AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 रुपयात मिळणार 4999 रुपयांचा रिचार्ज, ‘या’ कंपनीने आणली खास ऑफर, 16 OTT Apps मिळणार

तु्म्ही जर व्होडाफोन-आयडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी खास बातमी आहे. कंपनीचा 4999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन तुम्हाला 1 रुपयांत मिळू शकतो. या खास प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे.

1 रुपयात मिळणार 4999 रुपयांचा रिचार्ज, 'या' कंपनीने आणली खास ऑफर, 16 OTT Apps मिळणार
Recharge
| Updated on: Aug 24, 2025 | 7:21 PM
Share

तु्म्ही जर व्होडाफोन-आयडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी खास बातमी आहे. कंपनीचा 4999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन तुम्हाला 1 रुपयांत मिळू शकतो. या खास प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. कंपनीने त्यांच्या अधिकृत ब्लॉग पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे व्होडाफोन-आयडियाने काही काळापूर्वी देशातील अनेक शहरांमध्ये 5जी सेवा सुरू केली आहे. आता कंपनी आगामी काळात संपूर्ण देशात ही सेवा सुरु करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

काय आहे ऑफर ?

व्होडाफोन-आयडियाने आपल्या ब्लॉग-पोस्टमध्ये म्हटले आहे की, युजर्स VI अ‍ॅपद्वारे या ऑफरचा फायदा घेऊ शकतात. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी अॅप उघडल्यानंतर गॅलेक्सी शूटर्स गेम लाँच करावे लागेल. यात युजर्सना ड्रोन खाली पाडून जेम्स गोळा करावे लागणार आहे. जास्तीत जास्त जेम्स गोळा केल्यानंतर युजर्सना 1 रुपयांत 4999 रुपयांचा वार्षिक रिचार्ज प्लॅन जिंकण्याची संधी मिळणार आहे.

VI कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले की, 25 जेम्स जिंकणाऱ्या ग्राहकाला 50 रुपयांचे अमेझॉन गिफ्ट व्हाउचर मिळेल. एकूण 300 विजेत्यांना याचा लाभ घेता येईल. तसेच 75 जेम्स जिंकणाऱ्यांना 1 रुपयांत 10 जीबी डेटा आणि व्ही मूव्हीज अँड टीव्ही अॅपद्वारे 16 ओटीटी अॅप्सचा अॅक्सेस दिला जाईल. मात्र फक्त 30 विजेत्यांनाच याचा फायदा घेता येणार आहे.

त्याचबरोबर 150 जेम्स जिंकणाऱ्या 30 ग्राहकांना 1 रुपयांत 50 जीबी डेटा पॅक दिला जाईल, याची किंमत 348 रुपये आहे. तसेच 300 जेम्स जिंकणाऱ्यांना 1 रुपयांत 4999 रुपयांचा वार्षिक रिचार्ज मिळेल. यात ग्राहकांना अमेझॉन प्राइमसह 16 ओटीटी अॅप्सचा अॅक्सेस मिळेल. केवळ 15 विजेत्यांनाच हा लाभ मिळणार आहे. 31 ऑगस्ट 2025 पर्यंत ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.

4999 ​​रुपयांचा प्लॅन

व्होडाफोन-आयडियाचा हा खास प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच दररोज 5 GB जीबी हाय स्पीड डेटा मिळेल. तसेच दररोज 100 मोफत एसएमएस मिळतील. तसेच या प्लॅनमध्ये संपूर्ण वर्षासाठी अमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शन मिळणार आहे.

पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट.
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष.