AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सौदीत होत आहे तब्बल 400 मीटर उंच इमारत, त्यात असतील 104,000 फ्लॅट्स

सौदी अरब बांधत असलेली इमारत क्युबच्या आकाराची असेल, ही इमारत न्यू यॉर्कच्या एम्पायर स्टेट इमारतीच्या 20 पट मोठी असेल

सौदीत होत आहे तब्बल 400 मीटर उंच इमारत, त्यात असतील 104,000 फ्लॅट्स
MukaabImage Credit source: socialmedia
| Updated on: Feb 21, 2023 | 1:02 PM
Share

नवी दिल्ली : सौदी अरबने आपला खास ड्रीम प्रोजेक्ट सुरू केला असून त्या अंतर्गत राजधानी रियाध येथे अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील एम्पायर स्टेट सारख्या 20 इमारती सामावतील इतकी भव्य इमारत बांधण्यास सुरूवात केली आहे. या प्रकल्पाला ‘मुकाब’ असे नाव देण्यात आले आहे. भविष्याचा प्रकल्प म्हणून या ड्रीम प्रोजेक्टला नाव देण्यात आले आहे. या प्रोजेक्टला तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून तयार केले जात आहे.

सौदी अरब बांधत असलेली इमारत क्युबच्या आकाराची असेल, ही इमारत न्यू यॉर्कच्या एम्पायर स्टेट इमारतीच्या 20 पट मोठी असेल, या इमारतीत अनेक सुविधा असणार आहेत. त्यात एक म्युझियम आणि थिएटरही असणार आहे. 80  अशा जागा असतील जेथे सांस्कृतिक आणि मनोरंजक कार्यक्रम घेता येतील. या इमारतीत एकूण 104,000 फ्लैट्स असतील, 9 हजार हॉटेलचे सुट्स असतील. कार्यालयांसाठी जागा असेल. तसेच अनेक सामुदायिक केंद्रे असतील.

नैसर्गिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न

सौदी अरबने या प्रकल्पासाठी त्यांच्या सर्व खजिना खुला केला आहे. या प्रकल्पा हिरवाईसाठी खास काळजी घेण्यात येईल. लोकांच्या आरोग्याचा विचार करून नैसर्गिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न असणार आहे. येथे लोक आरामात सायकिलींग आणि मॉर्निंग वॉक करू शकतील तसेच त्यांच्या दैनंदिन कामासाठी या इमारतीचा वापर करता येईल. या इमारतीत वीजेसाठी सूर्यप्रकाश आणि वाऱ्याचा वापर करण्यात येईल असे अरब न्यूजमध्ये म्हटले आहे.

ही इमारत 400 मीटर उंच असणार 

ही इमारत 400 मीटर उंच आणि 400  मीटर लांब आणि 400 मीटररूंद असणार आहे. तिचा आकार क्यूब सारखा असेल. या इमारतीची निर्मिती भविष्याची इमारत म्हणून केली जाईल. राजधानी रियाधचा विकास आणि 2030 पर्यंत येथील लोकसंख्या दुप्पट होईल असे गृहीत धरून इमारतीचा विकास केला जात आहे. सौदीचे प्रिन्स मोम्ममद बिन यांच्या संकल्पनेतून इमारत बांधली जात आहे. या इमारतीसाठी चारशे अब्ज डॉलरची गुंतवणूक केली जात आहे.

भारतासाठी वैशिष्ट्यपूर्ण शहर 

हे शहर भारतासाठी वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे, या मेगाप्रोजेक्टमुळे 3.34  लाखाहून अधिक लोकांना रोजगार मिळणार आहे. सध्या 25 लाख भारतीय या देशात राहतात. या देशात सर्वाधिक कौशल्य असलेले नागरिक राहतात. जे अशाप्रकाराच्या कामासाठी अशाच कुशल कामगारांची गरज आहे.

दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.