AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Knowledge News : किबोर्डमध्ये Shift ची दोन बटणं का असतात माहिती आहे ? जाणून घ्या

किबोर्डवर रोजच्या रोज टापयिंग करणाऱ्यांची बोटं कशी पटापट फिरतात. समोरच्याला बघताना तर आश्चर्य वाटतं. पण हा किबोर्डची रचना त्या पद्धतीने केलेली आहे. जाणून घ्या यामागचं कारण

Knowledge News : किबोर्डमध्ये Shift ची दोन बटणं का असतात माहिती आहे ? जाणून घ्या
किबोर्डमध्ये Shift असण्यामागचं कारण काय? तुम्हाला माहिती नसेल तर समजून घ्या
| Updated on: Mar 17, 2023 | 8:35 PM
Share

मुंबई : तुम्ही लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वापर असाल तर कीबोर्डवर एक नजर मारा. कदाचित ही बाब तुम्हाला माहिती असेल की, किबोर्डवर दोन शिफ्टची बटणं असतात. तसं पाहिलं तर सर्व कि एक एकच आहेत, मग दोन शिफ्ट बटणांचा उपयोग काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. टायपिंग करताना तुम्ही दोन्ही शिफ्ट बटणांचा वापर करत असाल. स्मॉल लेटर किंवा बिग लेटर टाईपसाठी या शिफ्ट किचा वापर होतो. मराठी किंवा इतर भाषिक टायपिंगमध्येही शिफ्टचं बटण महत्त्वाचं ठरतं. मग दोन शिफ्ट का? चला तर जाणून घेऊयात या मागचं उत्तर..

किबोर्ड हा सर्वात महत्त्वपूर्ण इनपुट डिव्हाईस आहे. किबोर्डच्या मदतीने आपण टेक्स्ट आणि न्युमेरिक डेटा अॅड करू शकतो. दुसरीकडे किबोर्डवर दोन शिफ्ट बटणं असतात कारण युजर्स सर्व किज शिफ्टसोबत आरामात वापरू शकतील. कारण टाईप करण्यासाठी आपण दोन्ही हातांच्या बोटांचा वापर करतो.

उजव्या बाजूच्या किज वापरताना डाव्या बाजूच्या शिफ्टचा वापर होतो. तर डाव्या बाजूच्या किज वापरण्यासाठी उजव्या बाजूच्या किजचा वापर होतो.टायपिंग करताना अडचण येऊ नये यासाठी किबोर्डची अशी रचना करण्यात आली आहे. त्यामुळे किबोर्ड वापरणं सोपं होतं.

किबोर्ड शॉर्टकटसाठी शिफ्ट किजची आवश्यकता असते.उदाहरण घ्यायचं झालं तर, टेक्स हायलाईट करण्यासाठी आपण शिफ्ट+होम शॉर्टकट किजचा वापर करु शकतो. शिफ्ट किजचा वापर तुम्ही रिसायकल बिन बायपास करण्यासाठी देखील करू शकता. तसेच एकापेक्षा जास्त फाईल सिलेक्ट करण्यासाठी शिफ्ट दाबून सिलेक्ट करता येतं.

किबोर्ड QWERTY फॉर्मेटमध्ये का असतो ?

किबोर्ड वारताना आणखी गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल ती म्हणजे किबोर्डवर लेटर्स एका रांगेत नसतात. म्हणजेच ABCDE अशा रांगेत नसतात. तर उलटसुलट म्हणजे QWERTY फॉर्मेटमध्ये असते.

पहिला किबोर्ड एबीसीडी या फॉर्मेटमध्ये होता. मात्र टाईप करताना तो स्पीड येत नव्हता. त्यामुळे टायपिंग स्पीड येण्यासाठी काही जणांनी प्रयोग केले. त्यानंतर QWERTY हा किबोर्ड पॅटर्न तयार करण्यात यश आलं. यामुळे टायपिंगचा स्पीडही वाढला.

F आणि J बटणाखाली एक आडवी लाइन का असते ?

किबोर्डवरील मधल्या लाईनला होम रो लाईन बोललं जातं. टायपिंग शिकताना कायम या लाईनपासुन सुरुवात केली जाते. A,S,D,F,G,H,J,K आणि L अक्षरं या लाईनत असतात. पण एफ आणि जे या बटणाखाली लाईन असते. कारण टाईप करताना आपला हात कोणत्या बटणावर आहे हे यामुळे कळतं. त्यामुळे सराव करता करता आपल्याला याची जाणीव होते आणि न बघता टायपिंगचा स्पीड वाढतो.

Follow Us
सोलापूरात महापौर निवडीवरून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन
सोलापूरात महापौर निवडीवरून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन.
छत्रपती संभाजीनगरमधील कलाकेंद्रात मोठा राडा अन् तोडफोड,नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील कलाकेंद्रात मोठा राडा अन् तोडफोड,नेमकं काय घडलं?.
अमेरिका, इस्त्रायल, इराण संघर्षामुळे जागतिक तेल बाजारावर परिणाम
अमेरिका, इस्त्रायल, इराण संघर्षामुळे जागतिक तेल बाजारावर परिणाम.
एसटी महामंडळाचा मोठा निर्णय; डिजिटल कार्डशिवाय...
एसटी महामंडळाचा मोठा निर्णय; डिजिटल कार्डशिवाय....
बा देवा महाराजा! रो रो सेवा सुरू होण्याआधी नितेश राणेंचं गाऱ्हाणं
बा देवा महाराजा! रो रो सेवा सुरू होण्याआधी नितेश राणेंचं गाऱ्हाणं.
नागपूर एसबीएल कंपनी स्फोटात मृतांचा आकडा वाढणार?
नागपूर एसबीएल कंपनी स्फोटात मृतांचा आकडा वाढणार?.
भाजपकडून संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा
भाजपकडून संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा.
अजितदादांच्या अपघाताच्या प्राथमिक अहवालावर रोहित पवारांचा सवाल
अजितदादांच्या अपघाताच्या प्राथमिक अहवालावर रोहित पवारांचा सवाल.
अमेरिका-इराण युद्ध; पुण्यातून आखाती देशात जाणारी विमाने रद्द
अमेरिका-इराण युद्ध; पुण्यातून आखाती देशात जाणारी विमाने रद्द.
भारत दबावाखाली झुकणार नाही; संजय राऊतांचा केंद्र सरकारला टोला
भारत दबावाखाली झुकणार नाही; संजय राऊतांचा केंद्र सरकारला टोला.