AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | हॉटेलमध्ये घुसलं भयानक वादळ, पाऊस वारा पाहून लोकांची तारांबळ उडाली, भयानक व्हिडिओ…

TRENDING VIDEO | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये वादळ एका हॉटेलमध्ये घुसलं, लोकांनी हॉटेलचं छत पकडलं नंतर काय झालं ते तुम्ही व्हिडीओत पाहा

VIDEO | हॉटेलमध्ये घुसलं भयानक वादळ, पाऊस वारा पाहून लोकांची तारांबळ उडाली, भयानक व्हिडिओ...
biparjoy cycloneImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 18, 2023 | 10:13 AM
Share

मुंबई : देशात काही राज्यात बिपरजॉय वादळामुळे (Cyclone Biparjoy) लोकांचं आणि निसर्गाचं बरचं नुकसान झालं आहे. बिपरजॉय वादळामुळे अनेक राज्यात भयानक स्थिती होती. ती व्हिडीओच्या (Cyclone viral video) माध्यमातून आपण सगळ्यांनी पाहिली, काही लोकांना त्या वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर नवनवे व्हिडीओ (trending video) येत आहेत. ज्यावेळी वादळ आलं, त्यावेळी लोकांनी आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी काय काय केलं हे व्हिडीओत दिसतं आहे. हवेचा स्पीड इतका होता, की लोकांच्या घरावरील छतं उडून गेलं. काही लोकांची घरं मोडली.

सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ एका हॉटेलमधील वाटतं आहे. तिथं जेवण करण्यासाठी आलेली लोकं अडचणीत सापडली आहेत. त्यावेळी किती मोठं वादळं आलंय हे तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळत आहे. त्या हॉटेलमधील टेबल, खुर्ची सगळं काही बिस्कटलं आहे. काही लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या लोखंडी छताला पकडलं आहे. हवेचा स्पीड इतका आहे की, ज्या लोकांनी सुरक्षित रहावं म्हणून छताला पडकलं आहे, तो हवेत उडाला आहे.

लोक हवेत उडाली

हॉटेलचं छतं ज्यावेळी वादळामुळे हवेत उडालं, त्यावेळी त्याला पकडलेली लोकं सुध्दा हवेत उडाली. काही लोकांनी त्याचवेळी छतं सोडून दिलं. काही लोकं छतासोबत हवेत उडाली. त्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती त्या छतं सोडल्यानंतर जमिनीवर पडली. वादळ खूप भयानक होतं. त्यामुळे पुर्ण हॉटेलची व्यवस्था बिघडून गेली आहे. लोकं त्या हॉटेलच्या एका कोपऱ्यातून वादळ पाहत आहेत.

तीन लाख लोकांनी व्हिडीओ पाहिला

या व्हिडीओला @el_karadepapa ट्विटरवरून पोस्ट केली आहे. व्हिडीओला आतापर्यंत ३ लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिलं आहे. आतापर्यत या वादळाचं ठिकाणं समजलेलं नाही. या व्हिडीओचा आणि बिपरजॉय वादळाचा काहीही संबंध नाही.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.