दोन बायकांना कंटाळला, तिसरी आणली… तरीही मन भरेना, चौथीसोबत सुहागरातीचे स्वप्न पाहिले अन्…
एखाद्या व्यक्तीला दारू किंवा पान सुपाऱ्यांचे व्यसन असते हे आपण ऐकतो. पण एखाद्या व्यक्तीला लग्नाचा नाद लागला आहे हे कधी ऐकले आहे का? नाही ना. पण खरच एका व्यक्तीला लग्नाचा नाद लागला होता. त्याने एक-दोन नव्हेत तर चार लग्न केली. आता पुढे नेमकं काय झालं वाचा...

अनेकदा तुम्ही चित्रपटांमध्ये पाहिले असेल की एका व्यक्तीच्या दोन किंवा तीन बायका असतात. एक घरी असते. एक बाहेरची असते. काही दिवस नवरा घरातल्या बायकोबरोबर राहतो. काही दिवस बाहेरच्या बायकोबरोबर राहतो. पण, एका व्यक्तीला अगदी विचित्र लग्न करण्याचा नाद लागला आहे. पहिल्या बायकोला कंटाळल्यानंतर त्याने तिला घटस्फोट दिला. त्यानंतर दुसरी बायको आणली. आता तिच्यापासूनही त्याची इच्छा पूर्ण झाली नाही तर चोरून तिसरी बायको आणली. आता त्याने चौथे लग्न करण्याची तयारी केली. सुहागरातपर्यंतचे स्वप्ने रचले होते. पण, त्यापूर्वीच ही बाब तिसर्या बायकोला कळाली. नंचर तिने जे केलं ते पाहून सर्वजण थक्क झाले.
उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधील ही घटना आहे. मझोला पोलीस स्टेशन परिसरातील कांशीराम नगरचा येथे हा प्रकार घडला आहे. येथील रहिवासी सईदाने आपल्या नवरा रजाबुलवर गंभीर आरोप केले आहेत. तिचे म्हणणे आहे की मैनाठेरच्या तख्तपुर अल्लाह उर्फ नानपुर गावातील रहिवासी रजाबुलने स्वतःला अविवाहित सांगून तिच्याशी लग्न केले होते. नंतर कळाले की त्याचे यापूर्वीच दोन स्त्रियांशी लग्न करून झाले होते आणि त्याला दोन मुलेही आहेत.
तिसऱ्यांदा केले लग्न
महिलेने सांगितले की पाच वर्षांपूर्वी तिचे रजाबुलशी लग्न झाले. लग्नानंतर रजाबुलने तिला करुला येथे भाड्याच्या घरात ठेवले. सईदाने सांगितले की जेव्हा ती आपल्या सासरी गेली, तेव्हा तिला रजाबुलच्या भूतकाळाबद्दल कळाले. त्याने पहिले लग्न एका हिंदू मुलीशी केले होते आणि तिला सोडल्यानंतर दुसर्या युवतीशी लग्न केले, ज्याच्यापासून त्याला दोन मुले आहेत. जेव्हा तिच्यापासूनही मन भरले तेव्हा तिला आणले. तिच्याशी तिसरे लग्न केले.
महिलेने केली पोलिसात तक्रार
सईदाने म्हटले की रजाबुलने स्वतःला अविवाहित सांगून फसवून लग्न केले होते. लग्नानंतरच कळाले की ती त्याची तिसरी बायको आहे. जेव्हा तिने याचा विरोध केला तेव्हा तिला मारहाण केली. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरुन आरोपी नवऱ्या विरोधात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
