AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WhatsApp मध्ये नवीन फिचर; मेसेज आपोआप डिलीट होणार!

इन्सटंट मेसेजिंग सर्व्हिस व्हॉट्सअॅप लवकरच आपल्या युजर्ससाठी नवीन फिचर्स लाँच करत आहे.

WhatsApp मध्ये नवीन फिचर; मेसेज आपोआप डिलीट होणार!
या नव्या स्टोरेज मॅनेजमेन्ट टूलमुळे कोणती फाईल जास्त स्टोरेज घेणारी आहे हे सहज वापरकर्त्यांना ओळखता येईल. इतकंच नाही तर डिलीट केलेल्या फाईल्ससुद्धा प्रीव्ह्यू करण्याचा पर्याय यामध्ये देण्यात आला आहे.
| Updated on: Nov 02, 2020 | 12:17 PM
Share

मुंबई : इन्सटंट मेसेजिंग सर्व्हिस व्हॉट्सअॅप (Whatsapp) लवकरच आपल्या युजर्ससाठी नवीन फिचर्स लाँच करत आहे. त्यामध्ये मेसेज डिलीट करण्यासाठीचं (Disappearing messages) एक नवीन फिचरही आहे. यामध्ये कोणताही मेसेज सात दिवसांनंतर डिलीट होणार आहे. कंपनीने या फिचरबाबत त्यांच्या सपोर्ट पेजवर माहिती दिली आहे. (WhatsApp disappearing messages feature rolled out, check how it works)

WhatsApp Support पेजवर दिलेल्या माहितीनुसार Disappearing messages असं या फिचरचं नाव आहे. हे फिचर इनेबल केल्यानंतर युजर असे मेसेज पाठवू शकतो जे सात दिवसात आपोआप डिलीट होतील. या फिचरचा इंडिव्हिज्युअल किंवा ग्रुप चॅट दोन्ही सेक्शनमध्ये वापर करता येईल. हे फिचर एकदा इनेबल केल्यानंतर कोणालाही केलेला मेसेज किंवा ग्रुपमध्ये केलेला मेसेज सात दिवसांनंतर डिलीट होईल. परंतु या फिचरचा जुन्या मेसेजेसवर किंवा आलेल्या मेसेजेसवर (received message) कोणताही परिणाम होणार नाही.

फिचरबाबत अधिक माहिती

  • कोणत्याही युजरने सात दिवस व्हॉट्सअॅप उघडलं नाही तरीदेखील मेसेज आपोआप डिलीट होतील. परंतु प्रिव्ह्यू किंवा नोटिफिकेशनमध्ये मेसेज दिसेल.
  • Disappearing मेसेजला कोट करुन जर त्यावर तुम्ही रिप्लाय केला असेल तर तो मेसेज डिलीट होणार नाही.
  • Disappearing मेसेज कोणालाही फॉरवर्ड केला असेल, परंतु ज्याला मेसेज फॉरवर्ड केलाय त्याच्यासाठी Disappearing मेसेज ऑफ असेल तर फॉरवर्डेड मेसेज डिलीट होणार नाही.
  • कोणत्याही युजरने मेसेज Disappear होण्यापूर्वी त्याचा बॅकअप घेतला असेल तर तो मेसेज बॅकअपमध्ये राहील. त्यामुळे तो मेसेज सात दिवसांनंतर डिलीट होईल, परंतु तो युजर जेव्हा बॅकअप रिस्टोर करेल, तेव्हा तो मेसेज त्याच्याकडे पुन्हा दिसेल.
  • Disappearing मेसेज फिचर ऑन केल्यानंतर चॅट मेसेजप्रमाणे मीडिया फाईल्सदेखील डिलीट होती. परंतु जर त्या फाईल डाऊनलोड केल्या असतील तर त्या फोनमध्ये तशाच राहतील.

संबंधित बातम्या

अँड्रॉईड युजर्सना Whatsapp मध्ये फेस अनलॉक फिचर मिळणार!

Indian Army चं ‘सुरक्षित’ इन्स्टंट मेसेजिंग अॅप SAI तयार, मेसेजसह इतरही कामं करणार

(WhatsApp disappearing messages feature rolled out, check how it works)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.