उत्कृष्ट डिस्प्ले आणि कॉम्पॅक्ट डिझाइनसह ‘या’ लॅपटॉपवर आहे धमाकेदार ऑफर!

नवीन लॅपटॉप घेण्याचा विचार करीत असाल तर ही कंपनी घेऊन आलेली आहे उत्कृष्ट फीचर्ससह जबरदस्त ऑफर. ऑनलाईन देखील उपलब्ध आहे.

उत्कृष्ट डिस्प्ले आणि कॉम्पॅक्ट डिझाइनसह 'या' लॅपटॉपवर आहे धमाकेदार ऑफर!
लॅपटॉप
Image Credit source: Social Media
नितीश गाडगे

|

Sep 21, 2022 | 8:13 PM

मुंबई, तुम्ही जर नवीन लॅपटॉप घारेदी करण्याच्या विचारात असाल तर Asus एक चांगला पर्याय घेऊन आलेला आहे.  लॅपटॉप ब्रँड Asus ने आपला नवीन लॅपटॉप Vivobook 14 Touch (X1402) भारतात लॉन्च केला आहे. हा लॅपटॉप टच कंट्रोल फीचरसह सादर करण्यात आला आहे. या 12व्या जनरेशनच्या लॅपटॉपमध्ये Intel Core i5-1240P प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आलेला आहे.  तसेच या लॅपटॉपला 16 GB RAM सह 512 GB पर्यंत स्टोरेजला सपोर्ट करते. चला तर मग जाणून घेऊया  या लॅपटॉपची किंमत आणि इतर वैशिष्ट्यांबद्दल.

काय आहे किंमत?

हा Asus लॅपटॉप ब्लू आणि सिल्व्हर रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे. भारतात Asus Vivobook 14 Touch (X1402) ची सुरुवातीची किंमत 49,990 रुपये ठेवण्यात आली आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून लॅपटॉप खरेदी करता येईल.

स्पेसिफिकेशन्स काय आहे?

Asus Vivobook 14 Touch (X1402) मध्ये 14-इंचाचा फुलएचडी प्लस आयपीएस डिस्प्ले आहे. डिस्प्लेसह टच कंट्रोल आणि 178 डिग्री व्ह्यूइंग अँगलसाठी सपोर्ट आहे. लॅपटॉपमध्ये 12th Gen Intel Core i5-1240P प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच, लॅपटॉप 16 GB RAM सह 512 GB पर्यंत PCI Gen 3 SSD स्टोरेजला सपोर्ट करतो. पूर्ण लांबीचा बॅकलिट चिक्लेट कीबोर्ड लॅपटॉपसह समर्थित आहे आणि सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर समर्थित आहे.

हे सुद्धा वाचा

बॅटरी

लॅपटॉपला 42Wh बॅटरीचा पाठिंबा आहे, जो 65W द्रुत चार्जिंगसह येतो. Asus Vivobook 14 Touch (X1402) कनेक्टिव्हिटीसाठी USB 3.2 Gen 1 Type-C पोर्ट, USB 3.2 Gen 1 Type-A पोर्ट, HDMI 1.4 पोर्ट आणि 3.5mm ऑडिओ जॅकला सपोर्ट करते. लॅपटॉपचे वजन 1.4 किलो आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें