तुमच्या मोबाईलचा स्फोट टाळण्यासाठी ‘हे’ कराच!

तुमच्या मोबाईलचा स्फोट टाळण्यासाठी 'हे' कराच!
फोन चार्ज करण्याची योग्य पद्धत कोणती? याबाबत अनेक लोक करतात चुका

मुंबई: चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावून झोपणं ही अनेकांची सवय आहे. मात्र रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावणं  अत्यंत धोकादायक आहे. अशा प्रकारामुळे अनेक ठिकाणी चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याचा घटना घडल्या आहेत. या स्फोटाने कित्येकांचे जीव गेलेत, तर अनेक घटनांमध्ये घर आणि प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान झालं. अशाप्रकारचा […]

सचिन पाटील

|

Jul 05, 2019 | 4:46 PM

मुंबई: चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावून झोपणं ही अनेकांची सवय आहे. मात्र रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावणं  अत्यंत धोकादायक आहे. अशा प्रकारामुळे अनेक ठिकाणी चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याचा घटना घडल्या आहेत. या स्फोटाने कित्येकांचे जीव गेलेत, तर अनेक घटनांमध्ये घर आणि प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान झालं.

अशाप्रकारचा धोका टाळण्यासाठी मोबाईल चार्जिंगला लावताना आवश्यक ती खबरदारी घ्यायलाच हवी.

मोबाईल चार्जिंग लावताना काय काळजी घ्यावी?

– मोबाईल कधीही रात्रभर चार्जिंगला लावून ठेवू नका. अनेकजण मोबाईल चार्जिंगला लावून झोपतात. त्यामुळे मोबाईल ओव्हरहिट अर्थात गरम होतो आणि त्याचा स्फोट होण्याची शक्यता असते.

– मोबाईल नेहमी त्या त्या कंपनीच्याच चार्जरने चार्ज करा. अन्य चार्जर वापरल्यामुळे तुमचा फोन हळूहळू चार्ज होतोच, शिवाय बॅटरीला धोका निर्माण होतो.

– मोबाईल चार्जिंग करता करता फोनवर अजिबात बोलू नका. स्पीकर फोन ऑन करुनही बोलू नका.  ते अत्यंत धोकादायक आहे. शिवाय चार्जिंग करताना मोबाईलवर व्हिडीओ बघणे किंवा गेम खेळणंही टाळा.

– चार्जिंगला लावल्यानंतर मोबाईल गरम होत असेल तर संबंधित मोबाईल कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन तपासून घ्या. त्यामुळे बॅटरीला नुकसान होऊ शकतं.

– मोबाईल संपूर्ण चार्ज झाल्यानंतर त्याचा चार्जर काढून ठेवा. मोबाईल 80 टक्के किंवा 90 टक्केच चार्ज आहे म्हणून तो दिवसभर चार्जिंगलाच लावून ठेवू नका.

– मोबाईल बॅटरी आयुष्य वाढवण्यासाठी, बॅटरी किमान 20 दिवसातून एकदा पूर्णत: डिस्चार्ज होऊ द्या. त्यानंतर पूर्ण चार्ज करा.

– आवश्यकता नसेल तेव्हा मोबाईल स्वीच ऑफ करुन ठेवा. जसे झोपताना, मीटिंगमध्ये. त्यामुळे मोबाईलची बॅटरी वाया जाणार नाही.

– व्हायब्रेशन मोडवर मोबाईल बॅटरी वेगाने संपते. त्यामुळे मोबाईल व्हायब्रेशनऐवजी कमी रिंगटोन मोडवर ठेवा.

– ब्लू टूथ, जीपीएस, वायफाय विनाकारण ऑन ठेवू नका. त्यामुळे मोबाईल बॅटरी तातडीने संपते.

– अनिमेशन्स थीम किंवा लाईव्ह वॉलपेपर स्क्रीनवर ठेवू नका, त्यामुळे बॅटरी जलद उतरते.

संबंधित बातम्या 

पिंपरीत चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट

शाओमीच्या फोनचा स्फोट, घरात आग लागून लाखोंचं नुकसान  

पेट्रोल पंपावर मोबाईलचा स्फोट का होतो? जाणून घ्या 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें