AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिंग वाजताच मोबाईलवर कॉलरचे दिसणार नाव, 1 नोव्हेंबरापासून मोठा बदल, निनावी कॉल करणार्‍यांना चाप

TRAI Decision: या 1 नोव्हेंबरपासून रिंग वाजताच मोबाईलवर कॉलरचे नाव दिसणार आहे. ट्रायने कॉलिंग नेम प्रेझेंटेनशन (CNAP) सेवा सक्तीची केली आहे. टेलिकॉम नोंदीनुसार, हे नाव दिसेल. यामुळे निनावी कॉल करणाऱ्यांना चाप बसेल. फसवेगिराला चाप बसेल.

रिंग वाजताच मोबाईलवर कॉलरचे दिसणार नाव, 1 नोव्हेंबरापासून मोठा बदल, निनावी कॉल करणार्‍यांना चाप
आता मोबाईल स्क्रीनवर कॉलरचे नाव दिसणार
| Updated on: Oct 15, 2026 | 12:19 PM
Share

मोबाईल युझर्सला येत्या 1 नोव्हेंबरपासून स्पॅम, बनावट आणि फसव्या कॉल्सपासून दिलासा मिळेल. आता मोबाईलची रिंग वाजताच निनावी फोन असला तरी नंबर ऐवजी कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव धिसले. दूरसंचार कंपनींच्या नवीन धोरणानुसार, नोंदवलेले अधिकृत नाव थेट झळकणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) कॉलिंग नेम प्रेझेंटेशन (CNAP) ही नवीन सेवा 1 नोव्हेंबरपासून अनिवार्य केली आहे. पण या सेवाचा एक फटकाही बसणार आहे. ज्यांनी त्यांच्या मित्राचे, मैत्रिणाचे मोबाईलमधील नाव मुद्दाम चुकीचे लिहिले आहे, त्यांचे पितळ उघडे पडण्याची शक्यता आहे.

कॉलिंग नेम प्रेझेंटेशन सेवा काय?

सध्या मोबाईल युझर्सला अनोळखी क्रमांकावरून कॉल आल्यास त्याची ओळख पटवण्यासाठी ट्रू कॉलर वा तत्सम थर्ड पार्टी ॲप्सचा सर्रास वापर करण्यात येतो. पण हे ॲप्स युझर्सच्या कॉन्टॅक्ट लिस्टवर आधारीत नाव दाखवतात अथवा चुकीचे नाव दाखवतात. निनावी क्रमांकासाठी हे ॲप भरवशाचे नाहीत. विशेष म्हणजे ते कॉन्टॅक्ट लिस्टचा डेटा चोरण्याची भीती असते.

आता काय होणार?

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानुसार, CNAP अंतर्गत जेव्हा तुम्हाला कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून कॉल येईल. तेव्हा कॉलरचे नाव हे त्याच्या केवायसी प्रक्रियेनुसार तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसेल. त्यासाठी ग्राहकांना आता थर्ड पार्टी ॲप्स डाऊनलोड करण्याची गरज उरणार नाही.

या निर्णयाचा युझर्सला मोठा फायदा

या सुविधेमुळे आता सायबर गुन्हेगार अथवा फेक कॉल करणारे लागलीच समोर येतील. आता फसवेगिरी करणाऱ्यांचे पितळ उघडे पडेल. अशा लोकांना ओळखणे सोपे होईल. त्यांच्याविषयी तक्रारही दाखल करता येईल. बँकिंग आणि विविध फसव्या योजनांची माहिती देऊन दिशाभूल करणारे, फसवणूक करणारे उघड होतील. क्रेडिट कार्ड, कर्ज आणि टेलिमार्केटिंग कॉल्सपासून सुटका होण्यासाठी या सुविधाचा मोठा वापर होईल.

या नवीन फीचरमुळे स्कॅम आणि स्पॅम कॉलची लागलीच ओळख होईल. नागरिकांची फसवणूक रोखणे आणि डिजिटल सुरक्षा वाढवण्यासाठी हे पाऊल टाकण्यात आले आहे. ही सेवाची सुरुवात 4G आणि 5G त्यावर आधारीत नेटवर्कवर सुरु होईल. यामुळे सामान्यांची खोट्या कॉलपासून सुटका होईल. त्यांना थर्ड पार्टी ॲप्सची गरज भासणार नाही.

आता कसं होणार?

विशेष म्हणजे हे फीचर आपोआप सुरू होईल. यामुळे लफडेबाजांचे धाबे दणाणणार आहे. कारण मोबाईलवर कुणाचा कॉल आला, त्या व्यक्तीचे नाव दिसेल. अनेकांनी वेगवेगळ्या नावांनी मोबाईलमध्ये नावं सेव्ह केलेले असते. पण आता स्क्रीनवर खरं नाव समोर येईल. परिणामी चोरी पकडली जाईल. लपवाछपवी करता येणार नाही.

Follow Us
ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
CJP : ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
Rahul Gandhi : सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुळे म्हणाल्या?
Supriya Sule : शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; राऊतांचं मोठं राजकीय भाकीत
Sanjay Raut : देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; संजय राऊतांचं मोठं राजकीय भाकीत, नेमकं काय म्हणाले?
यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
Sanjay Raut on Dasara Melava : यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश.....
Actor Imran Khan : अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे निर्देश?
सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; कोणत्या गोष्टींवर....
Sunil Tatkare | सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; नेमक्या कोणत्या गोष्टींवर झाली चर्चा?
अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला...
Anganwadi Sevika Bhaubeej Gift : अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला मिळणार एवढे पैसे
पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी....
Shivsena : पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी; नेमकं काय घडतंय? 
तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं
Yo Yo Honey Singh : तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं समन्स; पुढे काय होणार?