IND vs SA: कॅप्टन सूर्याची टॉस जिंकण्यासाठी खास प्लानिंग, नक्की काय करणार?
Suryakumar Yadav on Toss : अपवाद वगळता टीम इंडियावर तिन्ही फॉर्मटेध्ये टॉस रुसला आहे. टॉस सामन्यात निर्णायक ठरतो. त्यामुळे कॅप्टन सूर्यकुमार यादव याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i सीरिजआधी टॉसबाबत काय प्रतिक्रिया दिली? जाणून घ्या.

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी आणि वनडे सीरिजनंतर आता टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. ऊभयसंघात टी 20i मालिकेत एकूण 5 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत. टीम इंडियाची तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात अनेक महिन्यांची प्रतिक्षा संपली. टीम इंडियाने तब्बल 20 एकदिवसीय सामन्यानंतर टॉस जिंकला. तसेच टीम इंडियाने टॉससह सामना जिंकला आणि 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली. टीम इंडियाने अखेरीस वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत टॉस जिंकला होता. त्यानंतर आता टी 20i मालिकेत टॉसबाबत कॅप्टन सूर्यकुमार यादव याने आपला गेम प्लान सांगितला आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी 20i सीरिजला 9 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना हा कटकमधील बाराबाती स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला कर्णधार सूर्यकुमार यादव याने पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. सूर्याने या दरम्यान टॉस जिंकण्याबाबत गेम प्लान सांगितला. कटकमध्ये आपल्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागावा यासाठी सूर्याने काय करणार? हे सांगितलं.
कॅप्टन सूर्यकुमार यादव केएल राहुल याची कॉपी करणार
सूर्याने टॉस जिंकण्यासाठी केएल राहुल याची कॉपी करणार असल्याचं म्हटलं. कॅप्टन केएलने विशाखापट्टणममध्ये झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात डाव्या हाताने टॉस उडवला होता. त्या सामन्यात केएलच्या बाजूनेच नाणेफेकीचा कौल लागला. भारताने यासह एकदिवसीय क्रिकेटमध्ये 21 व्या सामन्यात टॉस जिंकला होता. त्यामुळे आता सूर्याही केएलचा फॉम्युला वापरणार असल्याचं निश्चित आहे.
टॉस फॅक्टर कशामुळे महत्त्वाचा?
कोणत्याही सामन्यात टॉस फॅक्टर फार महत्त्वाचा असतो. खेळपट्टीनुसार टॉस जिंकून कोणता निर्णय घ्यायचा? हे कर्णधाराला माहिती हवं. अपवाद वगळता बहुतांश वेळा टॉससह मॅच कोण जिंकणार? हे निश्चित होतं. त्यामुळे टॉस फॅक्टर महत्त्वाचा ठरतो.
ड्यू फॅक्टर ठरतो निर्णायक
तसेच टी 20i मालिकेतील सामने संध्याकाळी होणार आहेत. त्यामुळे ड्यू फॅक्टर परिणामकारक ठरु शकतो. ड्यूनंतर बॅटिंग करणं तुलनेत सोपं होतं. तसेच बॉलिंग करणाऱ्या संघाला त्याचा फटका बसतो. त्यामुळे ड्यु फॅक्टर असताना टॉस जिंकून पहिले बॉलिंग घेण्याकडे कर्णधारांचा कळ असतो.
