
आजच्या रकाळात मोबाईल, तोही स्मार्टफोन माहीत नाही, तो वापरत नाही असे लोक विरळच. लहानांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांच्या हातात स्मार्टफोन दिसतो. पण आपला हाच फोन ‘स्मार्ट’ बनवण्यासाठी फक्त फीचर्स आणि सॉफ्टवेअर यांचा हात नसतो तर तो फोन बारीक, मजबूत पण तितकाच (वजनाने) हलका बनवण्यासाठी धातूंचाही चेवढाच महत्वाचा हात असतो. आपण रोज जो स्मार्टफोन वापरतो त्यामध्ये कोणते धातू वापरले जातात आणि कोणत्या भागात कोणता धातू असतो हे तुम्हाला माहिती आहे का? एक फोन बनवण्यासाठी ती कंपनी कोणकोणता धातू वापरते याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
स्मार्टफोनच्या बॉडीमध्ये कोणता धातू वापरला जातो ?
जेव्हा तुम्ही हातात फोन धरता तेव्हा तो खूप हलका वाटतो. त्यामध्ये इतके पार्ट्स असूनही आपल्यावा फोन जड का वाटत नाही याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? यामागे मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम हे दोन धातू आहेत. फोनमध्ये वापरलेली ॲल्युमिनियम फ्रेम ही हँडसेटला ताकद देते, तर दुसरीकडे, मॅग्नेशियम हा धातू आपला फोन हलका ठेवण्यास मदत करते. तर आपल्याकडे असलेल्या फोनमधील सपोर्ट आणि स्क्रूसारख्या भागांसाठी स्टीलचा वापर केला जातो.
सर्किट आणि बॅटरीमध्ये कोणत्या धातूंचा वापर ?
एखाद्या स्मार्टफोनमध्ये वापरलेला सर्किट बोर्ड तांब्याचा बनलेला असतो. तसेच त्यामध्ये सोने आणि चांदीचे पातळ थरही वापरले जातात. त्यामध्ये सोन्याचा वापर केला जातो कारण सोनं हाँ असा धातू आहे की तो कधीच गंजत नाही. त्यामुळेच मोबाईल फोन वर्षानुवर्षे टिकाऊ राहतात. बॅटरीमध्ये लिथियमचा (Lithium) वापर मुख्य धातू म्हणून केला जातो.
स्पीकरमध्ये या धातूचा वापर
तर आपल्या स्मार्टफोनच्या स्पीकरमध्ये कोणता धातू वापरला जातो, याची तरी तुम्हाला कल्पना आहे का ? नियोडिमियम हाँ एक असा धातू आहे, ज्याचा वापर छोटं मॅग्नेट बनवण्यासाठी केला जातो आणि त्याचा वापर स्पीकर तसेच व्हायब्रेशन मोटरमध्येही केला जातो.