Video: 2 वर्षांच्या चिमुरड्याने पकडला भलामोठा साप, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, हा तर टारझन वाटतो!

| Updated on: Oct 06, 2021 | 1:51 PM

हे मूल ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध व्यक्ती मॅट राईट (Matt Wright)चा मुलगा आहे. वन्य प्राण्यांना, विशेषतः मगरींना वाचवण्यासाठी मॅट यांना ओळखलं जाते.

Video: 2 वर्षांच्या चिमुरड्याने पकडला भलामोठा साप, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, हा तर टारझन वाटतो!
ऑस्ट्रेलियात चक्क 2 वर्षांच्या मुलाने सापासोबत असे काही केलं, जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
Follow us on

साप पाहून भल्याची अवस्था खराब होते. पण ऑस्ट्रेलियात चक्क 2 वर्षांच्या मुलाने सापासोबत असे काही केलं, जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मुलाने या 2 मीटर लांब सापाला हाताने पकडलेच नाही तर त्याला उचललं केले, जणू तो त्याच्यासाठी खेळ आहे. (A 2-year-old boy in Australia caught a giant snake. Viral video)

मुलाच्या वडिलांनी स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात हे मुल सापावर ( Snake Video) नियंत्रण मिळवताना दिसत आहे. त्यामुळेच आज आपण या ‘शूर’ मुलाबद्दल जाणून घेऊया.

‘डेली मेल’ ने दिलेल्या माहितीनुसार, हे मूल ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध व्यक्ती मॅट राईट (Matt Wright)चा मुलगा आहे. वन्य प्राण्यांना, विशेषतः मगरींना वाचवण्यासाठी मॅट यांना ओळखलं जाते. गेल्या 20 वर्षांपासून ते ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडच्या भागातील मगरींना पकडून स्थलांतरित करत आहेत. मॅट राईटने अलीकडेच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे

व्हिडीओ पाहा:

या व्हिडिओमध्ये त्याच्या घराच्या बागेत एक लांब साप दिसत आहे. साप खूप भयानक आणि मोठा दिसतो आहे. हा साप मॅट राईटच्या 2 वर्षांच्या मुलाने पकडला आहे. (Child With Snake Video) पूर्ण आत्मविश्वासाने हे मूल विशाल सापाची शेपटी दोन्ही हातांनी धरून खेचताना दिसते. व्हिडिओमध्ये, मॅट म्हणतो- “त्याला बाहेर काढ, त्याला बाहेर काढ. त्याला झुडपाकडे ने.”

व्हिडिओमध्ये मॅट आपल्या मुलाला साप कसा पकडायचे हे शिकवतो आहे. मुलाला साप बागेतून बाहेर काढण्यासाठी खूप धैर्याने प्रयत्न करताना दिसतो आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स यावर केल्या आहेत. काहींनी त्याला ‘शूर बालक’ म्हटले तर काहींनी त्याला सापांसोबत खेळू नका असा सल्ला दिला.

हेही वाचा:

Video: मुलाला झोपवण्यासाठी वडिलांनी गिटार वाजवून गायलं गाणं, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सगळा ताण विसराल

Video: अपना टाईम आयेगा, म्हणत अरुणाचलच्या छोटूने गायलं रॅप सॉंग, नेटकरी म्हणाले, ‘हे ओरिजनल पेक्षाही भारी’