World Password Day: तुमचा पासवर्ड देखील या यादीत आहे का, तर तो ताबडतोब बदलवा नाहीतर सर्व वैयक्तिक माहिती होईल लीक !

रचना भोंडवे, Tv9 मराठी

|

Updated on: May 05, 2022 | 7:39 PM

जगभरात सर्वाधिक वापरल्या गेलेल्या 10 पासवर्डची यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्याद्वारे तुम्ही अंदाज लावू शकता की तुमचा पासवर्ड तुमच्या विचारापेक्षा किती सुरक्षित आहे. World Password Day निमीत्त 2022 मध्ये सर्वाधिक वापरलेले पासवर्डची यादी जाहीर झाली आहे, तुमचाही पासवर्ड या यादीत आहे का ते तपासा.

World Password Day: तुमचा पासवर्ड देखील या यादीत आहे का, तर तो ताबडतोब बदलवा नाहीतर सर्व वैयक्तिक माहिती होईल लीक !
World Password Day
Image Credit source: TV9 marathi

बायोमेट्रिक्स आणि पासवर्डलेस ऑथेंटिकेशनच्या प्रचारामुळे युजर्संसाठी अनेक गोष्टी खूप सोप्या झाल्या आहेत, तरीही बरेच लोक त्यांचा ऑनलाइन डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड (Password) वापरण्यास प्राधान्य देतात. दरम्यान, पासवर्ड क्रॅक करणे, ही पद्धत हॅकर्ससाठी देखील खुप सोपी झाली आहे. लोक अजूनही काही कॉमन पासवर्ड निवडतात म्हणून ते खूपच असुरक्षित आहे. ज्या लोकांनी त्यांचा पासवर्ड म्हणून ” 12345 ” किंवा “111111” ठेवला आहे त्या लोकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. हा पासवर्ड आजपर्यंत सर्वात जास्त वापरल्या जाणार्‍या पासवर्डपैकी एक असल्याचे सांगण्यात आले आहे. सायबर सिक्युरिटी फर्म (Cyber security firm) लुकआउटच्या अहवालानुसार, 2022 मध्ये जगभरात सर्वाधिक वापरलेले 10 पासवर्डची यादी World Password Day निमीत्त जाहीर केली आहे. तुमचा पासवर्डही या यादीत असेल तर तो त्वरीत बदलावा (Replace quickly) असा इशारा सायबर सुरक्षेच्या दृष्टीने देण्यात आला आहे.

सर्वाधिक वापरलेले पासवर्ड

सायबर सिक्युरिटी फर्म लुकआउटच्या अहवालानुसार, 2022 मध्ये डेटाच्या उल्लंघनामुळे डार्क वेबवर सर्वात सामान्यपणे सापडलेल्या पासवर्डची यादी येथे आहे : 123456789 , Qwerty , पासवर्ड , 12345 , 12345678 , 111111 , 62314 , 7235 , 7235 . अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी हे पासवर्ड वापरत असाल तर तुम्ही ते अपडेट करा किंवा त्वरीत बदलून टाका. जागतिक पासवर्ड दिनानिमित्त, सायबर सुरक्षेबाबत काही महत्वाच्या गोष्टी सांगीतल्या आहेत ज्या तुम्ही सुरक्षित आणि मजबूत पासवर्ड तयार करण्यासाठी वापरू शकता.

स्ट्रॉंग पासवर्ड कसा तयार करावा

स्ट्रॉंग पासवर्ड तयार करण्यासाठी फोन नंबर, पत्ते, वाढदिवस, तुमची नावे, कुटुंबातील सदस्य किंवा पाळीव प्राण्यांची नावे पासवर्ड म्हणून वापरू नका. तर, तुमच्या पासवर्डसाठी नेहमी अप्परकेस आणि लोअरकेस अक्षरे, संख्या आणि चिन्हे वापरा. “qwerty” किंवा “123456” सारख्या सामान्यतः वापरल्या जाणार्‍या पासवर्डपासून दूर रहा. डेटाचे उल्लंघन किंवा सायबर हल्ले टाळण्यासाठी सुरक्षित पासवर्ड किमान 16 अक्षरांचा असणे आवश्यक आहे. शब्दकोषातील शब्द पासवर्ड म्हणून वापरू नका कारण हॅकर्स असे शब्द शब्दकोशात स्कॅन करण्यासाठी आणि पासवर्ड क्रॅक करण्यासाठी हॅक सॉफ्टवेअर वापरतात.

हे सुद्धा वाचा

पासवर्ड सुरक्षेसाठी महत्वाच्या टीप्स

तुमच्या खात्यात सुरक्षिततेचा अतिरिक्त स्तर जोडण्यासाठी नेहमी टू स्टेप व्हेरिफिकेशन (2FA) चा पर्याय निवडा. तुम्ही वापरत असलेले सर्व अॅप प्रमाणित आहेत आणि अधिकृत अॅप स्टोअरवरून डाउनलोड केले आहेत याची खात्री करा. तुम्‍ही तुमचा पासवर्ड विसरला असल्‍याचे तुम्‍हाला वाटत असल्‍यास, तो लक्षात ठेवण्‍यासाठी पासवर्ड व्‍यवस्‍थापक वापरा, लिंक केलेले कोणतेही मजकूर संदेशाबाबत नेहमी सावध रहा कारण ते तुमचे डिव्‍हाइस हॅक करू शकतात आणि वैयक्तिक माहिती चोरू शकतात. तुमचे पासवर्ड नियमितपणे बदलत राहा.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI