चॅट न उघडता WhatsApp चा मेसेज कसा वाचायचा? वापरा ‘ही’ भन्नाट ट्रिक

चॅट न उघडता WhatsApp चा मेसेज कसा वाचायचा? याबाबतची ट्रीक आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत (Tricks for to read WhatsApp message without open chat)

चॅट न उघडता WhatsApp चा मेसेज कसा वाचायचा? वापरा 'ही' भन्नाट ट्रिक
व्हॉट्सअॅपवर चॅट न उघडता वाचा संपूर्ण मेसेज
चेतन पाटील

|

Jan 25, 2021 | 7:24 PM

मुंबई : जगभरातील कोट्यवधी लोक व्हाट्सअ‍ॅप वापरतात. व्हाट्सअ‍ॅप हे अनेकांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. अनेक जण हातात मोबाईल घेतला की सर्वात आधी व्हाट्सअ‍ॅप उघडतात. पण बऱ्याचदा आपल्याला काही मेसेज चॅट न उघडता वाचण्याचा मोह होतो. यासाठी आम्ही तुम्हाला एक सोपी ट्रीक सांगणार आहोत (Tricks for to read WhatsApp message without open chat).

मोबाईलसाठी पहिली ट्रिक

बऱ्याचवेळा मेसेज येतो तेव्हा आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशन येतं. या नोटिफिकेशनला सविस्तर बघितलं तर चॅट न उघडता मेसेज वाचता येतात. ही ट्रिक अनेकांना माहिती असेलही. पण काही लोक नोटिफिकेशन बंद करुन ठेवतात. त्यामुळे कदाचित त्यांना तसे नोटिफिकेशन येत नसतील. पण या ट्रिकचा वापर करुनही मेसेज वापरता येतात (Tricks for to read WhatsApp message without open chat).

वाचा दुसरी ट्रिक

दुसरी ट्रिक अशी की तुम्ही डेस्कटॉपच्या आधारेदेखील चॅट न उघडता मसेज वाचू शकतात. यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल WhatsApp Web सोबत कनेक्ट करावा लागेल. तुम्हाला याबाबत माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती सांगतो.

व्हाट्सअ‍ॅप वेबवर तुम्हाला QR कोड स्कॅन करायचा असतो. या कोडला स्कॅन करण्यासाठी फोनमध्ये व्हाट्सअ‍ॅप खोलावं लागेल. व्हाट्सअ‍ॅप उघडल्यानंतर उजव्या बाजूला तीन डॉट असतील. त्यावर क्लिक करा. तिथे क्लिक केल्यावर तुम्हाला व्हाट्सअ‍ॅप वेब नावाचं ऑप्शन दिसेल. त्यानंतर तुम्हाला पीसीसोबत QR Code स्कॅन करावा लागेल. त्यानंतर तुमचं व्हाट्सअ‍ॅप डेस्कटॉपवर सुरु होईल.

डेस्कटॉपवर व्हाट्सअ‍ॅप वेब कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला येणारे मेसेज तुम्ही चॅट न उघडता वाचू शकता. तुम्हाला आणखी जास्त मेसेज चॅट न उघडता वाचायचे असतील तर तुम्ही कर्सरला खाली फिरवून वाचू शकता. याचा फायदा असा होईल की, समोरच्या व्यक्तिला तुम्ही मेसेज वाचलाय हे कळणार नाही आणि तुमचं मेसेज वाचूनही होईल.

हेही वाचा : व्हाट्सअ‍ॅपद्वारे लाखो कमवा, फक्त व्यवसायाच्या भिंगाने बघा, वाचा कसं?

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें