दिग्गज टेक कंपन्यांच्या CEO कडे कोणता महागडा मोबाईल? Elon Musk चा स्मार्टफोन पाहून तुम्हाला बसेल धक्का

Tech Company CEO Smartphone : जगातील दिग्गज टेक कंपन्यांचे सीईओ आणि मालक Donald Trump यांच्या शपथविधी सोहळ्यात हजर होते. या कार्यक्रमात एलॉन मस्क आणि सुंदर पिचई हे त्यांच्या मोबाईलमध्ये गुंग दिसले. कोणता स्मार्टफोन वापरतात हे सीईओ?

दिग्गज टेक कंपन्यांच्या CEO कडे कोणता महागडा मोबाईल? Elon Musk चा स्मार्टफोन पाहून तुम्हाला बसेल धक्का
कोणता स्मार्टफोन घेऊ हाती?
| Updated on: Jan 21, 2025 | 9:42 AM

Donald Trump यांनी काल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. शपथ ग्रहण समारंभात जगभरातील दिग्गज नेते आणि बड्या टेक कंपन्यांचे सीईओ आणि मालक हजर होते. यामध्ये गुगलचे CEO सुंदर पिचई, एक्स आणि टेस्लाचा मालक एलॉन मस्क तर ॲप्पलचे CEO टिम कुक हे सहभागी झाले होते. या कार्यक्रमात मस्क आणि पिचई हे त्यांचा स्मार्टफोन वापरताना दिसले. कोणता मोबाईल वापरतात हे दिग्गज सीईओ?

एलॉन मस्क याच्याकडे कोणता स्मार्टफोन?

सर्वसामान्यांकडे अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन आहेत. त्यांची किंमत 10 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत आहे. पण दिग्गज कंपन्यांच्या सीईओंकडे कोणता स्मार्टफोन आहे, याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. एलॉन मस्क हे कोणता स्मार्टफोन वापरतात याची अनेकांना उत्सुकता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पदग्रहण सोहळ्यात मस्क हे स्मार्टफोन हाताळताना दिसले. त्यांच्याकडे iPhone 16 Pro दिसला. हा ॲप्पलचा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात तो बाजारात दाखल झाला. एलॉन मस्क ॲप्पल आणि OpenAI च्या भागीदारीवर खूष नव्हते. असे झाले तर ते त्यांच्या कंपन्यात ॲप्पल मोबाईल बॅन करतील, असे त्यांनी जाहीर केले होते.

सुंदर पिचई पण आयफोन वापतात का?

आता तुम्हाला सुंदर पिचई पण आयफोन वापरत असतील असे वाटत असेल तर थोडं थांबा. कारण पिचई हे त्यांच्याच कंपनीचा स्मार्टफोन वापरत आहेत. शपथग्रहण सोहळ्यात त्यांच्या हातात गुगल पिक्सल 9 (पिक्सल 9 XL पण असू शकतो) हा त्यांचा हातात दिसला. या कार्यक्रमात मस्क आणि पिचई हे दोन्ही पण अगदी जवळ उभे होते. दोघेही त्यांच्या मोबाईलमध्ये गुंग होते. पिक्सल 9 हा कंपनीचा फ्लॅगशिप डिव्हाईस आहे. कंपनीच्या या फोनमध्ये AI असिस्टेंट जेमिनी इनबिल्ट आहे. तर इतरही अनेक AI फीचर्स आहेत. एलॉन मस्क याच्याकडे हटके स्मार्टफोन असण्याची अनेकांना अपेक्षा होती. पण तो iPhone 16 Pro वापरत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कारण त्यांना OpenAI सोबत भागीदारी नको होती.