AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

12GB/256GB, Zeiss T कोटिंगसह 50MP कॅमेरा, Vivo चा शानदार स्मार्टफोन बाजारात, किंमत…

Vivo X70 सिरीज गेल्या आठवड्यात भारतात अधिकृतपणे लाँच झाली आहे. याअंतर्गत X70 Pro आणि X70 Pro + हे दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आले आहेत.

12GB/256GB, Zeiss T कोटिंगसह 50MP कॅमेरा, Vivo चा शानदार स्मार्टफोन बाजारात, किंमत...
Vivo X70
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Oct 08, 2021 | 10:58 PM
Share

मुंबई : Vivo X70 सिरीज गेल्या आठवड्यात भारतात अधिकृतपणे लाँच झाली आहे. याअंतर्गत X70 Pro आणि X70 Pro + हे दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आले आहेत. Vivo X70 सिरीजसाठी कंपनीने Zeiss सोबत भागीदारी केली आहे. म्हणजेच, आता फोनच्या सर्व कॅमेरा लेन्स नवीन Zeiss T लेन्स कोटिंगसह येतील. त्याच्या मदतीने तुम्ही आता नॅचरल फोटो क्लिक करु शकाल. दरम्यान, Vivo X70 सिरीजची विक्री आजपासून सुरू झाली आहे. तर प्री-बुकिंग लाँचिंगपासूनच सुरु आहे. (Vivo X70 Series With 50MP Gimbal Camera, 120Hz Display, Sale Live in India, know Price, Specs)

Vivo X70 Pro ची सुरुवातीची किंमत 46,990 रुपयांपासून सुरू होत आहे, ज्यामध्ये तुम्हाला 8 GB RAM आणि 128 GB स्टोरेज पर्याय मिळेल. तर 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 49,990 रुपये असेल. त्याचबरोबर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 52,990 रुपये आहे. X70 प्रो ची विक्री आजपासून (8 ऑक्टोबर) सुरू झाली आहे. Vivo X70 Pro + ची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये आहे ज्यात तुम्हाला 12 GB RAM आणि 256 GB स्टोरेज पर्याय मिळेल. तुम्ही सेलमध्ये 12 ऑक्टोबरपासून हा फोन खरेदी करू शकता.

फोनचे फीचर्स

X70 प्रो 6.5-इंच फुल एचडी+ डिस्प्लेसह येतो. ही एक AMOLED स्क्रीन आहे ज्याचा कमाल रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोनमध्ये सर्व नवीन फ्लोराईट एजी कोटिंग देण्यात आले आहे जेणेकरून वापरकर्त्यांना स्मूद अनुभव मिळेल. कंपनीने यात फिंगरप्रिंट दिलेले नाही. 3D कर्व्ड डिस्प्ले X70 सिरीजसाठी उपलब्ध आहे.

फोन दोन रंग पर्यायांमध्ये येतो ज्यात तुम्हाला ऑरोरा डॉन आणि कॉस्मिक ब्लॅक मिळेल. फोन MediaTek Dimensity 1200 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास हा फोन 50 मेगापिक्सेल सेन्सर सह येतो. त्याच वेळी, यात दोन 12 मेगापिक्सेल कॅमेरे आणि 8 मेगापिक्सेल पेरिस्कोप लेन्स आहे. कॅमेरा गिंबल स्टॅबिलायझेशनसह येतो, जो तुम्हाला मुख्य कॅमेरा म्हणजेच 50 मेगापिक्सेलमध्ये मिळतो. सर्व कॅमेऱ्यांमध्ये Zeiss T कोटिंग देण्यात आले आहे.

फोनमधील आणखी काही वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात तुम्हाला डेडिकेटेड पोर्ट्रेट मोड, प्रो सिनेमॅटिक मोड आणि नवीन रिअल टाइम एक्सट्रीम नाईट व्हिजन मोड मिळेल. डिव्हाइसमध्ये 4450mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 44W फ्लॅश चार्जला सपोर्ट करतो. तसेच यात 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Vivo X70 प्रो+ चे फीचर्स

Vivo X70 Pro + मध्ये 6.78-इंच UHD स्क्रीन आहे जी AMOLED डिस्प्लेसह येते. यात 20: 9 आस्पेक्ट रेशियो आहे आणि 120Hz च्या डायनॅमिक रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात स्नॅपड्रॅगन 888+ प्रोसेसर आहे. Vivo हे डिव्हाईस भारतात फक्त एका व्हेरिएंटमध्ये लॉन्च करत आहे जे 12 GB RAM आणि 256 GB स्टोरेजसह येते.

कंपनीने याच्या कॅमेऱ्यात मोठा बदल केला आहे. यामध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी शूटर कॅमेरा मिळतो जो सॅमसंग जीएन 1 सेन्सर वापरुन बनवलेला आहे. यात 48 मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा देखील आहे. यात 12 मेगापिक्सेल पोर्ट्रेट कॅमेरा, 8 मेगापिक्सेल पेरिस्कोप कॅमेरा आहे. पेरिस्कोप कॅमेरा 5x ऑप्टिकल झूम, 60x सुपरझूम आणि OIS ला सपोर्ट करतो. यात 50 मेगापिक्सेल गिम्बल स्टेबलायझेशन तंत्रज्ञान देखील मिळते. Vivo X70 Pro+ कंपनीच्या V1 इमेजिंग टिपसह येतो.

डिव्हाइसमध्ये 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 55W फास्ट चार्जला सपोर्ट करतो. यामध्ये 50W वायरलेस फ्लॅश चार्जर सपोर्ट देण्यात आला आहे. वायरलेस फास्ट चार्जर स्वतंत्रपणे 4990 रुपयांना खरेदी करावा लागेल.

इतर बातम्या

6GB/256GB, 50 MP कॅमेरासह ओप्पोचा किफायतशीर स्मार्टफोन लाँच, अमेझॉनवर डिस्काऊंट

8-inch HD डिस्प्ले, दमदार प्रोसेसरसह Moto Tab G20 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Flipkart Big Billion Days 2021 : Flipkart बिग बिलियन डेज 2021 मध्ये उपलब्ध असलेले टॉप स्मार्टफोन्स

(Vivo X70 Series With 50MP Gimbal Camera, 120Hz Display, Sale Live in India, know Price, Specs)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?