Video : 4 समोसे 20 रुपयांचे की 40? व्हायरल व्हिडीओत चिमुरड्याचा युक्तिवाद तुम्हीच पाहा

मागे वर्षभरापूर्वी एका तरुणाशी 1800 रुपयांच्या हिशेबावरुन वाद घालणाऱ्या काकू सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. असाच एक व्हिडीओ आताही व्हायरल झाला आहे. फरक फक्त एवढाच आहे काकूंची जागा घेतलीय एका समोसा विकणाऱ्या चिमुरड्याने... (Samosa 40 Rupees Video Goes Viral On Social Media)

Video : 4 समोसे 20 रुपयांचे की 40? व्हायरल व्हिडीओत चिमुरड्याचा युक्तिवाद तुम्हीच पाहा

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही. मागे वर्षभरापूर्वी एका तरुणाशी 1800 रुपयांच्या हिशेबावरुन वाद घालणाऱ्या काकू सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. असाच एक व्हिडीओ आताही व्हायरल झाला आहे. फरक फक्त एवढाच आहे काकूंची जागा घेतलीय एका समोसा विकणाऱ्या चिमुरड्याने आणि तो वाद घालतोय समोसा विकत घेणाऱ्या काकूंशी…! (After 1800 Rupees Videos Another Samosa 40 Rupees Video Goes Viral On Social Media)

व्हायरल व्हिडीओत नेमकं काय?

एक चिमुरडा समोसे विक्री करतोय. तो एका काकूंच्या घरी समोसे विकण्यासाठी जातो. पाच रुपयांना एक समोसा याप्रमाणे काकू त्याच्याकडून चार समोसे घेतात. म्हणजेच एकूण 20 रुपयांचे समोसे काकू त्या चिमुरड्याकडून विकत घेतात. पण माझ्या 4 समोस्यांची किंमत 5 रुपयांप्रमाणे 40 रुपये होतीय, असं तो लहान मुलगा काकूंना सांगतोय.

व्हायरल व्हिडीओत काकू त्याला समजावून सांगताना दिसून येत आहेत की एक समोसा 5 रुपयांना, दोन समोसे 10 रुपयांना मग आणखी दोन समोरे 10 रुपयांना… असं म्हणत असताना ते 2-2 समोसे त्याच्या हातावर ठेऊन त्याला समोस्याचा हिशेब सांगत असतात. मात्र काकूंचं सगळं ऐकल्यावर मुलगा आपल्या 40 रुपयांच्या हिशेबावर ठाम राहतो.

काकू आणि समोसा विकणाऱ्या मुलाची हिशेब प्रक्रिया बघून साहजिक शेजारी उभ्या असणाऱ्या तरुणाने हा सगळा प्रसंग आपल्या कॅमेरात टिपला. हा तरुण देखील चिमुरड्याला 20 आणि 40 रुपयांचा हिशेब समजावून सांगत होता. पण मुलगा मात्र ऐकायला तयार नव्हता. साहिजक हा व्हिडीओ पाहून हसू अनावर झाल्याशिवाय राहत नाही.

हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. एक गट मुलाबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहे तर एक गट मुलाची चेष्टा उडवताना दिसून येत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगात व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ :

हे ही वाचा :

आईच्या मोबाईलमध्ये आमच्या आठवणी, प्लीज परत द्या, माय गमवलेल्या लेकीचं आर्त पत्र

Viral Video : फुटबॉलच्या मैदानात गायीचा धुडगूस, प्रोफेशनल खेळाडूप्रमाणे डिफेंडिंग स्किल, पहा रंजक व्हिडिओ

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI