TRAI ने काम केलं सोपं, Truecaller ची गरज नाही! फोन आला की नाव दिसणार, No Spam Calls

आता मात्र सगळ्यांसाठीच एक खुशखबर आहे. आपल्याला फोन आला की तो फोन कुणाचाही असो, आपल्याला त्या व्यक्तीचं नाव दिसणारे.

TRAI ने काम केलं सोपं, Truecaller ची गरज नाही! फोन आला की नाव दिसणार, No Spam Calls
कानपूरमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला छेडलेImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 18, 2022 | 10:40 AM

नवी दिल्ली : आपण कितीही कामात असलो, कितीही बिझी असलो तरी आपण फोन आला तर आधी नेमका तो फोन कुणाचा आहे हे वेळ काढून बघतो. नंबर सेव्ह असेल तरच तो फोन उचलतो, नसेल तर आपण फोन उचलत नाही. सगळेच असं करतात असं नाही पण आपल्यातले बहुतांश लोक हेच करतात. का? फसवणूक! सुरक्षेच्या कारणास्तव आपण ही खबरदारी घेतो. आता मात्र सगळ्यांसाठीच एक खुशखबर आहे. आपल्याला फोन आला की तो फोन कुणाचाही असो, आपल्याला त्या व्यक्तीचं नाव दिसणारे. आहेना चांगली बातमी?

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) लवकरच अशा उपाययोजना सुरू करणार आहे, ज्यामुळे कॉल/रिंगिंग होत असताना रिसीव्हरच्या फोन स्क्रीनवर कॉलरचे नाव दिसणारे. कॉलरने सादर केलेल्या Know Your Customers (KYC) डेटाच्या आधारे हे नाव जोडले जाणारे. असे फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या अहवालात म्हटले आहे.

भारताच्या दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या या उपक्रमामुळे लोकांना खूप दिलासा मिळणार आहे. लोकांची चेष्टा करण्यासाठी केला जाणारा फोन, घोटाळा, फसवणूक यासाठी केल्या जाणाऱ्या फोन कॉल्सला आता चांगलाच चाप बसणार आहे.

‘ट्राय’च्या या निर्णयामुळे सर्व फोन घोटाळे मिटतीलच असे नाही तर त्यामुळे लोकांचा संपर्कसुद्धा मर्यादित होणार आहे. एकदा का ही कारवाई अंमलात आणली गेली की, कॉल रिसीव्हरला त्याच्या/तिच्या फोनवर कॉलरचे नाव सेव्ह केले गेले नसले तरी, टेलिकॉम ऑपरेटरला सादर केलेल्या नंतरच्या केवायसी रेकॉर्डनुसार कॉलरचे नाव पाहता येणारे.

कॉलर आयडेंटिटी या नवीन फीचरवर ट्राय काम करत आहे. हे फीचर सुरू झाल्यानंतर कॉल करणाऱ्या व्यक्तीचं नावदेखील मोबाइल स्क्रीनवर दिसणार आहे. हे नाव केवायसीनुसार असेल. ज्या व्यक्तीच्या नावावर सिम कार्ड असेल त्याचं नाव स्क्रीनवर दिसणार आहे.

यासंबंधीचा नियम लागू झाल्यानंतर युझर्सला अशा कॉलरचं नावदेखील स्क्रीनवर दिसेल, ज्याचा मोबाइल क्रमांक फोनमध्ये सेव्ह नसेल. यासाठी कोणतंही वेगळं अ‍ॅप डाउनलोड करावं लागणार नाही. ट्राय हे फीचर येत्या तीन आठवड्यांत रिलीज करू शकतं.

आतापर्यंत, Truecaller सारखे अ‍ॅप आपल्याला अशा पद्धतीची माहिती प्रदान करत असे. Truecaller ने गोळा केलेला डेटा क्राउडसोर्सिंगवर आधारित असल्याने त्यावर आपण पूर्णपणे विश्वास ठेवू शकत नाही. पण केवायसी बेस्ड सिस्टीमवर आपण विश्वास ठेवू शकतो. त्यामुळे “हा नंबर नेमका कुणाचा” यासाठी आता आपल्याला थर्ड पार्टी अ‍ॅपवर विसंबून राहावं लागणार नाही. ट्रायच्या पुढाकारामुळे हे शक्य होणार आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.