72 वर्षांच्या पतीचे निधन, 22 वर्षीय विधवेने 81 वर्षांचा दुसरा नवरा केला, अनोखी प्रेमकथा

अमेरिकेतील व्हर्जिनिया येथून एक अनोखी आणि भावनिक प्रेमकथा समोर आली आहे, तिचा 72 वर्षीय पती ब्रूसच्या मृत्यूनंतर 22 वर्षीय लेक्सी हॉवेलने 81 वर्षीय एडवर्ड हॉवेलच्या प्रेमात पडली. लगेच मत बनवू नका, आधी संपूर्ण बातमी वाचा.

72 वर्षांच्या पतीचे निधन, 22 वर्षीय विधवेने 81 वर्षांचा दुसरा नवरा केला, अनोखी प्रेमकथा
प्रेम इतकं अंधळं असतं का? 72 वर्षांच्या पतीचे निधन, 22 वर्षांय विधवेचे 81 वर्षीय एडवर्डसोबत जुळले
Image Credit source: Freepik
| Edited By: | Updated on: Dec 08, 2025 | 5:42 PM

तुम्हाला आज आम्ही एका अशा प्रेमाविषयी किंवा नात्याविषयी सांगणार आहोत, जे खरंच आश्चर्यचकित करते. अमेरिकेतील व्हर्जिनिया येथून एक अनोखी आणि भावनिक प्रेमकथा समोर आली आहे, तिचा 72 वर्षीय पती ब्रूसच्या मृत्यूनंतर 22 वर्षीय लेक्सी हॉवेलने 81 वर्षीय एडवर्ड हॉवेलच्या प्रेमात पडली. आता लगेच तुमचं मत बनवू नका, आधी संपूर्ण स्टोरी वाचून घ्या.

अमेरिकेतील व्हर्जिनिया येथून एक अनोखी आणि भावनिक प्रेमकथा समोर आली आहे, ज्याने सोशल मीडियापासून स्थानिक समुदायांपर्यंत चर्चा सुरू केली आहे. एप्रिल 2024 मध्ये तिचा 72 वर्षीय पती ब्रूसच्या मृत्यूनंतर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या 22 वर्षीय विधवा लेक्सी हॉवेलने तीन महिन्यांनंतर त्याच क्लबमध्ये 81 वर्षीय एडवर्ड हॉवेलची भेट घेतली आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

असे म्हणतात की प्रेम आंधळे असते. पण ते इतकं आंधळं आहे का की त्याला नातेसंबंधात दोन व्यक्तींचे वयही दिसत नाही? तुम्ही अशा अनेक बातम्या वाचल्या असतील ज्यात पती-पत्नीच्या वयामध्ये खूप फरक आहे. पण आज आपण अमेरिकेतील एका महिलेबद्दल सांगणार आहोत, जी खूप लहान आहे आणि ती एका वयस्कर व्यक्तीच्या प्रेमात पडली, ज्याच्याशी तिने लग्न केले.

अमेरिकेतील व्हर्जिनिया येथून एक अनोखी आणि भावनिक प्रेमकथा समोर आली आहे, ज्याने सोशल मीडियापासून स्थानिक समुदायांपर्यंत चर्चा सुरू केली आहे. एप्रिल 2024 मध्ये तिचा 72 वर्षीय पती ब्रूसच्या मृत्यूनंतर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या 22 वर्षीय लेक्सी हॉवेलने तीन महिन्यांनंतर त्याच क्लबमध्ये 81 वर्षीय एडवर्ड हॉवेलची भेट घेतली आणि दोघांना एकमेकांमध्ये नवीन आधार मिळाला. लेक्सी आणि ब्रूस एका युद्धातील दिग्गजांच्या क्लबमध्ये भेटले, जिथे लेक्सी बऱ्याचदा भेट देत असे. दोघे तीन वर्ष एकत्र राहिले. जेव्हा ब्रूसला कर्करोगाचे निदान झाले, तेव्हा लेक्सीने आपली नोकरी सोडली आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्याची काळजी घेतली.

“ब्रूस म्हणाला की तो मला त्याची पत्नी बनवल्याशिवाय जग सोडणार नाही,” लेक्सी म्हणाली. ब्रूसने त्याच्या वारशात फक्त त्याची सर्वात आवडती गोष्ट सोडली 40,000 डॉलरची मस्टँग कार लेक्सी. ब्रूसच्या मृत्यूनंतर, लेक्सी पूर्णपणे तुटली होती. त्याच क्लबमध्ये एके दिवशी ती अश्रू पुसत असताना 81 वर्षांचा एडवर्ड हळूहळू तिच्याजवळ आला. एडवर्ड म्हणाला की, दोन वर्षांपूर्वी त्यानेही आपली पत्नी गमावली. लेक्सीला वाटले की त्या दोघांच्या हृदयात एक समान रितेपणा आहे आणि येथूनच संभाषणाची सुरुवात झाली. हळूहळू लेक्सीला एडवर्डचा शांत स्वभाव आणि प्रेमळ वागणूक आवडू लागली.