हा तर अक्षरश: वेडेपणा! चक्क मगरीला बाईकवर घेऊन निघाले अन् रस्त्यात… व्हिडीओ पाहून थरकाप उडेल

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दोन तरुण एका मगरीला बाइकवर बसवून रस्त्यावरून जाताना दिसत आहेत. हा धक्कादायक व्हिडीओ पाहून कोणाच्याही हृदयाचा ठोका चुकू शकतो. आता हा व्हिडीओ खरा आहे की AIच्या माध्यमातून बनवला आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

हा तर अक्षरश: वेडेपणा! चक्क मगरीला बाईकवर घेऊन निघाले अन् रस्त्यात... व्हिडीओ पाहून थरकाप उडेल
Crocodile viral Video
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 04, 2025 | 6:02 PM

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका विचित्र व्हिडीओची जोरदार चर्चा सुरु आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा थरारकाप उडला आहे. व्हिडीओत दोन तरुण बाइकवरून रस्त्यावरून वेगाने जाताना दिसतात आहेत. एका तरुणाने चॉकलेटी रंगाचा शर्ट घातला आहे तर दुसऱ्या तरुणाने पांढऱ्या रंगाची टीशर्ट घातला आहे. दोन्ही तरुण बाइकवरुन जात असतात. पण त्यांच्या हातात असलेल्या मगरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. हा व्हिडीओ नेमका खरा आहे की खोटा आहे असा प्रश्न आता नेटकऱ्यांना पडला आहे.

काय आहे व्हिडीओ?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या तरुणांच्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या दोघांच्या हातात असलेल्या मागरीकडे सर्वजण पाहात आहेत. जिकडे सर्वसामान्य लोक मगरीला पाहून पळ काढतात, तिथे या दोन तरुणांनी चक्क मगरीला बाइकवरच बसवले आहे. त्यांनी मगरीला इतक्या सहजतेने पकडले आहे की जणू ते दररोज अशा प्रकारे मगरीला बाईकवरुन फिरवत असतात.

वाचा: एका डुलकीने झाला मोठा घात! क्लार्ककडून 3000 कोटी ट्रान्स्फर, बॅंकेने जे केले ते त्याहून…

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

या व्हिडीओने सोशल मीडियावर लोकांना चकित केले आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले असून, अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या तरुणांच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे आणि मगरीला अशा प्रकारे बाइकवर नेणे धोकादायक असल्याचे सांगितले आहे. काही नेटकऱ्यांनी मजेशीर टिप्पणी करताना म्हटले, “मगरीला तरी थोडी इज्जत द्या!” तर काहींनी हा व्हिडीओ एआयच्या मदतीने बनवला असल्याची शक्यता व्यक्त केली आहे, कारण इतक्या अचूकतेने आणि यथार्थवादी दृश्ये केवळ एआय तंत्रज्ञानानेच तयार होऊ शकतात.

एआय तंत्रज्ञानाची कमाल?

असे व्हिडीओ सध्या एआय तंत्रज्ञानाने तयार केले जात असल्याची चर्चा आहे. एआयच्या साहाय्याने असे यथार्थवादी दृश्ये तयार करणे शक्य आहे, जे खऱ्या व्हिडीओसारखे दिसतात. यापूर्वीही मलयाळी गृहिणी आणि भलामोठा साप यांचा असाच एक व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चर्चेत आला होता, जो एआय-निर्मित असल्याचे समोर आले. या मगरीच्या व्हिडीओबाबतही अशीच शक्यता व्यक्त केली जात आहे, परंतु याबाबत कोणताही ठोस पुरावा नाही. हा व्हिडीओ खरा असो वा एआय-निर्मित, याने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. हा थरारक व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल आणि यामागील सत्य जाणून घेण्यासाठी उत्सुक व्हाल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)