‘भारतीय टॅलेंटचा अमेरिकेला फायदा’, Parag Agrawal ट्विटरचे सीईओ बनल्यानंतर Elon Musk यांची प्रतिक्रिया

| Updated on: Nov 30, 2021 | 10:52 AM

भारतीय वंशाचे पराग अग्रवाल आता ट्विटरचे नवे सीईओ बनले आहेत, सोमवारी संध्याकाळी माजी सीईओ जॅक डॉर्सी यांनी पराग अग्रवाल यांची ट्विटरचे सीईओ म्हणून नियुक्तीची घोषणा केली.

भारतीय टॅलेंटचा अमेरिकेला फायदा, Parag Agrawal ट्विटरचे सीईओ बनल्यानंतर Elon Musk यांची प्रतिक्रिया
Elon Musk - Parag Agrawal
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय वंशाचे पराग अग्रवाल आता ट्विटरचे नवे सीईओ बनले आहेत, सोमवारी संध्याकाळी माजी सीईओ जॅक डॉर्सी यांनी पराग अग्रवाल यांची ट्विटरचे सीईओ म्हणून नियुक्तीची घोषणा केली. अमेरिकेतील अनेक बड्या सॉफ्टवेअर कंपन्यांची कमान भारतीयांच्या हाती आहे आणि आता यात पराग अग्रवाल यांचे नावही जोडले गेले आहे. इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विटरच्या सीईओपदी पराग अग्रवाल यांच्या नियुक्तीवर प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय प्रतिभेचा अमेरिकेला खूप फायदा होत असल्याचं इलॉन मस्क यांनी म्हटलं आहे. (US benefits greatly from Indian talent : Elon Musk on Parag Agrawal’s appointment as Twitter CEO)

जगभरातील सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये आघाडीवर असलेले बहुतेक भारतीय वंशाचे लोक भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्येच शिकलेले आहेत. पराग अग्रवाल आयआयटी बॉम्बेमधून बीटेक करुन बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी मिळवली. पराग अग्रवाल हे 2017 पासून ट्विटरवर मुख्य तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यरत होते.

Stripe Company चे सीईओ आणि सह-संस्थापक Patrick Collison यांच्या ट्विटला उत्तर देताना इलॉन मस्क यांनी लिहिले की, “भारतीय प्रतिभेचा अमेरिकेला खूप फायदा झाला आहे.”

पॅट्रिक कॉलिसन यांनी पराग अग्रवाल यांचे अभिनंदन करताना ट्विट केले आहे की, “Google, Microsoft, Adobe, IBM, Palo Alto, Networks आणि आता Twitter चालवणारे सर्व CEO भारतात मोठे झाले आहेत. टेकच्या जगात भारतीयांचे अद्भूत यश पाहून आनंद होत आहे. परागचे अभिनंदन.

या ट्विटला टेक एक्सपर्ट इलॉन मस्क यांनी उत्तर दिले. पॅट्रिक कॉलिसन यांच्याशी सहमती दर्शवत त्यांनी भारतीय प्रतिभेचे कौतुक केले.

जगातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांचे प्रमुख सध्या भारतीय वंशाचे लोक आहेत, Google चे CEO सुंदर पिचाई आहेत आणि Microsoft चे CEO सत्या नडेला आहेत. याशिवाय Adobe, IBM आणि Palo Alto नेटवर्कची कमानही भारतीय वंशाच्या लोकांच्या हातात आहे.

जॅक डॉर्सी यांचा राजीनामा, म्हणाले मला परागवर विश्वास

जॅक डोरसी यांच्या राजीनाम्यानंतर पराग अग्रवाल ट्विटरचे सीईओ बनले आहेत. तर डोरसी यांनी आपल्या राजीनाम्यानंतर आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. मला पारगवर पूर्ण विश्वास आहे. त्याची मागील दहा वर्षातील कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. त्याच्यातील कौशल्य आणि प्रतिभेचा माझ्यावर कायमच प्रभाव राहिलेला आहे, असे मत व्यक्त केलेय.

विश्वास दर्शवल्याबद्दल आभार

दरम्यान, सीईओ पदावर नियुक्ती झाल्यानंतर पराग यांनी जॅक डॉर्सी यांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच जॅक आणि मी चांगले मित्र आहोत. अजूनही आमच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे जॅकचे आभार मानतो. माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे मी खरच जॅक यांचे आभार मानतो असे पराग यांनी म्हटले आहे.

इतर बातम्या

Parag Agrawal | पक्के मुंबईकर ते ट्विटरच्या सीईओपदी, कोण आहेत पराग अग्रवाल? कसे पोहोचले सर्वोच्चपदी?

NSO कडून आयफोन युजर्सची हेरगिरी? Apple चा पेगासस निर्मात्यांविरोधात खटला

GoDaddy Hacked : तब्बल 12 लाख वर्डप्रेस यूजर्सचा डेटा चोरी, जाणून घ्या डिटेल्स

(US benefits greatly from Indian talent : Elon Musk on Parag Agrawal’s appointment as Twitter CEO)