घरात एकाच वेळी निघाले 40 साप, कुटुंबीयांची बोबडीच वळली; गावात भीतीचे वातावरण
एका घरात अचानक 40 सापाची पिल्ले बाहेर आली आहेत. यानंतर संबंधित क्षेत्रातील वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि सर्वांचे रेस्क्यू केले आहे. पण या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गरमीमुळे जीवजंतूंपासून ते मानवापर्यंत सर्वजण त्रस्त असतात. सर्वजण थंडाव्याच्या शोधात इकडे-तिकडे भटकताना दिसत आहेत. असाच काहीसा प्रकार मेरठ दिल्ली रोडवरील सरस्वती लोक येथेही दिसून आला. गरमीमुळे त्रस्त होऊन एका घरात एक-दोन नव्हे, तर तब्बल 40 सापाची पिल्ले बाहेर आली आहेत. हे पाहून घरातील सदस्यांचा गोंधळ उडाला आहे.
सापाच्या पिल्लांच्या बाहेर पडण्याची ही घटना सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. प्रत्येकजण हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलताना दिसत आहे. विभागाला माहिती मिळाली होती की एका घरात अचानक काही सापाची पिल्ले बाहेर आली आहेत. यानंतर संबंधित क्षेत्रातील वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली. सकाळच्या वेळी सुमारे 20 सापाच्या पिल्लांचे रेस्क्यू करण्यात आले. त्यानंतर पुन्हा त्या क्षेत्रातून विभागाला माहिती मिळाली की आणखी काही सापाची पिल्ले बाहेर आली आहेत. संध्याकाळी पुन्हा टीम पोहोचली आणि सुमारे 15 सापाच्या पिल्लांना पकडले. एकूण 40 अशी सापाची पिल्ले त्या घरातून पकडली गेली. ही पिल्ले अचानक घरात कशी आली असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
पाण्यात राहणे पसंत करतात हे साप
मेरठच्या एकया व्यकीतेन सांगितले की, सरस्वती लोक येथे आढळलेली सर्व सापाची पिल्ले रेस्क्यू करून संबंधित वन क्षेत्रात सोडण्यात आली आहेत. ते म्हणाले की, हे सर्व पाण्यातील साप होते. त्यामुळे हे साप गरमीमुळे पाण्यातून बाहेर येऊन थोड्या वेळासाठी बाहेर राहू शकतात, पण त्यांना पाण्यात राहणे जास्त आवडते. त्यांनी सांगितले की, त्या क्षेत्रात नाल्याजवळ बरीच घाण होती, त्यामुळे सापाच्या पिल्लांच्या बाहेर पडण्याची घटना घडली. त्यांनी सोशल मीडियावर पसरलेल्या अनेक प्रकारच्या गैरसमजुतींना खोडून काढत सांगितले की, हे कोणत्याही प्रकारचे विषारी नाग नव्हते, फक्त पाण्याचे साप होते. त्यामुळे भीतीचे कारण नाही.
