ठग्स ऑफ हिंदोस्तान बेकार, तरीही कमाईत रेकॉर्ड

मुंबई: प्रेक्षकांची निराशा केलेल्या ठग्स ऑफ हिंदोस्तान (Thugs of Hindostan) या सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. सिनेसमीक्षक तरन आदर्श यांनी ट्विटरवर हे आकडे जाहीर केले आहेत. त्यानुसार ठग्स ऑफ हिंदोस्तान या सिनेमाने पहिल्या दिवसाच्या कमाईचे रेकॉर्ड मोडित काढले आहेत. कारण पहिल्या दिवशी या सिनेमाने तब्बल 52 कोटी 25 लाख रुपयांची कमाई केली […]

ठग्स ऑफ हिंदोस्तान बेकार, तरीही कमाईत रेकॉर्ड
Follow us
| Updated on: Nov 09, 2018 | 2:38 PM

मुंबई: प्रेक्षकांची निराशा केलेल्या ठग्स ऑफ हिंदोस्तान (Thugs of Hindostan) या सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. सिनेसमीक्षक तरन आदर्श यांनी ट्विटरवर हे आकडे जाहीर केले आहेत. त्यानुसार ठग्स ऑफ हिंदोस्तान या सिनेमाने पहिल्या दिवसाच्या कमाईचे रेकॉर्ड मोडित काढले आहेत. कारण पहिल्या दिवशी या सिनेमाने तब्बल 52 कोटी 25 लाख रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये हिंदीतील 50.75 कोटी, तामीळ आणि तेलगुमधील 1.50 कोटी यांचा समावेश आहे.

आमीर खानसह दिग्गज अभिनेत्यांची फौज असलेला सिनेमा ठग्स ऑफ हिंदोस्तान (Thugs of Hindostan) दिवाळीच्या मुहूर्तावर काल 8 नोव्हेंबरला रिलीज झाला. तब्बल 5 हजार स्क्रीन्सवर हा सिनेमा प्रदर्शित झाला.

दिवाळी सुट्टीच्या निमित्ताने रिलीज झालेल्या या सिनेमाने पहिल्या दिवशी 50 कोटींपेक्षा जास्त कमाई करत नवा विक्रम रचला.  दिवाळीला रिलीज झालेल्या सिनेमाने सर्वाधिक कमाई केलेला पहिला चित्रपट, YRF फिल्म्सचा सर्वाधिक ओपनिंग मिळालेला सिनेमा आणि हिंदीत सर्वाधिक कमाई करणारा पहिला सिनेमा असे विक्रम ठग्स ऑफ हिंदोस्तानने रचले आहेत.

यापूर्वी 2018 मध्ये संजू हा सिनेमा पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा ठरला होता. ‘संजू’ने पहिल्या दिवसी 34.75 कोटी रुपये कमावले होते.

2018 मधील टॉप 5 सिनेमे

ठग्स ऑफ हिंदोस्तान – 52.25 कोटी

संजू – 34.75 कोटी

रेस 3 – 29.17 कोटी

गोल्ड – 25.25 कोटी

बागी 2 – 25.10 कोटी

ठग्स ऑनलाईन लीक

दिग्गज अभिनेत्यांची फौज असलेला सिनेमा ठग्स ऑफ हिंदोस्तान (Thugs of Hindostan) दिवाळीच्या मुहूर्तावर काल 8 नोव्हेंबरला रिलीज झाला. मात्र रिलीजनंतर काही तासातच हा सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. पायरसीसाठी फेमस असलेली वेबसाईट तमिळ रॉकर्सवर हा सिनेमा लीक करण्यात आला आहे. या वेबसाईटवर Thugs of Hindostan हा सिनेमा तीन भाषेत HD क्वालिटीमध्ये अपलोड करण्यात आला आहे.

सिनेमा निराशाजनक

दुसरीकडे ठग्स ऑफ हिंदोस्तान रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर चांगलंच ट्रोलिंग सुरु आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांनी हा सिनेमा अत्यंत वाह्यात आणि निराशाजनक असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर तर या सिनेमावरुन जोक सुरु असून अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

सिनेमा ऑनलाईन लीक आणि प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे सिनेमाच्या कमाईवर नक्कीच परिणाम होणार आहे.

सर्वात महागडा सिनेमा ठग्स ऑफ हिंदोस्तान

ठग्स ऑफ हिंदोस्तान हा हिंदीतील सर्वात महागडा सिनेमा आहे. या सिनेमाचं बजेट तब्बल 240 कोटी इतकं आहे. यशराज बॅनरने या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात आमीर खान, अमिताभ बच्चन, कतरिना कैफ, फातिमा सना शेख यासारखी तगडी स्टारकास्ट आहे.

यापूर्वी पद्मावत या सिनेमाचं बजेट 210 कोटी रुपये होतं.

संबंधित बातम्या 

ठग्स ऑफ हिंदोस्तान ची HD प्रिंट लीक  

Non Stop LIVE Update
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.