रस्त्यावरील सापावर तरुणाने चुकून चढवली बाईक, तरीही सापाने असा बदला घेतला..Video व्हायरल

Viral Video: तुम्ही ऐकले असेल की सापाशी वैर कधीही महागातच पडते. मग तूमची चूक असो किंवा नसो..असाच काहीसा प्रकार घडला आहे.

रस्त्यावरील सापावर तरुणाने चुकून चढवली बाईक, तरीही सापाने असा बदला घेतला..Video व्हायरल
Viral Video
| Updated on: Nov 13, 2025 | 10:04 PM

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा यातील व्हिडीओ विचार करायला लावणारे असतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सापाशी पंगा घेणे महागात पडते. मग चूक तुमची असो की नसो. याचा दाखला देणारा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत एक बाईक चालकाने रस्त्यावरील सापावरुन चुकून बाईकचे टायर नेले. त्यानंतर हा बाईकस्वार थांबला आणि त्याने आपली बाईक मागे घेतली…त्यानंतर जे झाले ते भयानक होते.

सापाने बाईकस्वाराच्या पायाला दंश केला

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. एक साप बहुतांशी तो नाग असावा, रस्त्यात पडला आहे. त्याच्या अंगावरुन दुचाकी चालक बाईक नेतो. त्यामुळे साप चिरडला जातो. या गोष्ठीशी अनभिज्ञ असलेला दुचाकी चालक अचानक आपली बाईक जराशी मागे घेतो, तेथेच नेमका अनर्थ होतो. आणि हा नाग त्या दुचाकीस्वाराच्या पायाच्या जवळ दंश मारतो. त्यामुळे त्याची काहीही चूकी नसताना त्याला शिक्षा होत आहे.

सापाच्या दंशाचा बाईकस्वाराला काही पत्ता नव्हता. मात्र या बाईकस्वाराची नजर जशी या सापावर पडते. तसा तो खूप घाबरतो आणि त्याचा तोल जाऊन तो बाईकसह रस्त्यावरच कोसळतो. बाईकस्वारची काहीही चूक नसताना त्याच्याकडून चुकून साप चिरडला गेला असूनही त्याला याची शिक्षा भोगावी लागते.

येथे पाहा व्हिडीओ –

चुकून झालेल्या गोष्टीचा शिक्षा

या व्हिडीओतून स्पष्ट झालेले नाही की दुचाकीस्वाराचे प्राण वाचले की नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर लोकांच्या आश्चर्यकारक प्रतिक्रीया आल्या आहेत. काहींनी म्हटले सापावर चुकून बाईक नेली. त्यामुळे सापाला धोका वाटला म्हणून सापाने दंश केला.तर काहींनी म्हटले की बाईकस्वाराची काहीही चूक नाही. एका युजरने लिहिलेय की जर बाईकस्वारास आधी साप दिसला असता तर त्याने त्यांच्यावरुन बाईक नेली नसती. अशा अनेक प्रतिक्रीयांचा पाऊस या पोस्टवर पडल्या आहेत.