AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5000 रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंटसह लाँच झाला शाओमी 17T स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

शाओमीने ग्राहकांसाठी फ्लॅगशिप वैशिष्ट्यांसह शाओमी 17T लाँच केला आहे. तसेच हा फोन खरेदी केल्यावर तुम्हाला 5 हजारांची त्वरित सूट आणि इतर अनेक फायदे मिळतील. चला तर मग आजच्या लेखात या खास ऑफर्सबद्दल जाणून घेऊयात.

5000 रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंटसह लाँच झाला शाओमी 17T स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत
| Edited By: | Updated on: Jun 05, 2026 | 4:17 PM
Share

भारतीय बाजारपेठेत शाओमी कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन शाओमी 17T अनेक प्रभावी वैशिष्ट्यांसह लाँच करण्यात आला आहे. यामध्ये 5x पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स, AMOLED स्क्रीन, मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर, 12GB रॅम आणि 6500mAh बॅटरी आहे. या फोन खरेदी करताना तुम्हाला 5000 पर्यंत कॅशबॅक देखील मिळू शकतो आणि कंपनी 18 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI चा पर्यायही देत ​​आहे. चला तर मग आजच्या लेखात या फोनची ऑफर किंमत जाणून घेऊयात.

भारतात Xiaomi 17T ची किंमत

हा नवीन शाओमी स्मार्टफोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज, आणि 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज या दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. तर यातील 256GB व्हेरिएंटची किंमत 59 हजार 999 रूपये आहे, तर टॉप-एंड 512GB व्हेरिएंटची किंमत 64 हजार 999 रूपये आहे. SBI, HDFC, American Express आणि ICICI बँक कार्ड वापरून फोन खरेदी केल्यास तुम्हाल 5 हजार रूपयांची त्वरित सूट मिळेल. याव्यतिरिक्त जुन्या फोनवर 5 हजार रूपयांची एक्सचेंज बोनस देखील उपलब्ध आहे.

स्पर्धेबद्दल बोलायचे झाल्यास या किंमत श्रेणीमध्ये शाओमी ब्रँडचा हा नवीन फोन सॅमसंग गॅलेक्सी एस25 5जी, वनप्लस 13, विवो व्ही70 एलिट आणि ओप्पो रेनो15 प्रो मिनी 5जी सारख्या स्मार्टफोन्सना कडवी टक्कर देईल.

या फोनमध्ये 18 महिन्यांपर्यंतचे नो-कॉस्ट ईएमआय आणि शून्य डाउन पेमेंटचे पर्यायही उपलब्ध आहेत. कंपनीने सांगितले आहे की खरेदीच्या एका वर्षाच्या आत फोन परत केल्यास, 60 टक्के बायबॅक व्हॅल्यू देखील दिली जाईल. फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना स्पॉटिफाय प्रीमियम स्टँडर्डचे चार महिन्यांचे, गूगल एआय प्रोचे तीन महिन्यांचे आणि यूट्यूब प्रीमियमचे तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शनही मिळेल. विक्रीबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 10 जूनपासून शाओमीच्या अधिकृत वेबसाइटवर, तसेच शाओमी रिटेल स्टोअर्स आणि ॲमेझॉनवर उपलब्ध होईल.

शाओमी 17T ची वैशिष्ट्ये

स्क्रीन: या ड्युअल-सिम फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 3500 nits पर्यंतच्या पीक ब्राइटनेससह 6.59-इंचाचा 1.5K AMOLED स्क्रीन आहे. स्क्रीनच्या संरक्षणासाठी गोरिला ग्लास 7i चा देखील वापर केला जातो.

चिपसेट: या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8500 अल्ट्रा प्रोसेसर असून, थर्मल मॅनेजमेंटसाठी 3D आइसलूप कूलिंग सिस्टीम आहे.

ओएस: हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित हायपरओएस ३ वर चालतो.

कॅमेरा: या फोनमध्ये लायकाचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा लाइट फ्यूजन 800 प्रायमरी सेन्सर, सोबतच 50-मेगापिक्सलचा लायका 5x पेरिस्कोप टेलीफोटो सेन्सर आणि 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल सेन्सर आहे.

कनेक्टिव्हिटी: या डिव्हाइसमध्ये 5G, Wi-Fi 7, ब्लूटूथ आवृत्ती 6.0, GPS, NFC आणि USB टाइप C पोर्ट समाविष्ट आहेत.

बॅटरी: यामध्ये 6500mAh क्षमतेची सिलिकॉन-कार्बन बॅटरी दिली आहे, जी 67W हायपरचार्ज फास्ट चार्जिंग आणि 22.5W रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते.

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...