लेट नाईट चॅटिंग करणाऱ्यांसाठी व्हॉट्सअॅपकडून ‘गुड न्यूज’

सचिन पाटील

| Edited By: |

Updated on: Dec 07, 2020 | 11:13 PM

मुंबई : चॅटिंगचा अनुभव आणखी चांगला देण्यासाठी व्हॉट्सअॅपकडून सतत नवनवीन फीचर दिले जातात. मात्र आता एक असं फीचर येणार आहे, ज्याची लेट नाईट चॅटिंग करणाऱ्या प्रत्येक जणाला गरज आहे. नाईट मोड असं या फीचरचं नाव आहे. रात्री अंधारात चॅटिंग करताना मोबाईल स्क्रीनचा उजेड थेट डोळ्यावर पडतो, ज्यामुळे त्रास होतो. मात्र आता असं होणार नाही, कारण […]

लेट नाईट चॅटिंग करणाऱ्यांसाठी व्हॉट्सअॅपकडून 'गुड न्यूज'

मुंबई : चॅटिंगचा अनुभव आणखी चांगला देण्यासाठी व्हॉट्सअॅपकडून सतत नवनवीन फीचर दिले जातात. मात्र आता एक असं फीचर येणार आहे, ज्याची लेट नाईट चॅटिंग करणाऱ्या प्रत्येक जणाला गरज आहे. नाईट मोड असं या फीचरचं नाव आहे. रात्री अंधारात चॅटिंग करताना मोबाईल स्क्रीनचा उजेड थेट डोळ्यावर पडतो, ज्यामुळे त्रास होतो. मात्र आता असं होणार नाही, कारण नाईट मोड फीचर यासाठी येणार आहे.

WABetainfo च्या वृत्तानुसार, या फीचरवर सध्या काम सुरु आहे आणि येणाऱ्या अपडेटमध्ये हे फीचर मिळू शकतं. हे फीचर आल्यानंतर बॅकग्राऊंड काळ्या रंगाचा होईल आणि यामुळे जास्त उजेड डोळ्यावर पडणार नाही. डोळ्यांनाही यामुळे त्रास होणार नाही, शिवाय चोरुन लेट नाईट चॅटिंग करणाऱ्यांसाठी तर हे फीचर आणखी फायद्याचं आहे. यूट्यूब, ट्विटर, गुगल मॅप्स यामध्ये हे फीचर अगोदरच उपलब्ध आहे.

व्हॉट्सअॅपचं हे फीचर तुमच्यासाठी ऑप्शनल असेल, म्हणजेच तुम्हाला वापर करायचा असेल तर करु शकता, अन्यथा ऑफ करु शकता. शिवाय टाईम मोडसोबत हे फीचर सेट केलं जाऊ शकतं. ज्यावेळी तुम्हाला हे फीचर सेट करायचं आहे, त्या वेळी आपोआप सक्रिय होईल, ज्यामुळे तुम्हाला चॅटिंग करताना डिस्टर्बही होणार नाही. फीचरबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

स्टिकर फीचर असो, किंवा मेसेज डिलीट करण्याचं फीचर, व्हॉट्सअॅपने युझर्सचा चॅटिंग अनुभव आणखी खास बनवला आहे. आता यात आणखी एका फीचरची भर पडत आहे. लेट नाईट चॅटिंग करणाऱ्यांसाठी डिस्प्लेची लाईट हा मोठा अडथळा असतो, शिवाय त्यामुळे डोळ्यांनाही प्रचंड त्रास होतो. पण आता चिंता करण्याच गरज नाही. लाईट तर कमी होईलच, शिवाय लेट नाईट चॅटिंगलाही अडथळा येणार नाही.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI