला; वाचा कारण!
बाइटडान्स
Follow us on

नवी दिल्ली: टिकटॉक अॅपवर भारताने बंदी घातल्यानंतर टिकटॉकचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. भारतातील टिकटॉक अॅपवरील बंदीचा टिकटॉकच्या इतर कंपन्यांवरही परिणाम झाला आहे. टिकटॉकची पॅरेंट कंपनी असलेल्या बाइटडान्सने (ByteDance) भारतातील त्यांचा गाशा गुंडाळला आहे. गुडगाव येथे या कंपनीचं मुख्यालय असून कंपनीने त्यांचं कार्यालय बंद केलं आहे. तसेच कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचा अगाऊ पगार दिला आहे. त्यामुळे ही कंपनी आता भारतात व्यवसाय करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (TikTok parent company ByteDance shutdown business in india)

भारतात टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर या कंपनीने आता इतर देशांच्या दिशेने कूच केली आहे. भारतात टिकटॉकचा धंदा बसल्याने आता बाइटडान्सनेही आता भारतातून गाशा गुंडाळून इंडोनेशियासह दुसऱ्या ठिकाणी कूच करण्यास सुरुवात केली आहे.

कर्मचाऱ्यांना मेलवरून निर्णय कळवला

बाइटडान्स कंपनीने कर्मचाऱ्यांना मेल पाठवला आहे. आम्ही 29 जून 2020 पासून भारत सरकारच्या आदेशाचं पालन करण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक कायद्यांचं पालन करूनच आपले अॅप असावेत आणि काही अडचणी असतील तर त्या नियमाने दूर कराव्यात हा आमचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. मात्र, गेल्या सात महिन्यात आम्हाला दुसऱ्यांदा अॅप सुरू करण्याची काहीच कल्पना दिलेली नाही. अॅप सुरू करण्याची कधी परवानगी मिळेल याची काहीच शाश्वती नाही. त्यामुळे कामगार कपात केल्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरला नाही, असं कंपनीने या मेलमध्ये म्हटलं आहे.

का घेतला निर्णय?

भारतात टिकटॉकसह 58 अॅपवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच चिनी अॅपवर कायमस्वरुपी बंदी घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारने तशा नोटिसाही पाठवल्या आहेत. त्यामुळे बाइटडान्सनेही भारतातील कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. (TikTok parent company ByteDance shutdown business in india)

या कंपन्यांनी दिलेल्या प्रतिसाद आणि स्पष्टीकरणाने सरकार समाधानी नाही. त्यामुळे सरकारने या 59 अॅपवर बंदी घालण्याची तयारी सुरू केली आहे. त्यात बाइटडान्सचाही समावेश आहे. बंदी घालण्यासाठी सरकारने गेल्या आठवड्यात या कंपन्यांना नोटीसही बजावली होती. भारताचे सार्वभौमत्व, अखंडतेच्या विरोधात या अॅप्सच्या माध्यमातून कारवाया सुरू असल्याचं भारत सरकारनं म्हटलं होतं. तसेच या कंपन्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधीही देण्यात आली होती. मात्र, त्यावर समाधानकारक उत्तर आलेलं नाही. यापूर्वीही भारत सरकारने चिनी अॅपसह 208 अॅपवर बंदी घातलेली आहे. (TikTok parent company ByteDance shutdown business in india)

 

संबंधित बातम्या:

6000mAh ची बॅटरी आणि 48MP ट्रिपल रियर कॅमेरासाह Poco M3 लाँचिंगसाठी सज्ज

Xiaomi कडून या ढासू स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, स्वस्तात खरेदी करा प्रीमियम स्मार्टफोन

तब्बल 50 कोटी फेसबुक युजर्सचे फोन नंबर टेलिग्रामवर विकले जात असल्याचा दावा

(TikTok parent company ByteDance shutdown business in india)