AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ही’ सोपी पद्धत वापरून तुमच्या हॉटेल रूममध्ये छुपे कॅमेरे पटकन शोधा

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या प्रायव्हसीसाठी ही खबरदारी अत्यावश्यक आहे. लपलेले कॅमेरे केवळ माहिती चोरीसाठीच नव्हे तर ब्लॅकमेल किंवा सोशल मीडिया लीकसारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी वापरले जाऊ शकतात. त्यामुळे ही ट्रीक वापरा

'ही' सोपी पद्धत वापरून तुमच्या हॉटेल रूममध्ये छुपे कॅमेरे पटकन शोधा
| Edited By: | Updated on: May 14, 2025 | 2:47 PM
Share

फिरण्यासाठी नवनवीन ठिकाणांचे प्लॅनींग करताना, तुम्ही हॉटेल बुकिंग करत असालच. प्रवासातील आराम आणि नवीन ठिकाणी मिळणाऱ्या हॉटेलमधील सुविधांचा आनंद काही वेगळाच असतो. मात्र, याच अनुभवात कधी कधी गोपनीयतेचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो, कारण काही ठिकाणी खोल्यांमध्ये लपवलेले कॅमेरे बसवले गेलेले असण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत काळजी घेणं आणि आवश्यक ती खबरदारी घेणं फार महत्त्वाचं ठरतं.

तुमचा स्मार्टफोन हाच अशा धोका टाळण्याचं प्रभावी माध्यम ठरू शकतो. अनेकांना माहिती नसते, पण स्मार्टफोनचा वापर करून तुम्ही लपलेले कॅमेरे सहज शोधू शकता. यासाठी काही सोप्या ट्रिक्स तुम्हाला उपयोगी पडतील.

१. सर्वप्रथम, खोलीतील लाईट बंद करा आणि तुमच्या स्मार्टफोनचा टॉर्च ऑन करा. नंतर आरसे, एअर व्हेंट्स, घड्याळ, लाइट फिटिंग्ज अशा ठिकाणी टॉर्चचा प्रकाश टाका. लपवलेल्या कॅमेऱ्यांच्या लेन्समुळे प्रकाश परावर्तित होतो. जर कुठे चमकणारा बिंदू दिसला, तर तिथे कॅमेरा असण्याची शक्यता असते.

२. प्लेस्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअरवर ‘Hidden Camera Detector’, ‘Spy Camera Finder’ अशा अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. हे अ‍ॅप्स तुमच्या फोनमधील सेन्सर वापरून मॅग्नेटिक फील्ड, इन्फ्रारेड लाइट आणि इलेक्ट्रॉनिक सिग्नल्सचा शोध घेतात. यामुळे लपवलेले कॅमेरे स्कॅन करता येतात.

३. काही वायरलेस कॅमेरे Wi-Fi किंवा Bluetooth नेटवर्कशी जोडलेले असतात. तुमच्या स्मार्टफोनच्या Wi-Fi किंवा Bluetooth सेटिंग्समध्ये जाऊन पाहा की, कोणते डिव्हाइसेस कनेक्ट आहेत. अनोळखी किंवा अजीब नावांचे डिव्हाइसेस (उदाहरणार्थ – IP_CAM_XXXX) आढळल्यास ते लपलेले कॅमेरे असू शकतात.

४. अनेक छुपे कॅमेरे IR लाइट वापरतात, जो मानवी डोळ्यांना दिसत नाही, पण स्मार्टफोन कॅमेराने तो ओळखता येतो. खोलीतील लाईट बंद करून कॅमेरा अ‍ॅप चालू ठेवा आणि संशयित भागात स्कॅन करा. जर स्क्रीनवर लहान फ्लॅश किंवा ठिपक्यासारखे काही दिसले, तर तो IR लाइटचा संकेत असू शकतो.

५. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अशा गोष्टींबाबत नेहमी जागरूक रहा. हॉटेलची खोली कितीही प्रतिष्ठित असली तरीही तुमच्या गोपनीयतेसाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहात. कोणत्याही संशयास्पद गोष्टी दिसल्यास, त्वरित हॉटेल व्यवस्थापन किंवा स्थानिक पोलिसांना कळवा.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.