AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचा आधार क्रमांक लॉक करायचा असेल तर काय कराल?

नवी दिल्ली : आपला आधार क्रमांक सुरक्षित राहावा आणि त्याचा कुणीही दुरुपयोग करु नये म्हणून यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) एक नवे फिचर आणले आहे. या नव्या फिचरचा उपयोग करुन नागरिकांना आपला आधार क्रमांक लॉक किंवा अनलॉक करता येणार आहे. UIDAI ने नागरिकांचा आधार क्रमांक गुप्त आणि सुरक्षित राहावा यासाठी हे पाऊल उचलले आहे. […]

तुमचा आधार क्रमांक लॉक करायचा असेल तर काय कराल?
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM
Share

नवी दिल्ली : आपला आधार क्रमांक सुरक्षित राहावा आणि त्याचा कुणीही दुरुपयोग करु नये म्हणून यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) एक नवे फिचर आणले आहे. या नव्या फिचरचा उपयोग करुन नागरिकांना आपला आधार क्रमांक लॉक किंवा अनलॉक करता येणार आहे. UIDAI ने नागरिकांचा आधार क्रमांक गुप्त आणि सुरक्षित राहावा यासाठी हे पाऊल उचलले आहे. या फिचरचा उपयोग करुन आपला आधार क्रमांक लॉक किंवा अनलॉक करण्यासाठी तुम्ही खाली दिलेली मार्गांचा उपयोग करु शकता.

आधार क्रमांक लॉक किंवा अनलॉक करण्याचे 2 मार्ग

1. UIDAI ची वेबसाईट (uidai.gov.in) 2. UIDAI ला 1947 या क्रमांकावर SMS करुन

UIDAI च्या वेबसाईटवरुन आधार क्रमांक लॉक किंवा अनलॉक करण्यासाठीची पद्धत

पायरी 1 – सर्वात आधी www.uidai.gov.in वर जा.

पायरी 2- येथे आधार सर्विसेसमध्ये (Aadhaar services) ‘माय आधार’वर (My Aadhaar) जाऊन आधार लॉक/अनलॉकवर क्लिक करा

पायरी 3 – लॉक UID च्या पर्यायाला निवडा आणि तेथे आपली माहिती भरा. या ठिकाणी तुम्हाला आपला आधार क्रमांक, आधारवरील नाव, पिन कोड आणि सिक्युरिटी कोड द्यावा लागेल.

पायरी 4 – ही सर्व माहिती भरल्यानंतर Send OTP वर क्लिक करा. हा OTP आपल्या मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे येईल. OTP 10 मिनिटांसाठीच वैध असेल.

पायरी 5 – OTP टाकून सबमिट बटनावर क्लिक करा.

पायरी 6 – आता तुम्ही सबमिट बटनावर क्लिक केले की तुमचा आधार क्रमांक लॉक होईल.

आधार क्रमांक अनलॉक करण्याची पद्धत

पायरी 1 – सर्वात आधी www.uidai.gov.in वर जा.

पायरी 2- येथे आधार सर्विसेसमध्ये (Aadhaar services) ‘माय आधार’वर (My Aadhaar) जाऊन आधार लॉक/अनलॉकवर क्लिक करा

पायरी 3 – येथे अनलॉक UID पर्याय निवडा आणि प्रथम तयार केलेला व्हर्चुअल ID आणि सिक्युरिटी कोड टाका.

पायरी 4 – आता Send OTP वर क्लिक करा. हा OTP तुमच्या मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे येईल. OTP 10 मिनिटांपर्यंत वैध असेल.

पायरी 5 – आता OTP टाका आणि सबमिटवर क्लिक करा.

पायरी 6 – यानंतर आधार क्रमांक अनलॉक होईल.

जर तुमच्याकडे इंटरनेट नसेल तर तुम्ही SMS द्वारे आपला आधार क्रमांक लॉक/अनलॉक करु शकता.

SMS द्वारे आधार क्रमांक लॉक करण्याची पद्धत

पायरी 1 – OTP मिळवण्यासाठी तुमच्या रजिस्टर मोबाइल क्रमांकावरुन 1947 वर “GETOTP (आधार क्रमांकाचे शेवटचे 4 अंक)” हा SMS पाठवा. उदाहरणार्थ जर तुमचा आधार क्रमांक 1234 5678 9876 आहे. तर तुम्हाला GETOTP 9876 हा SMS 1947 वर पाठवावा लागेल.

पायरी 2 – तुम्ही SMS पाठवला की UIDAI तुम्हाला SMS द्वारे 6 अंकी OTP पाठवेल.

पायरी 3 – त्यानंतर तुम्हाला आणखी एक SMS पाठवावा लागेल. हा SMS “LOCKUID (आधार क्रमांकाचे शेवटचे 4 अंक आणि 6 अंकी OTP)” या स्वरुपात पाठवावा लागेल.

तुम्ही हा SMS 1947 वर पाठवला की UIDAI तुमचा आधार क्रमांक लॉक करेल. त्यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशन मेसेज येईल.

SMS द्वारे आधार क्रमांक अनलॉक करण्याची पद्धत पायरी 1 – OTP मिळवण्यासाठी रजिस्टर मोबाईल क्रमांकावरुन 1947 वर SMS पाठवा. SMS चे स्वरुप “GETOTP (वर्चुअल ID क्रमांकाचे शेवटचे 6 अंक)”

पायरी 2 – SMS पाठवल्यानंतर UIDAI 6 अंकी OTP पाठवेल.

पायरी 3 – आधार क्रमांक अनलॉक करण्यासाठी आता दूसरा SMS पाठवा. तो SMS “UNLOCKUID (वर्चुअल ID चे शेवटचे 6 अंक 6 अंकी OTP)”

हा SMS 1947 क्रमांकावर पाठवला की UIDAI तुमचा आधार क्रमांक अनलॉक करेल. याबाबत तुमच्याकडे एक कन्फर्मेशन मेसेजही येईल.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...