फ्लाईटमध्ये लहान मुल रडायला लागलं, स्टाफकडून रडणं बंद करण्याचा उपाय मन जिंकणारा ठरला

| Updated on: Sep 01, 2022 | 12:06 AM

हा व्हिडिओ नील मलकम नावाच्या क्रू मेंबरचा आहे. जीवन व्यंकटेश नावाच्या एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

फ्लाईटमध्ये लहान मुल रडायला लागलं, स्टाफकडून रडणं बंद करण्याचा उपाय मन जिंकणारा ठरला
फ्लाईटमध्ये लहान मुल रडायला लागलं...
Image Credit source: Zee News
Follow us on

नवी दिल्ली : मूल रडलं की घर डोक्यावर घेतलं असं म्हटलं जातं. हाच अनुभव जेव्हा विमान प्रवासात येईल तेव्हा नक्कीच तोंडातून ‘विमान डोक्यावर घेतलं’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया येऊ शकते. याचीच प्रचिती नुकतीच एअर इंडिया (Air India) एअरलाईन्सच्या विमान प्रवासादरम्यान आली. बऱ्याच लहान मुलांना प्रवास करणे आवडत नसतं. मग प्रवासात ही मुलं गेली की त्यांचं रडणं सुरु होतं. त्यांचं रडणं थांबवण्यासाठी नाना उपाय करावे लागतात. अशीच घटना एअर इंडियाच्या विमानात घडली आहे. विमान प्रवासादरम्यान एक लहान मूल रडू लागलं आणि त्याला शांत करण्यासाठी चक्क क्रू मेंबर (Crew Member) कॉकपीटमधून पुढे आला. सोशल मीडियावर या क्रू मेंबरच्या माणुसकीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Viral) होत आहे. त्या मुलाला झोपवण्यासाठी आणि शांत करण्यासाठी क्रू मेंबरने त्या मुलाला कडेवर उचलून घेतले आणि मायेने थोपटत शांत केले. या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओने लाखो नेटिझन्सची मने जिंकली आहेत.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडिओ नील मलकम नावाच्या क्रू मेंबरचा आहे. जीवन व्यंकटेश नावाच्या एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओखाली कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांच्या गोड वर्तणुकीचे खरोखर कौतुक आहे. माझ्या मुलीला स्टीवर्डच्या खांद्यावर बरे वाटले तेव्हा आश्चर्य वाटले, धन्यवाद. हे माझ्यासाठी खूप आहे. टाटांनी एअर इंडिया ताब्यात घेतल्यानंतर या एअरलाईन्सच्या प्रवासात झालेले बरेच बदल पाहायला मिळतात.’

नीलच्या व्हिडिओने अनेक इंस्टाग्राम वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियात या व्हिडिओचे भरभरुन कौतुक केले जात आहे.

हे सुद्धा वाचा

फ्लाइटच्या क्रू मेंबरने व्यक्त केली कृतज्ञता

हा व्हिडिओ 7 ऑगस्ट रोजी पोस्ट करण्यात आला होता आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वापरकर्त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये इन्स्टाग्रामवर क्रू मेंबरच्या भेटीची पुष्टी केली.

काही दिवसांपूर्वी त्याचे कॅप्शन अपडेट करताना त्याने कॅप्शन लिहिले होते, ‘अपडेट : मला ते सापडले जे माझ्या मुलाला खांद्यावर घेऊन फिरत आहेत. ते @neil_nitin_ub आहे, व्हिडिओ व्हायरल केल्याबद्दल आणि त्याच्यापर्यंत पोहोचल्याबद्दल सर्वांचे आभार. आतापर्यंत या व्हिडिओला 1 लाख 91 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. (A video of an Air India flight crew member and a child has gone viral on social media)