अनंत अंबानी अन् राधिका यांच्या लग्नासाठी 12 जुलैच तारीख का? काय आहे या दिवसाचे महत्व

Anant Ambani Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची लग्नपत्रिका व्हायरल झाली. त्या लग्नपत्रिकेत ड्रेस कोड देखील दिला आहे. लग्नपत्रिकेनुसार 12 जुलै रोजी शुभ विवाहाचा उत्सव सुरू होईल. त्या दिवसासाठी 'भारतीय पारंपारिक' ड्रेस कोड निश्चित केला आहे.

अनंत अंबानी अन् राधिका यांच्या लग्नासाठी 12 जुलैच तारीख का? काय आहे या दिवसाचे महत्व
anant ambani marriage card
Follow us
| Updated on: Jun 01, 2024 | 11:44 AM

रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा विवाह सोहळ्याची चर्चा सुरु झाली आहे. 12 जुलै 2024 रोजी होणाऱ्या या विवाह सोहळ्याची लग्नपत्रिका आता व्हायरल झाली आहे. हा विवाह समारंभ मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणार आहे. 12 ते 14 जुलै दरम्यान त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. 13 जुलै रोजी शुभ आशीर्वाद, 14 रोजी रिसेप्शन होणार आहे. अत्यंत धार्मिक असलेल्या अंबानी परिवाराने या विवाह सोहळ्यासाठी 12 जुलै रोजी तारीख का निवडली, काय आहे या तारखेचे महत्व…

12 जुलैचे महत्व काय?

अंबानी परिवाराने अनंत अंबानी याच्या विवाहासाठी 12 जुलैचा मुहूर्त पाहिला आहे. हा खूप खास दिवस आहे. या दिवशी दुपारी 12 वाजून 32 मिनिटांनी हिन्दू वर्ष विक्रम संवत 2081 ची सप्तमी तिथी सुरु होते. ही तिथी परिणय बंधन म्हणेजच लग्नासाठी सर्वोत्तम मानली जाते. 12 जुलैच्या सप्तमी तिथीला, अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा शुभ विवाह ‘परिघ’ योग आणि ‘गर’ करणमध्ये होणार आहे. हा वैदिक ज्योतिषशास्त्रात शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. तसेच या तिथीला रवि योग आहे, जो शुभ कार्यासाठी चांगला आहे.

हे सुद्धा वाचा

भद्रा अन् पंचकच्या प्रभावापासून ही तिथी मुक्त

अनंत आणि राधिकाच्या लग्नाची तिथी म्हणजेच सप्तमी ही भद्रा आणि पंचक यांच्या प्रभावापासून मुक्त आहे. तसेच राहू काळ दिवसाच्या दुपारीच समाप्त होईल, त्यानंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत हा दिवस पूर्णपणे निर्दोष काळ आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा विवाह हस्त नक्षत्रात होईल, जे लग्नासाठी योग्य नक्षत्र आहे. या तारखेचा दिवस शुक्रवार आहे, ज्याचा स्वामी शुक्र ग्रह आहे, जो सौभाग्य, समृद्धी आणि वैवाहिक सुखाचा स्वामी आहे.

ड्रेस कोड दिला आहे

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची लग्नपत्रिका व्हायरल झाली. त्या लग्नपत्रिकेत ड्रेस कोड देखील दिला आहे. लग्नपत्रिकेनुसार 12 जुलै रोजी शुभ विवाहाचा उत्सव सुरू होईल. त्या दिवसासाठी ‘भारतीय पारंपारिक’ ड्रेस कोड निश्चित केला आहे. 13 जुलै रोजी होणाऱ्या आशीर्वाद समारंभासाठी‘इंडियन फॉर्मल’ ड्रेस दिला आहे, तर 14 जुलै रोजी होणाऱ्या रिप्सशनसाठी ‘इंडियन चिक’ ड्रेस कोड निश्चित केला आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.