WhatsApp Update:व्हाट्सॲपचे 5 नवीन फीचर्स भारतात लाँच, कोणते जाणून घ्या
तुम्ही जर WhatsApp वापरत असाल तर हे 5 फीचर्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील. व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांसाठी असे 5 फीचर्स लाँच केले आहेत जे तुम्हाला खूप फायदेशीर ठरतील. याद्वारे तुमचा वेळ वाचेल आणि व्हॉट्सअॅप वापरण्याचा अनुभव बदलेल.

व्हॉट्सॲपने गेल्या महिन्यात त्यांच्या वापरकर्त्यांच्या सोयीसाठी अनेक फीचर्स सादर केले आहेत. त्यावेळी हे फिचर्स चाचणीच्या टप्प्यात होती. पण आता ते चालवण्यासाठी उपलब्ध झाले आहे. प्लॅटफॉर्मने हे सर्वांसाठी सुरू केले आहे. यामध्ये असे अनेक फीचर्स आहेत ज्यांची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात, ज्यांचा वापर करून तुमचा व्हॉट्सॲप वापरण्याचा अनुभव बदलेल.
यामध्ये रंगीत चॅट थीम, स्पष्ट चॅट सूचना, फिल्टरमध्ये न वाचलेले चॅट काउंटर, व्हिडिओंसाठी प्लेबॅक स्पीड आणि होम स्क्रीनवरील मेटा एआय विजेट यांचा समावेश आहे.
रंगीत चॅट थीमसह सर्व काही बदलेल
तुम्हाला तुमच्या चॅट थीमचा कंटाळा आला असेल, तर आता WhatsApp तुम्हाला अपडेट झालेल्या नवीन फिचर्सद्वारे 20 हून अधिक रंग आणि 30 हून अधिक थीम देत आहे. याशिवाय तुम्ही तुमच्या फोटो गॅलरीमधून फोटो कस्टमाइझ देखील करू शकता. यासोबतच तुम्ही तुमच्या प्रत्येक चॅट्स वेगवेगळ्या प्रकारे कस्टमाइझ करू शकता.
Clear Chat Notifications
न वाचलेले बॅज काढून टाकण्यासाठी आणि चॅट नोटिफिकेशन्स क्लिअर करण्यासाठी व्हॉट्सॲपचे नवीन फिचर्स सादर करण्यात आले आहे. हे नवीन फिचर्स ॲक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन्स सेटिंग्जमध्ये ऑशन मिळेल. येथे तुम्हाला Clear Badge Toggle सह एक नवीन पर्याय मिळत आहे.
न वाचलेले चॅट काउंटर
गेल्या वर्षी तुम्हाला WhatsApp वर चॅट फिल्टर्स देण्यात आले होते. आता या फिल्टर्सद्वारे तुम्हाला न वाचलेल्या Unread मेसेजेसची संख्या देखील दाखवली जाईल. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या आवडत्या कॉन्टॅक्ट्सचे 5 मेसेज वाचले नसतील, तर चॅट फिल्टरमध्ये फेवरेट्ससह 5 लिहिलेले दिसतील.
व्हिडिओंमध्ये प्लेबॅक स्पीड
आता तुम्ही WhatsApp वर व्हिडिओ प्लेबॅकचा स्पीड बदलू शकता. तसेच तुम्हाला व्हॉट्सॲपवर येणाऱ्या कोणत्याही व्हिडिओचा स्पीड वाढवू किंवा कमी करू शकता. यामध्ये 1.5x आणि 2x वेगाने पाहण्याचा पर्याय दिला जात आहे. कमी वेळेत इतका मोठा व्हिडिओ पाहण्यासाठी, तुम्ही त्याचा वेग वाढवून तो प्ले करू शकता.
होम स्क्रीनवर मेटा एआय विजेट
अँड्रॉइड वापरकर्ते त्यांच्या फोनच्या होम-स्क्रीनवर त्यांच्या आवडत्या एआय (AI) चॅटबॉट्समध्ये प्रवेश करू शकतात. तुम्ही पर्सनलायझेशन पर्यायांसह Widget सेक्शनमध्ये जाऊन होम स्क्रीनवर एआय चॅटबॉट ठेवू शकता. मेटा एआय चॅट विंडो एका क्लिकवर उघडले जाईल.