NSO कडून आयफोन युजर्सची हेरगिरी? Apple चा पेगासस निर्मात्यांविरोधात खटला

स्मार्टफोन लोकांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट बनल्यापासून जगात हेरगिरी आणि फसवणुकीचा व्यवसाय वेगाने फोफावत आहे. स्मार्टफोन युजर्सची गोपनीयता नेहमीच सायबर ठगांचे मुख्य टार्गेट असते.

NSO कडून आयफोन युजर्सची हेरगिरी? Apple चा पेगासस निर्मात्यांविरोधात खटला
Apple - Pegasus - NSO group
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 10:49 PM

Apple Sues Pegasus Spyware Maker : स्मार्टफोन लोकांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट बनल्यापासून जगात हेरगिरी आणि फसवणुकीचा व्यवसाय वेगाने फोफावत आहे. स्मार्टफोन युजर्सची गोपनीयता नेहमीच सायबर ठगांचे मुख्य टार्गेट असते. युजर्सच्या बँकिंग अॅक्टिव्हिटींवर लक्ष ठेवण्याबरोबरच, सायबर ठग युजर्सच्या सोशल मीडिया प्रोफाइलचा वापर हेरगिरी आणि फसवणूक करण्यासाठी करत आहेत. (NSO spying on iPhone users, Apple sues Pegasus maker)

असेच एक प्रकरण अमेरिकेतून समोर आले आहे. वास्तविक, एक इस्रायली सायबर कंपनी अमेरिकेतील Apple युजर्सचे फोन टार्गेट करत होती. ज्याची माहिती मिळताच Apple कंपनीत खळबळ उडाली आहे आणि Apple ने इस्रायली सायबर कंपनी NSO विरोधात खटला भरला आहे. Apple चे म्हणणे आहे की, एनएसओ ग्रुपने आयफोन युजर्सची हेरगिरी केली आहे.

Apple चा NSO ग्रुपविरोधा खटला

Apple ने इस्रायलच्या सायबर कंपनी NSO वर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी न्यायालयात मांडली आणि सांगितले की NSO ग्रुपवर बंदी घालावी अशी आमची इच्छा आहे, जेणेकरून हा ग्रुप आमचे सॉफ्टवेअर, सेवा आणि डिव्हाईसेस वापरून युजर्सच्या डेटामध्ये घुसखोरी करू शकणार नाहीत. Apple चा आरोप आहे की NSO ने पेगाससच्या (Pegasus) माध्यमातून 1.65 अब्ज युजर्सची हेरगिरी केली आहे, ज्यात एक अब्जाहून अधिक आयफोन युजर्स आहेत.

NSO ने सर्व आरोप फेटाळून लावले

ही बाब समोर आल्यानंतर अमेरिकेपासून जगभरातील देशांपर्यंत आयफोन यूजर्सची चिंता वाढली आहे. त्यांची महत्त्वाची माहिती लीक झाल्यामुळे लोक चिंतेत आहेत. अॅपलने युजर्सला कंपनीचे डिव्हाईस सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर एनएसओ ग्रुपने त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दहशतवाद आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आमचे सॉफ्टवेअर वापरले जाते, असे या ग्रुपचे म्हणणे आहे, आम्ही आमचे सॉफ्टवेअर हेरगिरीसाठी वापरले नाही नाही.

भारतातही हेरगिरीचे आरोप

पेगासस (Pegasus) बनवणारा NSO ग्रुप गेल्या अनेक दिवसांपासून वादात आहे. या ग्रुपविरोधात भारतातही सॉफ्टवेअरद्वारे अॅक्टिविस्ट, पत्रकार आणि राजकारण्यांची हेरगिरी केल्याचा आरोप अनेक वेळा करण्यात आला आहे. पेगासस हेरगिरी प्रकरणाचा तपास भारतातही सुरू आहे.

इतर बातम्या

जगातील पहिला 18GB रॅम स्मार्टफोन ‘या’ दिवशी लॉन्च होणार, जाणून घ्या याची खासियत

तुम्हीही फेसबुक, गूगल अकाऊंटसाठी ‘हा’ पासवर्ड वापरत नाही ना? काही सेकंदात होऊ शकतो हॅक

आता गूगल पे सह पैशाचे व्यवहार सोपे होणार, मिळतील उत्कृष्ट वैशिष्ट्ये

(NSO spying on iPhone users, Apple sues Pegasus maker)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.