Vivo X70 सिरीज 30 सप्टेंबरला भारतात लाँच होणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Vivo ने आपला लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार असल्याची पुष्टी केली आहे. कंपनीने Vivo X70 सिरीजसाठी Vivo India वेबसाइटवर एक डेडिकेटेड वेबपेज बनवले आहे.

Vivo X70 सिरीज 30 सप्टेंबरला भारतात लाँच होणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 5:12 PM

मुंबई : Vivo ने आपला लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार असल्याची पुष्टी केली आहे. कंपनीने Vivo X70 सिरीजसाठी Vivo India वेबसाइटवर एक डेडिकेटेड वेबपेज बनवले आहे. वेबपेज नवीन Vivo स्मार्टफोनच्या लॉन्च डेटची पुष्टी करते आणि त्यानुसार, X70 सिरीज 30 सप्टेंबरला भारतात लॉन्च केली जाईल. (Vivo X70, Vivo X70 Pro, Vivo X70 Pro+ India Launch announced for September 30)

Vivo ने X70 सिरीज या महिन्याच्या सुरुवातीला चीनमध्ये त्यांची लेटेस्ट टॉप-टियर सिरीज म्हणून सादर केली. या सिरीजमध्ये तीन नवीन मॉडेल्स समाविष्ट आहेत, ज्यात Vivo X70, Vivo X70 Pro आणि Vivo X70 Pro Plus चा समावेश आहे. स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी उत्कृष्ट वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत जसे क्वाड-कॅमेरा सेटअप, पॉवरफुल प्रोसेसर आणि फास्ट चार्जिंग सपोर्टसह मोठी बॅटरी देण्यात आली.

तथापि, त्या वेळी हे डिव्हाइसेस फक्त चीनमध्ये लाँच करण्यात आले होते आणि स्मार्टफोनची ग्लोबल अवेलेबिलिटी उघड केली गेली नव्हती. या आठवड्याच्या सुरुवातीला असे दिसून आले की नवीन Vivo स्मार्टफोन सप्टेंबर महिन्यात भारतात लाँच होणार आहे आणि कंपनीने आता याची पुष्टी केली आहे. शिवाय लाँचिंग डेटदेखील सांगितली आहे.

Vivo India ने आपल्या वेबसाइट आणि सोशल मीडिया चॅनेलवर नवीन X70 सिरीजचे टीझर पोस्टर शेअर केले आहेत. वेबसाइटवर, एक रिवर्स काउंट सुरु आहे, ज्याद्वारे इंडिया लाँचिंग डेट आणि वेळ जवळ असल्याचे दिसते. भारतात Vivo X70 सिरीजचा लॉन्चिंग कार्यक्रम 30 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता होईल, असे कंपनीकडून अधिकृतपणे सांगण्यात आले आहे.

सिरीजमध्ये टॉप-ऑफ़-द-लाइन Vivo X70 Pro+ मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्लस चिपसेट दिला जाईल असे संकेत कंपनीने दिले आहेत. जर स्मार्टफोन 30 सप्टेंबरला Vivo X70 सोबत भारतामध्ये पदार्पण करत असेल तर लेटेस्ट क्वालकॉम फ्लॅगशिप चिपसेट असणारा हा देशातील पहिला फोन असेल. याशिवाय, विवो स्मार्टफोन क्वाड-कॅमेरा सेटअप, 120 हर्ट्ज डिस्प्ले, 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेजसह लाँच होईल.

इतर बातम्या

ट्रिपल कॅमेरा, 5050mAh बॅटरी, नोकियाचा किफायतशीर स्मार्टफोन बाजारात

डुअल फ्लॅशसह सेल्फी, 5000mAh बॅटरी, 64GB स्टोरेजसह 7 हजारांच्या रेंजमध्ये दमदार स्मार्टफोन लाँच

सुरु होतोय Flipkart Big Billion Days सेल, ‘या’ प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिस्काऊंट, जाणून घ्या सर्वकाही

(Vivo X70, Vivo X70 Pro, Vivo X70 Pro+ India Launch announced for September 30)

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.