चॅलेंज बाहेर न पडण्याचं, एक कार, 5 मुलं, आणि 24 तास बाहेर पडलीच नाहीत…

मित्रांनी मर्सिडीजमध्ये 24 तास राहण्याचे चॅलेंज घेतले होते. कारमध्ये बसल्यानंतरही त्यांनी आपले सर्व दैनंदिन काम हे कारमधून बसूनचे केले आहे.

चॅलेंज बाहेर न पडण्याचं, एक कार, 5 मुलं, आणि 24 तास बाहेर पडलीच नाहीत...
Follow us
| Updated on: Nov 08, 2022 | 11:06 PM

नवी दिल्लीः सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. पाच मित्रांनी 24 तास कारमध्ये घालवले असल्याचा तो व्हिडीओ आहे. या कालावधीतील सगळ्या घडामोडींचा तो व्हिडीओही त्यांनी रेकॉर्ड केले आहे. आणि त्यानंतर त्यांनी तो यूट्यूबवर अपलोड केला आहे. खरं तर या मित्रांनी मर्सिडीजमध्ये 24 तास राहण्याचे चॅलेंज घेतले होते. कारमध्ये बसल्यानंतरही त्यांनी आपले सर्व दैनंदिन काम हे कारमधून बसूनचे केले आहे. त्या चँलेजमध्ये कारमधू बाहेर पडण्याची परवानगीही नव्हती.

राजस्थानमधील अलवर येथील यूट्यूबर अमित शर्मा यांनी व्हिडिओ अपलोड केला आहे. अमित 4 मित्रांसह दुपारी 1 वाजता मर्सिडीज बेंझ एएमजी जीएलई 450 कारमध्ये बसला आहे.

त्यानंतर सर्वजण त्या कारमधून फिरायला निघाले. त्या दरम्यान त्याच्या मित्रांनी खाण्यासाठी काही स्नॅक्सही ठेवले होते. त्यानंतर सगळ्यात आधी वाटेत एका ठिकाणी मर्सिडीज थांबवून त्यांनी चहा आणि पाण्याची बॉटलही घेतली असल्याचे त्या व्हिडीओमध्ये आहे.

कार सुरू झाल्यानंतरही अमितच्या मित्रांनी कुठे जायचे हे ठरवले नव्हेत. मात्र मर्सिडीज चालवण्यात मात्र तो मग्नच होता

कार चालवत असतानाच सायंकाळ झाली त्यावेळी मात्र समोर बसलेला त्याच्या मित्राने आपली जागा बदलली. त्यावेळी त्यांनी सीटही बदलली होती. त्यानंतर मात्र सगळ्यांनी पिझ्झा खाल्ला. त्यानंतर मात्र काही वेळानंतर अमित थकला असल्याचे त्यांनी सांगितले.

या सगळ्या मित्रांनी कारमध्येच ‘चिडिया उड-मैना उड गेम’ हा खेळ खेळला होता. खेळ खेळून झाल्यानंतर मात्र दुपारी अडीच वाजता हे सगळे जण झोपले होते.

त्यानंतर सकाळी उठल्यानंतर मात्र सगळ्यांनी नाश्ता केल्याचे सांगितले. त्या व्हिडीओमध्ये अमितने 140 च्या स्पीडने कार चालवल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

कारमध्येच बसण्याचे चॅलेंज पूर्ण केल्यानंतर युजर्सनी अमितचे खुलेपणाने कौतुक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर, सर्व यूट्यूब युजर्सनी अमित आणि त्याच्या मित्रांचे कौतूक केले आहे. त्याचवेळी, एका यूजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, अल्टो कारमध्ये 48 तास घालवून दाखवा असंही म्हटलं आहे.

एका यूजर्सने लिहिले की, ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्येही 24 तास राहू शकता. तर काही जणांनी अमितच्या चॅलेंजवर शंकाही घेतली आहे.

5 नोव्हेंबरला यूट्यूबवर अपलोड केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 40 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे या मित्रांच्या व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.