AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cycle Bill : 90 वर्षापूर्वी खरेदी केलेल्या सायकलीचं बिल, बिल पाहा, तुम्हाला आश्चर्य वाटेल, किंमतीचा अंदाज तर सांगा

Cycle Bill : आजोबांच्या आठवणीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तुम्ही ही म्हणाल क्या बात है..

Cycle Bill : 90 वर्षापूर्वी खरेदी केलेल्या सायकलीचं बिल, बिल पाहा, तुम्हाला आश्चर्य वाटेल, किंमतीचा अंदाज तर सांगा
आठवणींचा बेशकिंमती ठेवा
| Updated on: Jan 12, 2023 | 8:34 PM
Share

नवी दिल्ली : तुम्ही ही बालपणीच्या आठवणीत (Old Memories) हरवून जाता का? त्यावेळी खेळणी (Toys) मिळविण्यासाठी तुम्ही घर डोक्यावर घेतलं असणार. आई-वडिलांनी हट्ट पुरवत एखादी खेळणीही आणून दिली असेल. त्याची आठवण आजही तुम्ही मनाच्या कप्प्यात कोठे तरी जपून ठेवली असेल नाही का? आपल्या आजी-आजोबांच्या, पणजोबांच्या अशाच काही आठवणी घरात सांदाडात, कानाकोपऱ्यात जरुर सापडतील. काही तर या वस्तू जीवापाड जपून ठेवतात आणि मग आपण हरकून जातो. अशीच एक बातमी व्हायरल (Viral) होत आहे.

तर सध्या सोशल मीडियावर सायकल खरेदीच्या एका बिलाने धुमाकूळ (Viral Old Bill) घातला आहे. हे बिल पाहुन अनेकजण हरकून गेले आहेत. त्याकाळी स्वस्तात मिळालेल्या या साईकलची आणि या बिलाची जोरदार चर्चा सुरु आहे. लोकांना हे बिल पाहुन सूखद धक्का बसला आहे.

आजोबांनी घेतलेल्या साईकलची किंमत तुम्हाला माहिती आहे का? कालचक्र किती पुढे गेले आहे. ही सायकल आपल्या आजोबांची आवडती असेल, आता पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. अशी भावनिक पोस्ट फेसबुकवर युझरने शेअर केली आहे. त्यामुळे इतर युझर्सही आठवणीत रमले आहेत.

इंटरनेटवर आपण सहज एखाद्या वस्तूचा सगळ्यात जुना भाव जाणून घेऊ शकतो. यापूर्वीच्या जमान्यात साईकल असो वा इतर अनेक वस्तू त्यांच्या किंमती वाचून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. त्याकाळात किती स्वस्ताई होती असे राहून राहून वाटते.

सध्या सोशल मीडियावर एक जुन्या बिलाची स्लिप व्हायरल झाली आहे. हे सायकलचे बिल (Old Slip Of Cycle) आहे. जवळपास 90 वर्षांपूर्वीचे हे बिल आहे. कोलकत्तामधील एका सायकलच्या दुकानातून ही खरेदी झाली आहे. या सायकलाच्या किंमतीचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही.

तर 90 वर्षांपूर्वींच्या या बिलानुसार, या सायकलची किंमत अवघी 18 रुपये होती. काय विश्वास बसत नाही? अनेकांना या बिलाने वेड लावले आहे. आज 18 रुपयांत सायकलची घंटीही येणार नाही. त्याकाळी तर अख्खी सायकलच 18 रुपयांत आली होती. अर्थात त्यावेळी त्याचे मूल्यही मोठे होते.

फेसबुकवर संजय खरे नावाच्या व्यक्तीने हे जुने बिल शेअर केले आहे. 7 जानेवारी 1934 रोजी ही सायकल खरेदी करण्यात आली आहे. कुमुद सायकल वर्क्स या दुकानातून ही सायकल खरेदी केल्याचे बिलावरुन स्पष्ट होते. या दुकानाचा पत्ता 85 ए, मानिकताला, कोलकत्ता असा आहे.

या जुन्या आठवणीवर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडला आहे. अनेकांनी त्यांच्या जुन्या आठवणींना, स्मृतींना उजाळा दिला आहे. रुपयाचे, किंमतीचे सोडा, पण हा अनमोल ठेवा असल्याचे एका युझरने म्हटले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.