AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हम तो लुट गए खड़े ही खड़े… ‘साडे 18 वर्षापूर्वीचं Love Letter व्हायरल; म्हणे, प्रेम म्हणजे एक एक्सपेरिमेंट

Old Love Letter Viral : प्रेमात पडलेले लोक काहीही करू शकतात, हे तुम्ही ऐकलं असेलच. सोशल मीडियावर सध्या एक लव्हलेटर अर्थात प्रेमपत्र व्हायरल झालं आहे. एका सायन्स शाखेच्या विद्यार्थ्याने अनोख्या अंदाजात प्रेमाची कबुली देताना त्याने काय म्हटलंय हे खरोखर वाचण्यासारखं आहे.

'हम तो लुट गए खड़े ही खड़े... 'साडे 18 वर्षापूर्वीचं Love Letter व्हायरल; म्हणे, प्रेम म्हणजे एक एक्सपेरिमेंट
Image Credit source: social media
| Updated on: Apr 06, 2023 | 9:52 AM
Share

नवी दिल्ली : काळानुसार प्रेमं (love) व्यक्त करण्याची पद्धत बरीच बदलली आहे. आधी प्रेमपत्र लिहून प्रपोज (love letter to propose) केले जायचे, किंवा कधी फुलं देऊन नाहीतर गुडघ्यावर बसून अंगठी देत प्रेमाची कबुली दिली जायची. पण आता तर चॅटिंग करता करताच प्रेमाची कबुली, स्वीकार किंवा नकारही दिला जातो. वेगवेगळ्या इमोजींच्या (emoji) सहाय्याने भावना व्यक्त केल्या जातात. आधी एकमेकांना भेटायला लोकं तरसायचे, छोट्या-छोट्या, लपूनछपून केलेल्या भेटींमध्ये प्रेम खुलायचं, पण आता तर व्हिडीओ कॉलमुळे तुम्ही क्षणात एकमेकांना समोर पाहू शकता. थोडक्यात काय तर आजच्या टेक्नोसॅव्ही पिढीप्रमाणेच (technosavy youth) त्यांच प्रेमही टेक्नॉलॉजीतच अडकलं आहे, असं म्हणू शकतो. पण याही काळात लोकांना एक प्रेमपत्र भुरळ घालतंय, ज्यातून जुन्या काळच्या आठवणी ताज्या होत आहेत.

सोशल मीडियावर एक प्रेमपत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सुमारे साडेअठरा (18.5 ) वर्षांपूर्वी सायन्स शाखेच्या एका विद्यार्थ्याने लिहीलेलं हे प्रेमपत्र आहे. पत्रं लिहीतान बऱ्याच वेळेस आपण जास्तच भावनिक होतो, तशीच काहीशी झलक या लेटरमध्येही दिसत आहे. सध्या व्हायरल झालेले हे प्रेमपत्र वाचल्यानंतरच लगेच जाणवतं की पत्रं लिहीणारी ही व्यक्ती सायन्स शिकणारी आहे. घराची साफसफाई करताना एका महिलेला हे पत्र मिळाले. या महिलेच्या पतीने तिला हे पत्र लिहिले आहे. ते त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे.

ते लेटर शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये काय म्हटले आहे ते वाचूया. ‘ आज मी काही जुने सामान साफ ​​करत असताना मला जुनी हस्तलिखीत पत्रं सापडली. मिस्टर. अय्यरनी ती पत्र मला सुमारे 18.5 वर्षांपूर्वी लिहिली होती. पण आपल्या प्रेमिकेला लिहिलेल्या (प्रेम) पत्रात तपशीलवार आकृत्यांसह प्रयोगशाळेतील प्रयोगांसारख्या गोष्टी कोण लिहितं हो ? ( हो, मी याच व्यक्तीला होकार दिला होता !) ‘ असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

लिहीली होती रोमॅंटिक शायरी

या पत्रात एक रोमँटिक शायरीही लिहिली आहे. ‘मेरे आराम करने की उम्मीदों का मैंने अपने हाथों से गला घोंट लिया. हम तो लुट गए खड़े ही खड़े.’ असे त्यात म्हटले आहे. एवढंच नव्हे तर त्या पत्रात काही एक्सपेरिमेंट्स बद्दल लिहीले असून ते समजावण्यासाठी एका डायग्रामही काढण्यात आला आहे.

सोशल मीडियावर लोकांना हे पत्र खूप आवडलं असून अनेकांना त्याला लाईक्स देत कॉमेंट्सही केल्या आहेत. ‘तुम्ही खूप भाग्यवान आहात ! त्यांनी केवळ त्यांच हृदयंच नव्हे त्यांचं मनही तुमच्यासोर उघडं केलं आहे ! ईश्वराचा तुमच्यावर असाच आशीर्वाद राहो’ अशा शब्दात एका युजरने भावना व्यक्त केल्या आहेत. तर दुसर्‍या युजरने म्हटले आहे की ‘ त्याला वाटले असेल, डायग्राम काढूनही ही मुलगी होकार देत आहे! तिला कधीच (दूर) जाऊ द्यायला नको. ‘ या पोस्टवर अनेकांना कॉमेंट्स करत भावना व्यक्त केल्या आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.